हैदराबाद : युक्रेन आणि रशियाच्या युध्दामूळे होरपळलेल्या अनेक देशात भारत देखील सामील आहे कारण आहे वाढणाऱ्या इंधनाच्या किंमती, दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमंतीमुळे वाहतूक व्यवस्थेचा खर्च वाढतोय आणि हा खर्च अखेर ग्राहकांच्या माथीच येत आहे. पण नविन टेक्नॉलॉजीने जग बदलतय आणि त्याचा फायदा सुद्धा होतोय.
हैदराबादच्या भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ओलेक्ट्राने इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या म्हणजेच इ ट्रकच्या रोडवरच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. लवकरच हा ट्रक भारतीय रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगमधील नैपुण्य मिळवणाऱ्या ओलेक्ट्राने आता ट्रक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रवेश केला आहे आणि बिल्ट-ऑन हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परची एका चार्जवर 220 किमीची रेंज आहे. हैदराबादच्या उत्पादन प्रकल्पात यांची बाधणी होणार आहे.
या प्रसंगी बोलताना के.व्ही. प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, " हा भारतातील अशा प्रकारचा पहिला ट्रक आहे. आमच्यासाठी खूप आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. या टिपरमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. वचन दिल्याप्रमाणे, आम्ही स्वप्न साकार केले आहे