Restaurant Service Charges: आता रेस्टॉरंटमध्ये जेवण होणार स्वस्त, ग्राहकांना द्यावा लागणार नाही सर्व्हिस चार्ज; सरकारचा नवा आदेश जाणून घ्या

Restaurant Bill : कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर रेस्टॉरंटमध्ये जेवायला (Restaurant Food) जायला सर्वांनाच आवडते. मात्र अलीकडच्या रेस्टॉरंटमधील जेवण महाग होत चालले आहे. तुम्हालादेखील रेस्टॉरंटमध्ये खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज (Restaurant Service Charges)भरावा लागणार नाही. रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकणार नाहीत.

Restaurant Service Charges
रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज  
थोडं पण कामाचं
  • ग्राहकांना आता रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही
  • ग्राहक व्यवहार विभागाने बोलावली 2 जून रोजी मोठी बैठक
  • ग्राहकांचा होणार फायदा, बिल येणार कमी

Restaurant Service Charges update: नवी दिल्ली : कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर रेस्टॉरंटमध्ये जेवायला (Restaurant Food) जायला सर्वांनाच आवडते. मात्र अलीकडच्या रेस्टॉरंटमधील जेवण महाग होत चालले आहे. तुम्हालादेखील रेस्टॉरंटमध्ये खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज (Restaurant Service Charges)भरावा लागणार नाही. रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकणार नाहीत. यावर कडक धोरण घेत ग्राहक व्यवहार विभागाने (Government) 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली असून त्यात हॉटेल, रेस्टॉरंट, त्यांच्याशी संबंधित संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. (Now eating in restaurant will become cheaper as Restaurant Service Charges will be eliminated)

अधिक वाचा : SBI New Feature: स्टेट बॅंकेच्या ग्राहकांचा जबरदस्त फायदा, आता घर बसल्या मिळणार 35 लाखांपर्यंतचे कर्ज...पाहा कसे

2 जूनला होणार मोठी बैठक

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित सिंग असतील. या बैठकीत एनआरएआयलाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याशिवाय झोमॅटो( Zomato),स्विगी (Swiggy),डेलिव्हरी (Delhivery),झेप्टो (Zepto),ओला (Ola), उबर (Uber) सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 23 May 2022 : सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदी मात्र थोडीशी घसरली, पाहा ताजा भाव

निर्णय का घेतला गेला?

वास्तविक, ग्राहक हेल्पलाइनवर या विषयाच्या सततच्या तक्रारींनंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. आमच्या भागीदार वेबसाइट झी बिझनेसने आधीच सांगितले होते की सरकार सर्व प्रकारच्या तक्रारींचे वर्गीकरण करत आहे.

सेवा शुल्क मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत

उल्लेखनीय आहे की, भारत सरकारने 21 एप्रिल 2017 रोजी सेवा शुल्काबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले होते की, अनेक वेळा ग्राहक बिलामध्ये सेवा शुल्क भरल्यानंतरही ते वेटरला स्वतंत्रपणे टिप देतात की बिलातील शुल्क हा कर आहे.चा भाग असेल. त्यात खाद्यपदार्थाची किंमत लिहिली आहे, असे मानले जाते की सेवा ही अन्नाच्या किंमतीशी संबंधित आहे.

अधिक वाचा : Types Of Savings Account : बचत खात्याचे किती प्रकार आहेत? तुमच्यासाठी कोणते सर्वोत्तम असेल, येथे समजून घ्या

बदलती जीवनशैली आणि रेस्टॉरंट

अलीकडच्या काळात रेस्टॉरंटमध्ये कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर जेवायला जाणे हे अतिशय़ कॉमन झाले आहे. बदलत्या जीवनशैलीचा तो एक भाग झाला आहे. मात्र दिवसेंदिवस रेस्टॉरंटमधील जेवण महाग होत चालले आहे. त्यातच वाढत्या महागाईचा फटका त्याला बसतो आहे. अशात ग्राहकांच्या खिशावर मोठाच ताण पडतो आहे. मात्र आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नसल्याचे ग्राहकांच्या खिशावरील बोझा कमी होणार आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना हा एक मोठाच दिलासा असणार आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे रेस्टॉरंट असो की एखाद्या स्टॉलवरील अन्न असो ते महाग होत चालले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढली आहे. दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००३ रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००२.५० रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०२९ रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०५८.५० रुपयांत उपलब्ध होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी