Salary Protection Insurance: आता नोकरी गेल्यावरही दर महिन्याला खात्यात येणार पगार! पगार संरक्षण विम्याचे संपूर्ण गणित जाणून घ्या

Financial Tips : नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षिततेची भीती नेहमीच असते. कोरोनाच्या महामारीनंतर तर अनेकांना बेरोजगार व्हायची वेळ आली. त्यामुळे लोकांमध्ये ही भीती आणखी वाढली आहे. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत पगारदार लोकांसाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'पगार संरक्षण विमा' म्हणजेच सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स हा एक दमदार पर्याय आहे.

Salary Protection Insurance
सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स 
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या
  • नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षिततेची भीती नेहमीच असते
  • पगारदार लोकांसाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'पगार संरक्षण विमा' म्हणजेच सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स हा एक चांगला पर्याय

Salary Protection Insurance : मुंबई : नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षिततेची भीती नेहमीच असते. कोरोनाच्या महामारीनंतर तर अनेकांना बेरोजगार व्हायची वेळ आली. त्यामुळे लोकांमध्ये ही भीती आणखी वाढली आहे. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत पगारदार लोकांसाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'पगार संरक्षण विमा' म्हणजेच सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स (Salary Protection Insurance) हा एक चांगला पर्याय आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. (Now even if you loose your job, you can salary with help of Salary Protection Insurance, check details)

आजकाल बहुतेक आयुर्विमा कंपन्या ही योजना ऑफर करत आहेत. वास्तविक, ही एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी (Term Insurance Plan) आहे. हा प्लॅन नियमित उत्पन्नाची रक्कम देतो. तुम्हालाही ही पॉलिसी घ्यायची असेल तर या प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 07 July 2022: मजबूत डॉलरने केली सोन्याच्या मुस्कटदाबी, सोन्याच्या भाव किंचित वाढला मात्र थांबली घोडदौड

दोन प्रकारे मिळवा फायदे 

या प्रकारच्या टर्म इन्श्युरन्स प्लॅनमध्ये किंवा पॉलिसीमध्ये, ग्राहक त्यांना विम्याची रक्कम कशी घ्यायची आहे याचा पर्याय निवडतात. तुम्ही तुमची रक्कम दोन प्रकारे घेऊ शकता- पहिली नियमित मिळकत आणि दुसरी एकरकमी. ज्या लोकांना गुंतवणुकींदर्भात माहिती नाही किंवा जे जाणकार नाहीत किंवा ज्यांना सुरक्षित परतावा हवा असतो, ज्यांनी जोखीम क्षमता कमी असते असे ग्राहक नियमित उत्पन्न पेआउट पर्यायासह टर्म इन्श्युरन्स पॉलिसी निवडू शकतात.

तुमच्या माहितीसाठी या टर्म प्लॅनमध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ नाही. यामध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, केवळ नॉमिनीला एकरकमी रक्कम एक खात्रीशीर मृत्यू लाभ म्हणून मिळते. वेतन विमा पॉलिसीच्या (Salary Protection Insurance) अटींनुसार, विमाधारकाच्या मृत्यूनंतर ठराविक कालावधीसाठी नियमित देयके दिली जातात. म्हणजेच, तुम्ही हे लक्षात घ्या की हा मुळात नियमित पेआउटसह एक टर्म प्लॅन आहे.

अधिक वाचा : Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

उत्पन्न किती असू शकते?

या अंतर्गत, जर तुम्हाला मासिक उत्पन्न निवडायचे असेल जे तुमच्या कुटुंबाला नियमितपणे मिळावे असे तुम्हाला वाटत असते. ही रक्कम तुमच्या सध्याच्या मासिक टेक-होम उत्पन्नापेक्षा कमी किंवा समान असू शकते. पुढे, तुम्हाला पॉलिसी आणि प्रीमियम भरण्याची मुदत निवडावी लागेल. उदाहरणार्थ, वयाच्या 30 व्या वर्षी (धूम्रपान न करणाऱ्यांसाठी), तुम्ही नियमित प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी 15 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी करू शकता.

अधिक वाचा : SBI : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांनी लगेच अकाउंट चेक करा, बॅंकेने बंद केली असंख्य खाती, या खात्यातील व्यवहार थांबवले...

या पॉलिसीचे संपूर्ण गणित समजून घ्या

तुमच्या मासिक उत्पन्नावर तुमची वार्षिक टक्केवारी वाढवून विमा कंपनी तुम्हाला देऊ शकते. उदाहरणार्थ, जर विमा कंपनी तुम्हाला उत्पन्नावर 6% वार्षिक चक्रवाढ दर देऊ शकत असेल, तर ते मासिक उत्पन्न नेहमीच समान असेल असे नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक पॉलिसी वर्षाची मासिक रक्कम मागील वर्षाच्या मासिक उत्पन्नाच्या 106% असेल. म्हणजेच दरवर्षी त्यात वाढ होत राहील. उदाहरणाने समजून घेऊया-

  1. - समजा तुम्ही पॉलिसी खरेदी करताना 50,000 रुपयांच्या मासिक उत्पन्नाची निवड केली आहे.
  2. -  आता पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षी हे मासिक उत्पन्न 53,000 रुपयांपर्यंत वाढेल.
  3. - त्यानंतर पुढील वर्षी त्याचे मूल्य 56,180 रुपये असेल.
  4. -  आता, उदाहरणार्थ, पाचव्या पॉलिसी वर्षाच्या सुरुवातीला पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला 7.6 लाख रुपयांचा खात्रीशीर मृत्यू लाभ आणि 63,124 रुपये वाढीव मासिक उत्पन्न मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी