UPI Payment Update : इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वीजबिल भरण्यापासून घरबसल्या मिळवा अनेक सुविधा

UPI without Internet : तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अनेक सुविधा सहजपणे ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) सुविधा ही त्यातीलच एक सुविधा आहे. यूपीआयमुळे आर्थिक देवाणघेवाण अत्यंत सुलभ झाली आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नसते किंवा काही तांत्रिक अडचणी येतात मग अशावेळी यूपीआयद्वारे पेमेंट करताना अडचण होते. मात्र आता तुम्ही इंटरनेटशिवायही यूपीआय (UPI) सुविधा वापरू शकता.

UPI payment
यूपीआयद्वारे पेमेंट 
थोडं पण कामाचं
 • यूपीआय सेवा आता घराघरात पोचली आहे
 • इंटरनेटशिवाय आता वापरा यूपीआय सेवा
 • वीजबिल भरणे झाले सोपे

UPI Payment without Internet : नवी दिल्ली : मागील काही वर्षात बॅंकिंग आणि आर्थिक व्यवहारांचे जग पूर्णपणे बदलले आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अनेक सुविधा सहजपणे ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) सुविधा ही त्यातीलच एक सुविधा आहे. यूपीआयमुळे आर्थिक देवाणघेवाण अत्यंत सुलभ झाली आहे. जवळपास प्रत्येकजणच याचा वापर करतो आहे. मात्र यूपीआयद्वारे पेमेंट करायचे म्हणजे इंटरनेट (Internet) हवेच. अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नसते किंवा काही तांत्रिक अडचणी येतात मग अशावेळी यूपीआयद्वारे पेमेंट करताना अडचण होते. मात्र आता तुम्ही इंटरनेटशिवायही यूपीआय (UPI) सुविधा वापरू शकता. इतकेच नाही तर तुम्ही तुमचे मोबाइल बिल इंटरनेट कनेक्शनशिवाय UPI द्वारे भरू शकता. तुम्ही हे सर्व 123PAY UPI सेवेच्या मदतीने करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI)ही यूपीआयचे नियमन करणारी संस्था आहे. या संस्थेने अलीकडेच जाहीर केले आहे की 123PAY वीज बिल भरणा सेवा आता 70 पेक्षा जास्त वीज मंडळांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे 123PAY सेवा आणि भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. या सेवांचा वापर करूनन ग्राहक त्यांचे वीज बिल जलद आणि सहज भरू शकणार आहेत. या सुविधांद्वारे वीज बिल थेट बँक खात्यातून भरता येते. ही सुविधा कशी वापरायची ते पाहूया. (Now use UPI services to pay electricity bill without having internet)

अधिक वाचा  : शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भररस्त्यात चाकूने वार

अशी आहे प्रक्रिया

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI)च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 123PAY ही सुविधा वापरून वीज बिलाचा भरणा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही या प्रक्रियेचा वापर करा. 

 1. वीज बिल भरण्यासाठी पुढील क्रमांकांवर कॉल करा- 080-4516-3666 किंवा 6366 200 200.
 2. सर्वात आधी नवीन ग्राहकांना प्रथम आणले जाईल.
 3. ग्राहकाला वीज बिल भरण्याचा पर्याय निवडावा लागेल.
 4. त्यानंतर ग्राहकाने ज्या वीज मंडळात पेमेंट करायचे आहे त्याचे नाव निवडावे.
 5. आता ग्राहकाला कॉलवर ग्राहक क्रमांक आणि इतर तपशील भरावे लागतील.
 6. त्यानंतर, ग्राहकाला बिलाच्या थकबाकीची माहिती मिळेल.
 7. पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला आता UPI पिन टाकावा लागेल.
 8. यापुढे ग्राहक '080 4516 3666' किंवा '6366 200 200' पेमेंट नंबरवर कॉल करून त्यांचे वीज बिल भरण्यास सक्षम असतील. विशेष म्हणजे या फोन नंबरवर ग्राहक 10 प्रादेशिक भाषांमध्ये बोलू शकतात.

अधिक वाचा - Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

123PAY UPI सेवा नेमकी आहे काय

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फीचर फोनसाठी म्हणजे जे स्मार्टफोनव्यतिरिक्त जे फक्त कीपॅडचा वापर करून वापरले जाणारे फोन असतात त्यांच्यासाठी 123PAY UPI सेवा सुरू करण्यात आली आहे. यूपीआयसारख्या अनेक सुविधांचा वापर फक्त स्मार्टफोनचवर करता येत असल्यामुळे स्मार्टफोन नसणाऱ्यांना ही सुविधा वापरता येत नव्हती. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू केली होती. 123PAY सेवेच्या मदतीने फीचर फोन वापरणारे ग्राहक डिजिटल व्यवहार करू शकतात. या सुविधेमध्ये फोन, मिस्ड कॉल ऑन इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्सच्या माध्यमातून ध्वनी आधारित प्रणालीची मदत घेता येईल. UPI पिन हा 4 ते 6 क्रमांकाचा कोड असतो. हा कोड तुम्ही मोबाईल अॅप किंवा IVR किंवा इतर कोणत्याही चॅनेलवर पहिल्यांदा नोंदणी करताना जनरेट करता. 

अधिक वाचा - Home remedies for pimples: फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज, करा हे उपाय

या नव्या सुविधेमुळे तळागाळात आणि दुर्गम भागातदेखील यूपीआयसारख्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी