Gautam Adani becomes Richest Indian : गौतम अदानी (Gautam Adani) हे आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Indian) बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्तीचे बिरुद पटकावले आहे. गौतम अदानींची एकूण संपत्ती आता 100 अब्ज डॉलरवर पोचली असून ते सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. याचबरोबर अदानी यांचा सेंटिबिलियनेअर्स (centibillionaire) गटातदेखील सामील झाला आहे. 100 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तीला सेंटिबिलियनेअर म्हणतात. (Now Gautam Adani is the richest Indian with the net worth of $100 Billion)
अधिक वाचा : Indian Railways update | आरक्षण असूनही बर्थ न दिल्याबद्दल भारतीय रेल्वे, प्रवाशाला देणार एक लाख रुपये
सेंटिबिलियनेअरच्या यादीत अदानी 10 व्या स्थानावर आहेत. तर अंबानी 99 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 11 व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षभरात अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये 23.5 अब्ज डॉलर भर पडली आहे. जगात सर्वाधिक वेगाने संपत्ती वाढणाऱ्या श्रीमंतांमध्ये अदानींचा समावेश आहे. दरम्यान, याच काळात अंबानींच्या एकूण संपत्तीमध्ये 9.03 अब्ज डॉलरची भर पडली होती. बंदरे, ऊर्जा आणि उपयुक्तता, लॉजिस्टिक्स, विमानतळ यासह इतर क्षेत्रांमध्ये उपस्थिती असलेल्या अदानी समूहाचे प्रमुख अदानी यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी वाढ केली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय होण्याच्या स्पर्धेत अंबानी आणि अदानी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. ठराविक काळाने दोघेही एकमेकांना मागे टाकत आहेत.
अधिक वाचा : Pune Real Estate | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करणे होणार महाग...पाहा काय आहे कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतासाठीच्या व्हिजनला अनुसरून हे दोन्ही उद्योगपती हरित आणि अक्षय ऊर्जेवर मोठी गुंतवणूक करत आहेत. गेल्या वर्षी, अंबानी यांनी जाहीर केले होते की रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील तीन वर्षांत नवीन ऊर्जा व्यवसायात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. तेव्हापासून, त्यांच्या कंपनीने या क्षेत्रात अनेक अधिग्रहण केले आहेत. अदानी यांनी गेल्या वर्षी असे जाहीर केले होते की अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असलेला त्यांचा समूह पुढील दशकात अक्षय ऊर्जा निर्मिती, घटक उत्पादन, प्रसारण आणि वितरणामध्ये 20 अब्ज डॉलर गुंतवणूक करेल.
दरम्यान, टेस्लाचे इलॉन मस्क (Elon Musk) हे 273 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यानंतर Amazon चे जेफ बेझोस 188 अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट तिसऱ्या स्थानावर (148 अब्ज डॉलर), तर Microsoft सह-संस्थापक बिल गेट्स चौथ्या स्थानावर (133 अब्ज डॉलर) आहेत.
अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात जबरदस्त मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी समूह अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील दशकभरात करणार आहे. जगातील सर्वात मोठी अपारंपारिक ऊर्जा किंवा रिन्यूएबल एनर्जी (Renewable Energy) कंपनी बनण्यासाठी अदानी समूहाकडून (Adani group) ही गुंतवणूक केली जाणार आहे. पृथ्वीवरील सर्वात स्वस्त हायड्रोजन बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अदानी ग्रीन एनर्जी लि. ही (Adani Green Energy Ltd) अदानी समूहाचीच एक कंपनी जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा (Solar Energy company) कंपनी आहे. अदानी ग्रीन एनर्जीने २०३०पर्यत ४५ गिगावॅट्स अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी २०२२-२३ पर्यत प्रत्येक सौरऊर्जा प्रकल्पातून २ गिगावॅट ऊर्जा निर्मिती करण्यासाठी २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.