मोठा निर्णय: खासगी कंपन्या, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीमचा फायदा

काम-धंदा
Updated Oct 30, 2020 | 14:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

LTC fare: मोदी सरकारने एलटीसी व्हाऊचर स्कीमचा फायदा आता खाजगी कंपन्या आणि सर्व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. 

money
मोदी सरकारकडून खासगी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय 

थोडं पण कामाचं

  • खासगी कंपन्या आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीमचा फायदा होईल. 
  • या कर्मचाऱ्यांना मान्यता असलेल्या एलटीसी फेअरच्या देय रकमेवर टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • अधिकाधिक ३६ हजार रूपये टॅक्समध्ये सूट दिली जाईल. 

मुंबई: मोदी सरकारने(modi government) आज एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी कंपन्या(private company) आणि सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना(state government employees) याचा फायदा होणार आहे. एलटीसी कॅश व्हाऊचर स्कीममध्ये(ltc cash voucher scheme) जे कव्हर नव्हते ते या निर्णयामुळे कव्हर होणार आहेत. आज केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)खासगी कंपन्या आणि सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मान्य एलटीसी फेअरच्या देयवर टॅक्समध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होते. यानुसार अधिकाधिक ३६ हजार रूपये टॅक्समध्ये सूट दिली जाईल. दरम्यान, यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. 

सीबीडीटीने म्हटले की कर्मचाऱ्यांना टॅक्समध्ये तेव्हाच सूट मिळेल जेव्हा ते २०१८-२१च्या एलटीसीच्या ऐवजी हा पर्याय निवडतील. यासोबतच कर्मचाऱ्यांना एलटीसी फेअरच्या कमीत कमी ३ पट पैसे असे सामान खरेदीवर खर्च करावे लागेल ज्यावर कमीत कमी १२ टक्के जीएसटी लागतो. हे पेमेंट डिजीटल रूपात १२ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान करावे लागेल. तसेच त्या कर्मचाऱ्याकडे जीएसटीनंबर असलेला व्हाऊचर असणेही गरजेचे आहे आणि त्या व्यक्तीने किती जीएसटी भरला आहे याचा पुरावा असणेही गरजेचे आहे. 

जाणून घ्या असे गणित

जर एखाद्याचे एलटीसी फेअर २०,०००x४ =८०,००० रूपये आहे तर त्या व्यक्तीला ८०,००० x३=२,४०,००० इतके पैसे खर्च करावे लागतील. जे कर्मचारी दिलेल्या वेळेत इतके पैसे खर्च करणार त्यांना संपूर्ण एलटीसी फेअर दिले जाईल तसेच त्यावर ते टॅक्समध्ये सूटही मिळवू शकतात. जर त्या कर्मचाऱ्याने केवळ १,८०,००० रूपयेच खर्च केले तर त्या कर्मचाऱ्याला एलटीसी(६०,०००) रूपयेमिळेल आणि कर्मचारी टॅक्सचा फायदा उचलू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी