EPFO Facility | नोकरी बदलल्यावर स्वत:च अपडेट करा 'Date of Exit', ईपीएफओची सुविधा, पाहा प्रोसेस

EPFO Facility | ईपीएफओने पीएफ खातेधारकांना डेट ऑफ एग्झिट (Date of Exit)अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर तो ज्या कंपनीत नोकरी करत होता, ती नोकरी सोडल्याची तारीख, कारण इत्यादी माहिती कर्मचारी स्वत:च अपडेट करू शकतो. दुसऱ्या कंपनीत रुजू होण्यास वेळ असेल तरी पीएफ खातेधारक (PF Account holder)आपल्या खात्यातील माहिती अपडेट करू शकतो.

EPFO Facility
ईपीएफओची खास सुविधा 
थोडं पण कामाचं
 • ईपीएफओची पीएफ खातेधारकांसाठी सुविधा
 • पीएफ खातेधारक स्वत:च अपडेट करू शकतात नोकरी सोडल्याची तारीख
 • डेट ऑफ एग्झिट अपडेट करा काही मिनिटांत

EPFO News:नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी म्हणजे पीएफ खातेधारकांना डेट ऑफ एग्झिट (Date of Exit)अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर तो ज्या कंपनीत नोकरी करत होता, ती नोकरी सोडल्याची तारीख, कारण इत्यादी माहिती कर्मचारी स्वत:च अपडेट करू शकतो. दुसऱ्या कंपनीत रुजू होण्यास वेळ असेल तरी पीएफ खातेधारक (PF Account holder)आपल्या खात्यातील माहिती अपडेट करू शकतो. (EPFO Facility to PF Account holders to update the Date of Exit)

एग्झिट डेट अपडेट करण्याचे महत्त्व आणि सुविधा

ईपीएफशी निगडीत अनेक सुविधांसाठी एक्झिट डेट नोंदवणे आवश्यक असते. आधी एक्झिट डेट नोंदवण्याचा अधिकार कंपन्यांकडे असायचा. मात्र कंपनीकडून डेट ऑफ एक्झिट मार्क न केल्यावर कर्मचारी आवश्यकता भासल्यास पीएफ खात्यातून रक्कम काढू शकत नव्हते. त्याचबरोबर पीएफ खाते ट्रान्सफरदेखील होऊ शकत नव्हते. इथे लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे एग्झिट डेट तेव्हा अपडेट केली जाते जेव्हा कर्मचारी आणि कंपनी या दोघांकडून पीएफचे योगदान जमा करणे बंद होते. ही कंपनीकडून कोणत्याही पीएफ खात्यात योगदान जमा केल्यानंतर दोन महिन्यानंतर नोंदवण्यात येते.

डेट ऑफ एग्झिट अपडेट करण्याची प्रक्रिया

 1. यासाठी सर्वात आधी https://unifiedortal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा.
 2. युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे युएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 3. मॅनेजमध्ये जा आणि मार्क एग्झिटवर क्लिक करा.
 4. सिलेक्ट एम्प्लॉयमेंट ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि आपले ईपीएफ अकाउंट नंबर निवडा.
 5. डेट ऑफ एग्झिटची तारीख आणि कारण नोंदवा.
 6. ओटीपीसाठी रिक्वेस्ट करा आणि आपल्या मोबाइल नंबर आलेला ओटीपी नोंदवा.
 7. आता अपडेटवर क्लिक करा.
 8. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक पॉप अप मेसेज येईल. यामध्ये लिहिले असेलकी डेट ऑफ एग्झिट यशस्वीरित्या अपडेट झाली.
 9. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा. 

आता एलआयसीचा हफ्ता भरा पीएफ खात्यातून

ईपीएफओने पीएफ खातेधारकांना आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नोकरदार किंवा कर्मचाऱ्याचे पीएफ खाते (PF Account) असते. या खात्याचे अनेक फायदे असतात. ईपीएफओकडून (EPFO) पीएफ खातेधारकांना हे फायदे दिले जातात. फक्त दरमहा पीएफ कापला जाऊन या खात्यात जमा होणे एवढ्यापुरतेच हे खाते नसते, तर याचे इतरही अनेक लाभ असतात. असाच एक फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) हफ्ते पीएफ खात्यातूनदेखील भरू शकता. तुमच्या पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा वापर करून तुम्ही हा एलआयसीचा हफ्ता (LIC Premium) भरू शकता.

एलआयसीचा हफ्त पीएफ खात्यातून भरण्यासाठी तुम्हाला ईपीएफओचा फॉर्म १४ डाउनलोड करावा लागेल. कारण ईपीएफओच्या फॉर्म १४ द्वारेच लाइफ इन्श्युरन्स पॉलिसीचे हफ्त पीएफ खात्यातून भरता येतात. त्यामुळे फॉर्म १४ डाउनलोड केल्यानंतर ईपीएफ कमिशनरला तो उद्देशून असावा आणि त्यात आवश्यक असणारी माहिती, ज्यात तुमच्या एलआयसी पॉलिसीचा समावेश असेल ती भरावी. ही सुविधा तोपर्यतच घेता येते जोपर्यत तुम्ही ईपीएफओचे सदस्य असता आणि तुमच्या पीएफ खात्यात एलआयसीचा हफ्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम असली पाहिजे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी