LIC चा मोठा हिस्सा सरकार विकणार, आणणार 'ही' नवी योजना

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Feb 01, 2020 | 14:44 IST

सरकार एलआयसी (LIC) चा एक मोठा हिस्सा विकण्याचा प्लान आखत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

LIC
LIC चा मोठा हिस्सा सरकार विकणार, आणणार 'ही' नवी योजना 

नवी दिल्लीः  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पचं सादर करताना मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. सरकार LICचा मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार एलआयसीचे आयपीओ आणणार आहे आणि याच्या माध्यमातून सरकार आपली भागेदारी विकेल. सरकारनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलं की, निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेच्या अंतर्गत एलआयसीचा काही भाग विकला जाईल.

याव्यतिरिक्त सरकार IDBI बँकमध्येही आपला हिस्सा विकणार आहे. LICचा आयपीओ जारी केला जाईल. सरकारनं आपल्या निर्गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत  देशातली सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) मधील काही भाग आरंभिक सार्वजनिक समस्या (आयपीओ) च्या माध्यमातून विकण्याची घोषणा केली. 

यापूर्वी मोदी सरकारने एअर इंडियामधील 100% भागेदारी विक्री करण्याची घोषणा केली आहे. 2019-20 मध्ये निर्गुंतवणुकीद्वारे 1.05 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे. सप्टेंबरपर्यंत ते केवळ 12.359 कोटी रुपये जमा करू शकले आहेत.

जीवन बीमा निगम (एलआयसी) ला नेहमीच एक सुरक्षित आणि चांगली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. अलीकडे नोंदवलेली आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. एलआयसीचा NPA आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या सहामाहीत 6.10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

प्रायव्हेट सेक्टरच्या बँक YES Bank, AXIS Bank आणि ICICI bank  ला आपल्या चांगल्या सुविधांसाठी ओळखलं जाते. मात्र यांच्या एनपीएमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. सध्या एलआयसीची पूर्ण भागेदारी सरकारकडे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी