Gautam Adani World Ranking | गौतम अदानी जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती...109 अब्ज डॉलर संपत्ती; मुकेश अंबानी 11व्या स्थानी

Gautam Adani Wealth : ब्लूमबर्गच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) आता जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. गौतम अदानींची संपत्ती आता 109 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याचबरोबर गौतम अदानी यांनी ओरॅकलचे (Oracle) लॅरी एलिसन आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft)माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांना मागे टाकत आठवे स्थान पटकावले आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ब्लूमबर्गच्या यादीत 11व्या स्थानावर घसरले.

Gautam Adani becomes 8th richest person in the world
गौतम अदानी जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती 
थोडं पण कामाचं
  • ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर इतकी आहे.
  • अदानी पॉवरच्या समभागाने एका महिन्यात 120% वाढ नोंदवली आणि याच कालावधीत अदानी विल्मरने 87% पेक्षा जास्त वाढ केली.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आता जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Gautam Adani Richest Indian : नवी दिल्ली :  ब्लूमबर्गच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) आता जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. गौतम अदानींची संपत्ती आता 109 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याचबरोबर गौतम अदानी यांनी ओरॅकलचे (Oracle) लॅरी एलिसन आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft)माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांना मागे टाकत आठवे स्थान पटकावले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ब्लूमबर्गच्या यादीत 11व्या स्थानावर घसरले आहेत. अंबानींची संपत्ती सध्या 97.7 अब्ज डॉलर इतकी आहे. (Now Gautam Adani becomes 8th richest person in the world with net worth of $109 billion)

अधिक वाचा : Lemon Price | लिंबू देता का हो कोणी लिंबू! 400 रुपये प्रति किलो झाल्याने लिंबू पाणी झाले श्रीमंतांचे पेय...सोने झाले स्वस्त, लिंबू महाग

गौतम अदानींनी घेतली झेप

या वर्षी गौतम अदानींच्या एकूण संपत्तीत 32 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या एका वर्षातील संपत्ती वाढीत ही वाढत सर्वाधिक आहे. अदानी समूह बंदरे आणि एरोस्पेसपासून ते थर्मल एनर्जी आणि कोळशापर्यंतच्या व्यवसायात कार्यरत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि याआधी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी 97.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह निर्देशांकात आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 11व्या स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सनुसार त्यांनी या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये 7.72 अब्ज डॉलरची भर घातली आहे.

अधिक वाचा : Gold Price Today | विक्रमी पातळीवरून स्वस्त झाले सोने...सोने खरेदीची जबरदस्त संधी...पाहा आजचा भाव

अंबानी आणि अदानींमध्ये स्पर्धा

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी समूहाचे प्रमुख 109.8 अब्ज डॉलर संपत्तीसह 8 व्या आणि 9व्या स्थानावर हिंदोळे घेत आहेत. 59 वर्षीय गौतम अदानी त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्तय वाढ झाल्यामुळे थोड्याच अवधीत सहाव्या स्थानावर पोचले होते. मात्र ते लवकरच फोर्ब्सच्या निर्देशांकात 9व्या क्रमांकावर परतले. सध्या मुकेश अंबानी यांनी 98.8 अब्ज डॉलर संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 वे स्थान कायम राखले आहे.  गेल्या काही महिन्यांत, अदानी आणि अंबानी काही अब्जाधीश निर्देशांकांमध्ये अव्वल स्थानासाठी वारंवार मागेपुढे होत आहेत. 

अधिक वाचा : Fuel Price & Inflation | महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, पेट्रोलचे दर ठेवणार नियंत्रणात...

अदानींच्या शेअर्समध्ये तेजी

अंबानी आणि अदानी हे दोघेही पुढील दशकासाठी नियोजित अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह भारताच्या हरित ऊर्जेचे म्हणजे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे नेतृत्व करत आहेत. अदानी पॉवरच्या शेअरच्या किंमतीत एका महिन्यात 120 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर याच कालावधीत अदानी विल्मारच्या शेअरच्या किंमतीत 87 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

थोड्याच दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले होते. गौतम अदानी (Gautam Adani) हे आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Indian) बनले होते. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्तीचे बिरुद पटकावले होते. गौतम अदानींची एकूण संपत्ती आता 100 अब्ज डॉलरवर पोचली असून ते सर्वात श्रीमंत भारतीय बनले होते. याचबरोबर अदानी यांचा सेंटिबिलियनेअर्स (centibillionaire) गटातदेखील सामील झाला आहे. 100 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तीला सेंटिबिलियनेअर म्हणतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी