New Labour Codes : नवी दिल्ली : ग्रॅच्युइटी हा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. आता याच आघाडीवर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील कामगार कायद्यांमधील सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच 4 नवीन वेतन संहिता किंवा लेबर कोड (New Labour Codes)आणणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहितांना संमती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकार या नव्या वेतन संहितेची अंमलबजावणी करु शकते. नव्या वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीबाबत (Gratutity) लाभ मिळणार आहे.(Now employees to get gratuity after 1 year of job)
अधिक वाचा : Eknath Shinde : मला तरी मुख्यमंत्री झाल्यासारखं अजून वाटत नाही - एकनाथ शिंदे
नवीन वेतन संहिता किंवा लेबर कोड (Labour Codes) लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ, सुट्ट्या आणि ग्रॅच्युइटीमध्ये बदल होणार आहेत. या नवीन वेतन संहितेअंतर्गत, कामाचे तास आणि आठवड्याचे नियम बदलणार आहेत. त्यानंतर कर्मचार्यांना ग्रॅच्युइटीसाठी कोणत्याही कंपनीत किंवा कार्यालयात 5 वर्षे काम करण्याची सक्ती राहणार नाही. नवीन वेतन कायदा लागू होताच हा नियम लागू होईल. अर्थात सरकारने याबाबत अजून घोषणा केलेली नाही.
सध्या नियमांनुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीत किंवा कार्यालयात 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जातो. या नियमानुसार, ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन त्या महिन्यातील कर्मचाऱ्याच्या पगाराच्या आधारावर केली जाते. कर्मचाऱ्याच्या नोकरीची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो कंपनी सोडतो त्या दिवसाच्या पगाराला कॅल्क्युलेशनमध्ये लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीत 10 वर्षे नोकरी केली. नोकरी सोडताना शेवटच्या महिन्यात त्याचा पगार 50,000 रुपये आहे. यात त्याचे मूळ वेतन म्हणजे बेसिक सॅलरी समजा 20,000 रुपये असेल आणि महागाई भत्ता 6,000 रुपये असेल तर त्याच्या ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन कसे केले जाईल ते समजून घेऊया.
अधिक वाचा : पुण्यात Income Tax अधिकाऱ्याच्या घरी चोरी, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड
वरील माहितीनुसार कर्मचाऱ्याची ग्रॅच्युइटी 26 हजार (Basic And Dearness Allowance) रुपयाच्या आधारे मोजली जाईल. ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन करताना कामाचे दिवस 26 मानले जातात.
त्यानुसार कॅल्क्युलेशन समजून घेऊया,
26,000 / 26 म्हणजे एका दिवसासाठी 1000 रुपये
15x1,000 = 15000
आता पुढील महत्त्वाचा घटक म्हणजे त्या कर्मचाऱ्याने किती वर्षे नोकरी केली. समजा जर त्या कर्मचाऱ्याने 15 वर्षे काम केले असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युइटी अशी असेल,
15X15,000 = 75000 रुपये
त्या कर्मचाऱ्याला एकूण 75,000 रुपये इतकी ग्रॅच्युइटी मिळेल.
लोकसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष काम केले असेल तरी त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल. सरकारने ही व्यवस्था कंत्राटी कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. कारण कंत्राटी कर्मचारी दीर्घकाळ एकाच नोकरीत राहत नाहीत. याशिवाय ग्रॅच्युइटी कायदा 2020 चा लाभ फक्त फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जर एखादी व्यक्ती एका कंपनीसोबत कंत्राटी करारावर काम करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल.
सरकारने नवी वेतन संहिता लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रचनेतदेखील मोठे बदल होणार आहेत.