Fraudulent Medicines : नवी दिल्ली : सरकारने बनावट औषधांना (Counterfeit medications) आळा घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी सरकारने औषधांमधील सर्वात महत्त्वाचा घटक ज्याला अॅक्टिव्ह फार्मास्युटीकल इंग्रेडिएंट किंवा एपीआय (API)असे म्हणतात, त्याच्यावर क्यूआर कोड (QR Code)लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे खऱ्या आणि बनावट औषधांची (fake medicines)ओळख पटवणे सोपे होणार असून काही सेकंदात ही पडताळणी करता येणार आहे. ग्राहक आता कोणत्याही औषधावरील क्यूआर कोडला मोबाइलद्वारे स्कॅन करून त्या औषधाची सत्यता पडताळू शकणार आहेत. नवा नियम पुढील वर्षी १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. (Now Counterfeit medications will be identified by QR codes present on API)
एपीआयवर क्यूआर कोड लावण्याच्या नवा नियमासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)एक अधिसूचना जाहीर केली आहे. एपीआयमध्ये क्यूआर कोड लावण्यासंदर्भातील सरकारच्या निर्णयानंतर आता खऱ्या आणि बोगस औषधांची औळख पटवणे सोपे होणार आहे. क्यूआर कोडमध्ये त्या औषधाची पूर्ण माहिती असणार आहे. त्यात त्या औषधाचा बॅच नंबर, किंमत आणि इतर महत्त्वाची माहिती असणार आहे. मोबाइलद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर औषधाची पूर्ण माहिती काही सेकंदात ग्राहकांना मिळणार आहे.
एपीआयमध्ये क्यूआर कोड लावल्यामुळे हे देखील सहजपणे कळणार आहे की कच्चा माल कुठून पुरवण्यात आला आहे, औषध निर्मितीच्या फॉर्म्युल्यात काही बदल करण्यात आले आहेत का, औषधाची डिलिव्हरी कोठे होते आहे. अॅक्टिव्ह फार्मास्युटीकल इंग्रेडिएंट किंवा एपीआय (API) हे कोणतेही औषध, टॅबलेट, कॅप्सूल किंवा सिरप इत्यादी बनवण्यासाठी लागणारा सर्वात मुख्य घटक असतो. किंबहुना ज्याला आपण औषध म्हणतो ते एपीआयमधूनच मिळत असते.
ड्रग्स टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डा (DTAB)ने जून २०१९ मध्ये या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. क्यूआर कोडचा अर्थ असतो क्विक रिस्पॉन्स कोड. कोणतीही माहिती पटकन वाचण्यासाठी हा कोड बनवण्यात आला आहे. कोणत्याही वस्तूंच्या पॅकेजिंग मटेरियरल दिसणाऱ्या बार कोडचेच हे आधुनिक व्हर्जन आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बनावट औषधांची भारत हा तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. भारतीय बाजारपेठेत असलेल्या एकूण औषधांपैकी जवळपास २५ टक्के औषधे ही बनावट किंवा बोनस असल्याची माहिती आहे. एका अहवालानुसार देशातील ३ टक्के औषधांची गुणवत्ता चांगली नसते. एपीआयसाठी भारतीय औषध निर्मिती कंपन्यांना म्हणजे फार्मास्युटीकल्स कंपन्या मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कारण चीनमध्येच एपीआयचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. चीनमधील एपीआय स्वस्त पडत असल्यामुळे जगातील अनेक देश चीनकडून एपीआयची आयात करतात आणि त्यानंतर एपीआयच्या साहाय्याने विविध औषधांची निर्मिती केली जाते.
एपीआयवरील क्यूआर कोडची नक्कल करता येणार नाही. कारण एपीआयवरील क्यूआर कोड हा प्रत्येक बॅच नंतर बदलणार आहे. यामुळे भारताला बनावट किंवा नकली औषधांपासून मुक्त होता येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे मोठाच दिलासा मिळेल.