EPFO update : नवी दिल्ली: अनेकदा लोक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत (Job change) नोकरी बदलताना त्यांच्या पीएफची रक्कम ट्रान्सफर (PF Transfer) करायला विसरतात आणि मग बराच कालावधी गेल्यानंतर त्यांना आठवते. मात्र बराच कालावधी उलटल्याने आता ईपीएफ कार्यालयाच्या (EPF Office) फेऱ्या माराव्या लागतील या विचाराने ते चिंताग्रस्त होतात. तुम्ही एक, दोन, तीन किंवा अगदी चार कंपन्या बदलल्या असल्या तरीही तुम्ही जुन्या कंपनीतील पीएफची रक्कम (EPF) शिल्लक तुमच्या विद्यमान कंपनीच्या पीएफ खात्यात (PF Account) हस्तांतरित करू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहजपणे करू शकता. ईपीएफओने (EPFO) ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Now it is easy to transfer amount form the old PF account to current PF account, check the easy online procedure)
तुमची जुनी ईपीएफ शिल्लक नवीन खात्यात हस्तांतरित करण्यासाठी, प्रथम तुमच्याकडे सक्रिय UAN क्रमांक आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की सर्व प्रकारची माहिती तुमच्या UAN क्रमांकामध्ये अपडेट केली जावी, म्हणजे बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, तुम्ही UAN मध्ये अपडेट केले पाहिजे.