आता Aadhaar मध्ये बदल करणं आहे सोपं, नाव, पत्ता आणि जन्म तारखेत सेकंदात होणार बदल

काम-धंदा
भरत जाधव
Updated May 16, 2022 | 12:18 IST

आधार(Aadhaar) विना कोणतेही काम करणे आता अवघड झाले आहे. आधार कार्ड शिवाय आता ऑप्शनच राहिलेला नाही. सरकारी काम असो की, खासगी असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड (Aadhaar Card) जरूरी डॉक्यूमेंट बनले आहे. परंतु अनेकदा घाईघाईत आधार कार्डमध्ये आपली चुकीची माहिती नोंदवली जाते.

Now it is easy to change Aadhaar
आता Aadhaar मध्ये बदल करणं आहे सोपं  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आधार कार्ड आता खूपच आवश्यक डॉक्यूमेंट्स बनले आहे.
  • जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला ती दुरूस्त करणे गरजेचे आहे.
  • प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोरवरून तुम्हाला mAadhaarApp डाउनलोड करावे लागले.

नवी दिल्ली : आधार(Aadhaar) विना कोणतेही काम करणे आता अवघड झाले आहे. आधार कार्ड शिवाय आता ऑप्शनच राहिलेला नाही. सरकारी काम असो की, खासगी असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड (Aadhaar Card) जरूरी डॉक्यूमेंट बनले आहे. परंतु अनेकदा घाईघाईत आधार कार्डमध्ये आपली चुकीची माहिती नोंदवली जाते. आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी या ठिकाणी काही माहिती दिली गेली आहे. तुम्हाला आधार कार्डवरील माहिती, जन्मतारीख (Date of birth), नाव, वर्ष दुरूस्त करायचे असल्यास या ठिकाणी सोप्या ट्रिक्स दिल्या आहेत. 

जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्म तारीख संबंधित कोणतीही चुकीची माहिती लवकर ठीक करायची असेल तर याप्रकारे करा दुरुस्ती.  तुम्ही फक्त mAadhaarApp द्वारे करू शकते. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख संबंधित कोणतीही माहिती सहज दुरूस्त करू शकता. जाणून घ्या घरी बसून mAadhaarApp द्वारे आपली डिटेल्स अपडेट करू शकतात.

आधारमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारखेची दुरूस्त करा

यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोरवरून तुम्हाला mAadhaarApp डाउनलोड करावे लागले. तुम्ही थेट इन लिंकवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोड करा. 
mAadhaar app.
https://tinyurl.com/yx32kkeq (Android)
>> https://tinyurl.com/taj87tg (iOS)

  • यानंतर तुम्हाला रजिस्टर माय आधारवर क्लिक करून आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकावे लागेल. या ठिकाणी OTP मिळेल. ओटीपी मिळाल्यानंतर तुम्ही mAadhaarApp मध्ये लॉग इन करू शकता.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे आधार तुम्हाला अॅपमध्ये दिसले. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव आणि आधार नंबरचे लास्ट ४ डिजिट नंबर दिसतील.
  • यानंतर तुम्ही My Aadhaar वर क्लिक करून या ठिकाणी Aadhaar Update चे कॉलम पाहू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
  • ओटीपी आल्यानंतर तुमच्याकडील अपडेट विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुमचे नाव, पत्ता आणि जन्म तारीख चेंज करू शकता. या अपडेट साठी फक्त ५० रुपये चार्ज आकारले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी