Online Fraud : आता होणार नाही तुमची ऑनलाइन फसवणूक, तुमचा कष्टाचा पैसा राहील सुरक्षित; फक्त लक्षात ठेवा या 5 टिप्स...

Digital Transactions : ऑनलाइन व्यवहार करणे हा आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. रोख घेऊन जाण्याऐवजी, लोक आता गुगल पे ( Google Pay), पेटीएम (Paytm), फोनपे (PhonePe) सारख्या अॅप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. तुम्ही UPI अॅपमध्ये नोंदणीकृत व्यक्तीच्या संपर्क क्रमांकावर किंवा फक्त QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकता. मात्र जर तुम्ही या अॅप्सद्वारे पैसे भरले, तर तुम्हाला UPI पेमेंटसाठी सर्व सुरक्षा टिप्स आणि युक्त्या माहित असणे आवश्यक आहे

Online Frauds
ऑनलाइन फ्रॉड कसे टाळावेत 
थोडं पण कामाचं
  • डिजिटल व्यवहार वाढल्याने ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाणदेखील वाढले
  • युपीआय किंवा पेमेंट अॅपचा मोठा वापर
  • ऑनलाइन फ्रॉड टाळण्यासाठी या खास टिप्स वापरा

Tips to avoid online fraud : नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहार करणे हा आता सर्वात पसंतीचा पेमेंट पर्याय बनला आहे. रोख घेऊन जाण्याऐवजी, लोक आता गुगल पे ( Google Pay), पेटीएम (Paytm), फोनपे (PhonePe) सारख्या अॅप्सद्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. तुम्ही UPI अॅपमध्ये नोंदणीकृत व्यक्तीच्या संपर्क क्रमांकावर किंवा फक्त QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकता. मात्र जर तुम्ही या अॅप्सद्वारे पैसे भरले, तर तुम्हाला UPI पेमेंटसाठी सर्व सुरक्षा टिप्स आणि युक्त्या माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे पैसे नेहमी सुरक्षित राहतील. तुम्हाला सतर्क राहण्याची आणि ऑनलाइन किंवा सायबर फसवणुकीपासूनही सुरक्षित राहण्याची गरज आहे. चुकीच्या लिंकवर केलेली एक साधी क्लिक देखील फसवणूक करणार्‍याच्या हाती तुमची सर्व महत्त्वाची माहिती देऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता. (Now you can avoid online fraud with these 5 tips)

अधिक वाचा : Cooperative Banks Update: सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी सरकारने केली मोठी घोषणा, पाहा मिळणार हे फायदे...

ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे. तुम्हाला फक्त एका स्मार्टफोनची आवश्यकता असते. ज्यामध्ये एक ऑनलाइन पेमेंट अॅप डाउनलोड करावे लागते आणि तुमचे बँक खाते तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेले असावे लागते. ते वापरण्यासाठी तुम्हाला अॅपवर नोंदणी करावी लागेल. तुम्ही गुगलपे, फोनपे, पेटीएम इत्यादी कोणतेही अॅप वापरत असाल तर फसवणूक आणि पैशाचे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. UPI पेमेंट करताना लक्षात ठेवायच्या काही टिप्स पाहूया.

UPI पेमेंट करताना लक्षात ठेवण्यासाठीच्या 5 टिप्स-

टीप 1: स्क्रीन लॉक
केवळ तुमच्या फोनसाठीच नाही तर कोणत्याही पेमेंट किंवा आर्थिक व्यवहार अॅपसाठीही मजबूत स्क्रीन लॉक, पासवर्ड किंवा पिन राखणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचा फोन चुकीच्या हातात पडण्याचा धोका टळत नाही तर वैयक्तिक आणि महत्त्वाचे तपशील बाहेर पडण्यापासून देखील रोखली जाते. मात्र तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादीसारखे साधे पासवर्ड टाकणे टाळावे.

अधिक वाचा : PM Kisan Update: पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट, नियमांमध्ये 3 मोठे बदल! जाणून घ्या, नाहीतर होईल नुकसान

टीप 2: तुमचा पिन शेअर करू नका
तुम्ही तुमचा पिन कधीही कोणाजवळदेखील शेअर करू नये. तुमचा पिन शेअर केल्याने तुम्हाला फसवणूक होण्याची शक्यता असते. कारण कोणीही तुमचा फोन अॅक्सेस करू शकतो आणि रक्कम ट्रान्सफर करू शकतो. तुमचा पिन लीक झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो त्वरित बदलला पाहिजे.

टीप 3: अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा फेक कॉलमध्ये सहभागी होऊ नका
अनोळखी किंवा खात्री नसलेल्या लिंक असलेले अनेक बनावट संदेश तुमच्या इनबॉक्समध्ये दिसत राहतील. तुम्ही अशा लिंकवर क्लिक करणे टाळावे कारण यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही फेक कॉल्स देखील टाळले पाहिजेत. कॉलर तुमच्या बँक किंवा इतर संस्थेकडून कॉल करण्याचे नाटक करतो आणि तुम्हाला तुमचे तपशील जसे की पिन, ओटीपी इत्यादी विचारू शकतो. हॅकर्स सहसा लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात आणि ग्राहकांची पडताळणीसाठी थर्ड-पार्टी अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बँका कधीही पिन, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक तपशील विचारत नाहीत.

अधिक वाचा : Petrol-Diesel Price: केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल होणार महाग? जाणून घ्या ताजी घडामोड

टीप 4: UPI अॅप नियमितपणे अपडेट करा
प्रत्येक अॅपला अपडेटची आवश्यकता असते आणि प्रत्येक अपडेट अधिक चांगली वैशिष्ट्ये आणि फायदे आणते. तुम्ही नेहमी UPI पेमेंट अॅप अपडेट केले पाहिजे.

टीप 5: अनेक पेमेंट अॅप्स वापरणे टाळा
तुमच्या फोनवर अनेक पेमेंट अॅप्स वापरणे टाळा आणि केवळ Playstore किंवा App Store वरून विश्वसनीय आणि खातरजमा केलेले पेमेंट अॅप्स डाउनलोड करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी