Air Ticket Offer: फक्त 9 रुपयांत विमान प्रवास...या विमान कंपनीने जाहीर केली धमाकेदार ऑफर, बुकिंग सुरू

Air Travel : जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. जिथे तुम्ही फक्त 9 रुपयात हवाई प्रवास (Air Travel)करू शकता. तोदेखील आंतरराष्ट्रीय प्रवास. ऐकून विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरंय, तुम्ही भारत ते व्हिएतनाम दरम्यान फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. आंतरराष्‍ट्रीय विमान कंपनी असलेल्या व्हिएटजेटने ( Vietjet)फक्त 9 रुपयांत हवाई तिकिटांची ऑफर (Vietjet Air Ticket Offer)आणली आहे. त्यासाठीचे बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ही ऑफर 26 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे.

Vietjet Air Ticket Offer
व्हिएटजेटची विमान प्रवासाची ऑफर 
थोडं पण कामाचं
  • व्हिएटजेटने ( Vietjet)फक्त 9 रुपयांत हवाई तिकिटांची ऑफर
  • ऑफरअंतर्गत बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले
  • 4 ते 26 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी करा तिकीट बुकिंग

Vietjet Air Ticket Offer:नवी दिल्ली : जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. जिथे तुम्ही फक्त 9 रुपयात हवाई प्रवास (Air Travel)करू शकता. तोदेखील आंतरराष्ट्रीय प्रवास. ऐकून विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरंय, तुम्ही भारत ते व्हिएतनाम दरम्यान फक्त 9 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. आंतरराष्‍ट्रीय विमान कंपनी असलेल्या व्हिएटजेटने ( Vietjet)फक्त 9 रुपयांत हवाई तिकिटांची ऑफर (Vietjet Air Ticket Offer)आणली आहे. त्यासाठीचे बुकिंग 4 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ही ऑफर 26 ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. म्हणजेच, जर तुम्ही 4 ते 26 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक केले तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. तुम्ही फक्त 9 रुपयांमध्ये भारतातून व्हिएतनामपर्यत प्रवास करू शकणार आहात. (Now travel international destinations in only Rs 9 with the Vietjet Air Ticket Offer)

अधिक वाचा : Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

ऑफर काय आहे?

व्हिएतनामची विमानसेवा कंपनी असलेल्या व्हिएटजेटने (VietJet) दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की VietJet भारत ते व्हिएतनाम प्रवासासाठी 30,000 प्रमोशनल तिकिटे देत आहे. या तिकिटांच्या किमती 9 रुपयांपासून सुरू होतात. यासाठी 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येईल. या एअरलाइन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुक करताना तुम्हाला प्रमोशनल तिकिट मिळू शकतात.

अधिक वाचा : Viral Video : रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी महिला रातोरात झाली फेमस, या Instagram Reel ने केली कमाल

भारत आणि व्हिएतनामसाठी 17 मार्गांसाठी थेट उड्डाणे

व्हिएतनामची विमानसेवा कंपनी असलेल्या व्हिएतजेटचे व्यावसायिक संचालक जय एल लिंगेश्वर यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की व्हिएतजेट भारत आणि व्हिएतनाम दरम्यान 17 मार्गांसाठी थेट उड्डाणे चालवेल. ते भारतातील मुख्य ठिकाणांना आग्नेय आशिया (बाली, बँकॉक, सिंगापूर, क्वालालंपूर), ईशान्य आशिया (सोल, बुसान, टोकियो, ओसाका, तैपेई) आणि आशिया पॅसिफिकशी जोडण्याचा विचार करत आहे. त्यांनी असेही सांगितले की, पाच प्रमुख भारतीय शहरांतील प्रवासी आता थेट दा नांग या सुंदर शहराला भेट देतात आणि नंतर होई एन, ह्यू इम्पीरियल, माय सोन अभयारण्य आणि जगातील सर्वात मोठी गुहा सोन डूंग यासह जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देतात. या सर्व ठिकाणांना जाण्यासाठी तुम्ही फ्लाइट घेऊ शकता. त्याचवेळी व्हिएतनामचे राजदूत फाम सॅन चाऊ म्हणाले की, व्हिएतनाम हे भारतीय पर्यटकांमध्ये एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यापुढे दूतावासात जाण्याची गरज नाही. सध्या व्हिएतनामला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. कोविडनंतर व्हिसाची सरासरी संख्या 24 पटीने वाढून दररोज 6,000 व्हिसा दिले जात आहेत. याआधी हीच संख्या प्रतिदिन 250 इतकी होती.

अधिक वाचा : Mumbai Swine Flu: मुंबईकरांना 'स्वाईन फ्लू'चा धोका, महागड्या लॅब टेस्टमुळे नागरिक त्रस्त

मुंबई आणि नवी दिल्लीला दा नांगची उड्डाणे

VietJet 17 आणि 18 ऑक्टोबरपासून मुंबई आणि नवी दिल्लीला दा नांगशी जोडणाऱ्या पहिल्या दोन थेट सेवा सुरू करणार आहे. व्हिएतनामची विमानसेवा कंपनी असलेल्या व्हिएतजेट 28, 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद येथून दा नांगसाठी आणखी तीन उड्डाणे सुरू करेल. नवी दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद येथून व्हिएतनामच्या आर्थिक आणि पर्यटन केंद्रांसाठी हो ची मिन सिटी, हनोई, दा नांग, फु क्वोक या एअरलाइन्सच्या अतिरिक्त सेवा या सप्टेंबरमध्ये सुरू होतील.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी