Cashback Credit Card : नवी दिल्ली : क्रेडिट कार्ड अलीकडच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. अनेकजण क्रेडिट कार्डचा (Credit Card)वापर करताना दिसतात. त्यातच स्पर्धेच्या युगात शॉपिंगवर कॅशबॅकची पद्धतदेखील रुळली आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. एसबीआय कार्डन (SBI Card) 'कॅशबॅक क्रेडिट कार्ड' (Cashback Credit Card)लाँच केले आहे. याचा कार्डधारकांना खूप फायदा होणार आहे. कारण यामुळे कोणत्याही बंधनांशिवाय सर्व ऑनलाइन व्यवहारांवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक प्रति मासिक स्टेटमेंट सायकलसाठी कमाल 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित असणार आहे. (Now enjoy big cashback on newly launched Cashback Credit Card by SBI Card)
अधिक वाचा : बिहारच्या पंकज त्रिपाठी यांना काय आवडते खायला, जाणून घ्या त्यांच्या Lifestyle बद्दल
या संदर्भात, SBI कार्ड्सने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, टिअर II आणि टिअर III शहरांसह संपूर्ण भारतातील ग्राहक 'एसबीआय कार्ड स्प्रिंट' (SBI Card Sprint)या डिजिटल अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मद्वारे घरबसल्या 'कॅश बॅक क्रेडिट' ऑफरसाठी अर्ज करता येईल.
अधिक वाचा : हे प्लान खरेदी करा आणि Free मध्ये घ्या Netflix चा आनंद
एसबीआय कार्डच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 'कॅशबॅक एसबीआय कार्ड ग्राहकांना अमर्यादित 1% कॅशबॅक मिळू शकेल. दरमहा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर याची खातरजमा केली जाणार आहे की ग्राहकांना फायदे मिळवण्यासाठी फक्त काही व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यापुरती मर्यादित राहणार नाही. कॅशबॅक एसबीआय कार्ड कॅशबॅक सुविधेच्या ऑटो-क्रेडिटसह येते. हे स्टेटमेंट जनरेशनच्या दोन दिवसांच्या आत एसबीआय कार्ड खात्यात स्वयंचलितपणे कॅशबॅक जमा करण्यास अनुमती देते.
कार्डचे वार्षिक नूतनीकरण शुल्क 999 रुपये आहे. एका वर्षात किमान 2 लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीवर कार्डधारकांना 999 रुपये वार्षिक शुल्क परत केले जाईल. कॅशबॅक SBI कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असे कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अधिक वाचा : Chinchpokali Chintamani: चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची भाविकाला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping)सुरू झाल्यापासून क्रेडिट कार्डचा (Credit Card) कल वाढला आहे. लोकांना जास्त माहिती न घेता क्रेडिट कार्ड देखील मिळतात. लोकही नकळत वापरतात. बहुतांश ग्राहकांना क्रेडिट कार्डशी निगडीत नियमांची (Credit card rules) माहिती नसते. बँक क्रेडिट कार्डधारकांना दर महिन्याला बिले पाठवते. बँक तुम्हाला बिल भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी देखील देते. परंतु जर तुम्ही शेवटच्या तारखेनंतर पेमेंट केले तर बँक तुमच्याकडून विलंब शुल्क आकारते. जवळपास सर्वच बँकांची लेट फी 500 रुपये आहे. हे शुल्क टाळण्यासाठी, तुम्ही वेळेवर पैसे भरा. जर तुम्हाला बँकांचे भारी शुल्क टाळायचे असेल तर क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरा. तुम्ही किमान रक्कम भरल्यास बँक तुमच्याकडून उरलेल्या रकमेवर भारी शुल्क आकारते. किमान पैसे भरून, तुमची उशीरा फीपासून बचत होते परंतु तुमच्याकडून देय रकमेवर व्याज आकारले जाते. हे शुल्क टाळण्यासाठी, नेहमी पूर्ण पेमेंट करा.