Gautam Adani Update | अदानींचा झंझावात...अंबानी सोडाच, गुगलच्या संस्थापकांनादेखील टाकले मागे, लवकरच जेफ बेझॉसलाही टाकणार मागे...एका दिवसात कमावले 65 हजार कोटी

Richest Asian : अदानीची एकूण संपत्ती (Adani Wealth) 8.57 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 65,091 कोटी रुपयांनी वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोचले आहेत. एका फटक्यात त्यांनी अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज (Larry Page) आणि गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन (Sergey Brin) यांनादेखील मागे टाकले आहे.

Gautam Adani becomes 6th richest man in world
गौतम अदानी आता जगातील 6व्या क्रमांकाचे श्रीमंत 
थोडं पण कामाचं
  • जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींनी मोठी झेप घेतली आहे, ते सहाव्या क्रमांकावर पोचले आहेत.
  • गौतम अदानींनी जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेले लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन या अमेरिकनादेखील मागे सोडले
  • गौतम अदानी यांची संपत्ती मुकेश अंबानींपेक्षा २०.४ अब्ज डॉलर जास्त असून अंबानी 11 व्या क्रमांकावर आहेत.

Gautam Adani Wealth Rise : नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचा तुफानी झंझावात सध्या सुरू आहे. त्यांची संपत्ती रॉकेट वेगाने वाढत आहे. सोमवारी अदानींच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स वधारले. यामुळे अदानींच्या संपत्तीत (Adani Wealth) 8.57 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 65,091 कोटी रुपयांची भर पडली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोचले आहेत. एका फटक्यात त्यांनी गुगलचे लॅरी पेज (Larry Page) आणि गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन (Sergey Brin) यांनादेखील मागे टाकले आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तर आता अदानींच्या खूपच मागे राहिले आहेत. (Now Gautam Adani becomes 6th richest man in world, made Rs 65,000 crore in a day)

अधिक वाचा : Adani Stocks | अदानीच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सची धूम...शेअरवर पडल्या गुंतवणुकदारांच्या उड्या, काय आहे कारण?

अदानी ग्रीन एनर्जी आता देशातील दहावी कंपनी

अदानीची एकूण संपत्ती या वर्षी 41.6 अब्ज डॉलरने वाढली असून ती इतर टॉप श्रीमंतांमध्ये सर्वाधिक आहे. अदानीं व्यतिरिक्त, केवळ दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची संपत्ती या वर्षी जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये वाढली आहे. बाकीच्या श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे. सोमवारी शेअर बाजारात घसरण होऊनही अदानी समूहाच्या शेअर्सनी 16 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 16.25 टक्क्यांची वाढ नोंदवत बंद झाला आणि बाजारमूल्यानुसार ती देशातील दहावी सर्वात मौल्यवान कंपनी बनली. अदानींच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. अदानी टोटल गॅसमध्ये 10 टक्के, अदानी पोर्टमध्ये 1.83 टक्के, अदानी पॉवरमध्ये 4.78 टक्के, अदानी विल्मरमध्ये 4.99 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 0.37 टक्के आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 8.40 टक्क्यांनी वधारले. UAE च्या इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) तीन समूह कंपन्यांमध्ये प्रेफरेंशियल इश्यूद्वारे 2 अब्ज डॉलर गुंतवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

मुकेश अंबानी राहिले खूपच मागे

दरम्यान, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर कायम आहेत. सोमवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्याच्या एकूण संपत्तीत 48.2 कोटी डॉलर्सची घसरण झाली. 97.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी 11 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 7.45 अब्ज डॉलरने वाढली आहे. मात्र अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत आता 20.4 अब्ज डॉलरचा फरक आहे.

अधिक वाचा : LIC IPO Update | सर्वात मोठ्या आयपीओतून लवकरच करा जोरदार कमाई.... एलआयसी आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता

मस्कची एकूण संपत्ती घसरली

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) 249 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. सोमवारी त्यांची एकूण संपत्ती 11.5 अब्ज डॉलरने घसरली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 176 अब्ज डॉलरआहे. फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनी LVMH Moët Hennessy चे मालक Bernard Arnault (139 अब्ज डॉलर) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (130 अब्ज डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहेत.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिनची संपत्ती घटली

जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे 127 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकन इंटरनेट उद्योजक गुगलचे लॅरी पेज 116 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर घसरले आहेत. Google चे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन 111 बिलियन डॉलरसह आठव्या स्थानावर घसरले आहेत. अमेरिकन उद्योगपती आणि गुंतवणुकदार स्टीव्ह बाल्मर 100 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आणि लॅरी एलिसन 99.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या क्रमांकावर आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी