आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 लोकसभेत सादर, बजेटच्या आधी जाणून घ्या भारताची आर्थिक स्थिती

Nirmala Sitharaman Table Economic Survey 2023 In Parliament : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे (आर्थिक पाहणी अहवाल) 2022-23 लोकसभेत सादर केला.

Nirmala Sitharaman Table Economic Survey 2023 In Parliament
आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 लोकसभेत सादर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 लोकसभेत सादर
  • बजेटच्या आधी जाणून घ्या भारताची आर्थिक स्थिती
  • महागाई 6.8 टक्के

Nirmala Sitharaman Table Economic Survey 2023 In Parliament : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे (आर्थिक पाहणी अहवाल) 2022-23 लोकसभेत सादर केला. या अहवालानुसार भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 2023-24 मध्ये 6 ते 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. भारताचा 2021-22 साठीचा विकास दर 7 टक्के असेल असा अंदाज आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेत बजेट 2023-24 सादर करणार आहेत. पुढच्या वर्षी (2024) लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. यामुळे मोदी सरकारच्या सध्याच्या टर्मचे हे शेवटचे फुल बजेट (पूर्ण अर्थसंकल्प) आहे. 

इकॉनॉमिक सर्व्हेनुसार (आर्थिक पाहणी अहवाल) 2022-23 भारताचा विकास दर 2023-24 मध्ये 6.5 टक्के असेल. याआधी 2021-22 मध्ये भारताचा विकास दर 8.7 टक्के होता. भारत जगातील सर्वात वेगाने विकास होणारी अर्थव्यवस्था होत आहे. आर्थिक विकास वैयक्तीक खर्च, कॉरपोरेट बॅलेंस शीट्स, छोट्या व्यावसायिकांमधील क्रेडिट ग्रोथ आणि प्रवासी मजूर पुन्हा शहरात परत आल्याने होत आहे, असेही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नमूद आहे. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये प्रमुख शहरांतील (मेट्रो सिटी) घरांच्या किंमतींमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महागाई 6.8 टक्के

आरबीआयच्या अंदाजानुसार 2022-23 मध्ये देशात महागाईचा दर 6.8 टक्के असेल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेट वाढवला जाईल. यामुळे कर्जावरील व्याज दिर्घ काळासाठी उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील इतर देशांच्या तुलनेत वेगाने आर्थिक प्रगती केली आहे. देशांतर्गत मागणी, भांडवली गुंतवणूक वाढल्याने विकासाला बळ मिळेल, असेही इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नमूद आहे. या सर्व्हेमध्ये जीडीपी बाबतचा अंदाज, चलनवाढ अंदाज, परकीय चलन साठा, व्यापारी तूट अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. 

राष्ट्रपतींचे अभिभाषण

आज (मंगळवार 31 जानेवारी 2023) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये (मध्यवर्ती सभागृह) अभिभाषण झाले. यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे (आर्थिक पाहणी अहवाल) 2022-23 सादर केला.

Modi सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, आता PM किसानमध्ये 6 नव्हे तर 8 हजार मिळणार

MPSC Recruitment 2023: MPSC कडून मेगाभरती; 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया, वाचा कोणत्या पदासाठी आणि वेतन किती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी