Train Ticket Cancellation Update : अरे देवा! आता रेल्वेचे कन्फर्म तिकिट रद्द केल्यावर लागणार जीएसटी...

Railway Ticket Update : कन्फर्म तिकिट रद्द करणे आता महागडे होणार आहे. त्यामुळे यापुढे कन्फर्म तिकिट रद्द करताना विचार करा. आजही लाखो भारतीयांसाठी प्रवासाचे आवडते साधन म्हणजे भारतीय रेल्वे (Indian Railway) हीच आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे उपलब्ध असते. सणासुदीच्या काळात तर ट्रेनच्या तिकिटांची (Train Ticket) मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढते. आपल्याला कन्फर्म सीट मिळावे यासाठी प्रवासा आगाऊ तिकीट बुक करतात.

Confirm Ticket Cancellation
कन्फर्म तिकिट रद्द करण्यावर शुल्क 
थोडं पण कामाचं
  • आजही लाखो भारतीयांसाठी प्रवासाचे आवडते साधन म्हणजे भारतीय रेल्वे (Indian Railway) हीच आहे.
  • सणासुदीच्या काळात तर ट्रेनच्या तिकिटांची (Train Ticket) मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढते.
  • मात्र आता यापुढे कन्फर्म तिकीट रद्द करणे अधिक महाग होणार आहे, कारण त्यावरजीएसटी कर लागू होणार

Railway Ticket Cancellation : नवी दिल्ली : कन्फर्म तिकिट रद्द करणे आता महागडे होणार आहे. त्यामुळे यापुढे कन्फर्म तिकिट रद्द करताना विचार करा. आजही लाखो भारतीयांसाठी प्रवासाचे आवडते साधन म्हणजे भारतीय रेल्वे (Indian Railway) हीच आहे. दररोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे उपलब्ध असते. सणासुदीच्या काळात तर ट्रेनच्या तिकिटांची (Train Ticket) मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढते. आपल्याला कन्फर्म सीट मिळावे यासाठी प्रवासा आगाऊ तिकीट बुक करतात. मात्र काहीवेळा काही प्रवाशांना काही कामामुळे किंवा समस्येमुळे त्यांचा प्रवास पुढे ढकलावा किंवा रद्द करावा लागतो. परिणामी त्यांना कन्फर्म तिकीटदेखील रद्द करावे लागले. जेव्हा कन्फर्म केलेले तिकीट रद्द (Confirm Ticket Cancellation) केले जाते, तेव्हा भारतीय रेल्वे तिकिट रद्द करण्यासाठी शुल्क आकारते. मात्र आता यापुढे कन्फर्म तिकीट रद्द करणे अधिक महाग होणार आहे. कारण त्यावर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी कर (GST) लागू होणार आहे. (Now passengers will have pay GST on Railway ticket cancellation charges)

अधिक वाचा : भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?

अर्थ मंत्रालयाच्या कर संशोधन युनिटने 3 ऑगस्टला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता रेल्वे तिकीट रद्द करणे आणि हॉटेल बुकिंग रद्द करणे यावर जीएसटी आकारला जाणार आहे.

काय लॉजिक आहे जीएसटी लावण्याचे

परिपत्रकात म्हटले आहे की, रेल्वे तिकीट बुकिंग करणे हा एक प्रकारचा करार आहे. यात सेवा पुरवठादार म्हणजे रेल्वे किंवा हॉटेल सेवा प्रदान करण्याची ऑफर देतो. जेव्हा प्रवाशाकडून तिकीट रद्द करून हा करार संपुष्टात आणला जातो, तेव्हा रेल्वेला अल्प रक्कम भरपाई दिली जाते. ही रक्कम रद्दीकरण शुल्क म्हणून आकारली जाते. अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, रद्दीकरण शुल्क हे करार रद्द करण्याच्या विरोधात दिलेले पेमेंट असल्याने त्यावर जीएसटी लागू होईल. कोणत्याही वर्गाच्या रेल्वे तिकिटावरील रद्दीकरण शुल्कास त्या वर्गासाठी बुक केलेल्या तिकिटांप्रमाणेच जीएसटी लागू होईल.

उदाहरणार्थ, प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित डब्याच्या तिकिटांच्या बुकिंगवर 5% जीएसटी कर आकारला जातो. त्यामुळे या वर्गासाठी तिकीट रद्द करण्याच्या रद्दीकरण शुल्कावर देखील 5% जीएसटी शुल्क लागू होईल.

अधिक वाचा : Mumbai Local Train: धावत्या लोकलसमोर अचानक आली एक महिला आणि मग...., मुंबईतील Shocking VIDEO

कधी आणि कशावर किती जीएसटी

ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तिकीट रद्द केल्यास, एसी फर्स्ट क्लास आणि एसी एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी भारतीय रेल्वे 240 रुपये शुल्क आकारते. ही तिकिटे बुक करताना प्रवाशांना 5% जीएसटी भरावा लागतो. अर्थ मंत्रालयाच्या नवीन परिपत्रकानुसार, प्रवाशांना आता रद्दीकरण शुल्कावर त्याच दराने जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे कन्फर्म एसी तिकीट रद्द केल्यावर, प्रवाशाला अतिरिक्त 12 रुपये (प्रति पाच रुपये) द्यावे लागतील. ही रक्कम 240 च्या 5 टक्के जीएसटी म्हणून वसूल केली जाणार आहे.

अधिक वाचा : Mumbai Metro Car shed: कांजूरमार्ग कारशेड भूखंडाचा वाद अखेर संपला, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रवास सुरू होण्याच्या 48 तास किंवा त्याहून अधिक तास आधी एसी 2-टियर तिकीट रद्द करण्यासाठी, रद्दीकरण शुल्क म्हणून 200 रुपये आणि AC 3-टियर तिकिटासाठी 180 रुपये रद्द करणे शुल्क आकारले जाते. जर तिकीटाला प्रवास सुरू होण्यास 48 तासांपेक्षा कमी असेल, परंतु 12 तासांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल, तर तिकिटाच्या किंमतीच्या 25% रद्दीकरण शुल्क म्हणून आकारले जाते. त्याचप्रमाणे, ट्रेन सुटण्याच्या 12 तासांपेक्षा कमी परंतु 4 तासांहून अधिक वेळ राहिल्यावर तिकीट रद्द केल्यास, तिकिटाच्या किंमतीच्या 50% रक्कम शुल्क म्हणून आकारले जाते.

स्लीपर तिकिट रद्द केल्यावर जीएसटी नाही

या परिस्थितीत, तिकीट रद्द करण्यासाठी रद्दीकरण शुल्कावर पाच टक्के दराने जीएसटी देखील आकारला जाईल. पण लक्षात ठेवा, द्वितीय श्रेणीचे स्लीपर तिकीट रद्द केल्यावर जीएसटी आकारला जाणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी