आता जलवाहतुकीद्वारे होणार फळे आणि भाजीपाल्याची निर्यात, रेडिएशन पद्धतीचा वापर होणार

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 28, 2022 | 16:44 IST

बऱ्याच वेळा देशातील शेतकऱ्यांचा (Farmers) भाजीपाला (vegetables) आणि फळे (Fruits) खराब होत असतात. विशेषकरुन जेव्हा शेतमालाची (agricultural produce) निर्यात (export) होत असते. तेव्हा भाजीपाला आणि फळांची मोठी नासाडी होत असते. त्यात असे काही फळे असतात जे जास्त दिवस टिकू शकत नाहीत. यामुळे त्यांची निर्यात ही लवकर करावी लागते. जर ते झालं नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. आता यापुढे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची गरज राहणार नाही.

Export of fruits and vegetables will now be done by water transport
आता जलवाहतुकीद्वारे होणार फळे आणि भाजीपाल्याची निर्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रेडिएशन पद्धतीने आंब्याचे शेल्फ लाइफ वाढवल्यानंतर आंबा जलमार्गे अमेरिकेत पोहचला.
  • भाभा अणुसंशोधन केंद्राने रेडिएशन पद्धतीचा वापर करुन 16 टन आंबा अमेरिकेत पाठवला.

नवी दिल्ली :  बऱ्याच वेळा देशातील शेतकऱ्यांचा (Farmers) भाजीपाला (vegetables) आणि फळे (Fruits) खराब होत असतात. विशेषकरुन जेव्हा शेतमालाची (agricultural produce) निर्यात (export) होत असते. तेव्हा भाजीपाला आणि फळांची मोठी नासाडी होत असते. त्यात असे काही फळे असतात जे जास्त दिवस टिकू शकत नाहीत. यामुळे त्यांची निर्यात ही लवकर करावी लागते. जर ते झालं नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. आता यापुढे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची गरज राहणार नाही. कारण या शेतमालाची शेल्फ लाइफ वाढवण्याचे तंत्र विकसीत करण्यात आले आहे. याच्याच मदतीनेच अमेरिकेच्या मार्केटमध्ये फळांचा राजा आंबा, कांदा आणि बटाटासह अनेक फळे आणि भाज्यांनाही जलमार्गे पाठवले जाणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

रेडिएशन पद्धतीने आंब्याचे शेल्फ लाइफ वाढवल्यानंतर आता तो जलमार्गानेही पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नुकतेच भाभा अणुसंशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Center- बार्क) ने जलमार्गाने 16 टन आंबा पाठवण्यात आला, जो 25 दिवसांनी इच्छित स्थळी पोहोचला. बीएआरसीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सर्व आंबे चांगले होते आणि तेथील लोकांच्या हातात केशर आंबा पोहचला.

Read Also : नगरपरिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार- सर्वोच्च न्यायालय

या चाचणीनंतर आता जलमार्गातून फळे आणि इतर खाद्यपदार्थांची निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत डाळिंबासह आणखी अनेक फळे अमेरिका जलमार्गाने पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी केवळ विमानाने पाठवण्याची व्यवस्था आपल्या देशात होती.

Read Also : मंत्रालयापासून काही अंतरावर घडली घटना, दोन पोलिसांचं निधन

संसाधने वाया जाणार नाहीत

भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजीव कुमार यांच्या मते, आंब्यासह अनेक खाद्यपदार्थांचे शेल्फ लाइफ इरॅडिएशनद्वारे वाढवता येते.  अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याची अयोग्य साठवणूक केल्यामुळे देशातील सुमारे 30-40 टक्के अन्नधान्य खराब होते. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी किरणोत्सर्गाचे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. यामुळे बटाटे आणि कांद्याची उगवण रोखता येते. यानंतर, ते 7-8 महिने 15 अंश तापमानात देखील ठेवता येते. या पदार्थांचे शेल्फ लाइफ वाढल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दीर्घकाळापर्यंत भाजीपाला ठेवल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.

भाजीपाला व्यवस्थापनाचा सात पट खर्च कमी होणार

तज्ज्ञांच्या मते, धान्य लवकर खराब होत नाही. दुसरे म्हणजे, अन्नधान्याच्या देखभालीचा खर्चही साठवणुकीच्या तुलनेत आठ पटीने कमी होतो.  सध्या रेडिएशन सेंटरची संख्या कमी आहे. तृणधान्ये आणि कडधान्यांमधील किडींचा त्रासही थांबवता येईल, असे त्यांनी सांगितले. 
मसाल्यांमधील बुरशी किंवा कुजण्याच्या समस्येवरही रेडिएशनमुळे मात करता येते.  यासह, शेल्फ लाइफ एक वर्षापर्यंत वाढवता येते. यासोबतच या रेडिएशन तंत्रज्ञानाने तृणधान्यांचे नवीन प्रकारही तयार केले जात असून त्यामुळे अन्न उत्पादनात वाढ होत आहे. BARC ने आतापर्यंत 56 जाती विकसित केल्या आहेत. किरणोत्सर्ग पद्धतीचा खर्चही किलोमागे एक ते दोन रुपये येतो, जो खूपच कमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी