Gold Coin ATM: नोटा नाही तर या एटीएममधून निघतायेत सोन्याची नाणी, पाहा कसे काम करते हे भन्नाट एटीएम...

Gold Investment : एटीएमचा वापर आपण पैसे काढण्यासाठी करतो. साहजिकच एटीएम (ATM)म्हटले की डोळ्यासमोर 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटा येतात बरोबर ना! मात्र जर आता एटीएममधून नोटांऐवजी सोन्याची नाणीच बाहेर पडू लागली तर? आहे की नाही भन्नाट कल्पना. सुरुवातीला तुम्हाला हे विचित्र वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे.एटीएमचा वापर आता फक्त नोटा काढण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. तनिष्क ज्वेलर्सने 'गोल्ड कॉईन एटीएम' (Tanishq Gold Coin ATM)लॉन्च केले आहे.

Tanishq Gold Coin ATM
तनिष्कचे नवे गोल्ड कॉइन एटीएम 
थोडं पण कामाचं
  • एटीएमचा वापर करून आता नोटांऐवजी घ्या सोन्याची नाणी
  • तनिष्ककडून सोन्याची नाणी देणारे एटीएम सुरू
  • सोन्याची नाणी विकत घेणे आता होणार सोपे

Tanishq Gold Coin ATM: नवी दिल्ली : एटीएमचा वापर आपण पैसे काढण्यासाठी करतो. साहजिकच एटीएम (ATM)म्हटले की डोळ्यासमोर 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटा येतात बरोबर ना! मात्र जर आता एटीएममधून नोटांऐवजी सोन्याची नाणीच बाहेर पडू लागली तर?  आहे की नाही भन्नाट कल्पना. सुरुवातीला तुम्हाला हे विचित्र वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. एटीएमचा वापर आता फक्त नोटा काढण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. तनिष्क ज्वेलर्सने 'गोल्ड कॉईन एटीएम' (Tanishq Gold Coin ATM)लॉन्च केले आहे. हे गोल्ड कॉईन एटीएम सुरू झाल्यानंतर सोन्याची नाणी (Gold Coins) घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. एरवी एटीएमचा वापर आपण पैसे काढण्यासाठी करतो. मात्र आता एटीएमचा वापर करून तुम्हाला सोन्याच्या नाणी घेता येणार आहेत. (Now you can can get gold coins at ATM, check details)

अधिक वाचा :  Gold-Silver Rate Today, 10 May 2022: अस्थिर शेअर बाजाराच्या पार्श्वभूमीवर...सोन्याचा भावात किंचित वाढ, कधी तेजी कधी मंदी...पाहा ताजा भाव

मिळतील 24 कॅरेट सोन्याची नाणी 

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला जर सोन्याची नाणी घ्यायची असतील तर आता तुम्हाला तासनतास गर्दीत थांबावे लागणार नाही. होय, आता जसे तुम्हाला ATM मधून पैसे मिळतात तसेच तुम्हाला गोल्ड कॉइन एटीएममधून (Gold Coin ATM) सोन्याची नाणी मिळतील. तनिष्कने सुरू केलेल्या या एटीएममधून तुम्ही 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅमची 24 कॅरेट सोन्याची नाणी खरेदी करू शकता.

ज्वेलरी शोरूममध्ये एटीएम 

तनिष्कने निवडक 21 ज्वेलरी शोरूममध्ये गोल्ड कॉईन एटीएम बसवले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गोल्ड कॉईन एटीएममधून 25 लाख रुपयांची सोन्याची नाणी बुक करण्यात आली आहेत. हे सोने वितरण मशीन बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते.

अधिक वाचा : QR code scam : सावधान! क्युआर कोडद्वारे पैसे मिळत नाहीत...घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या

गोल्ड कॉइन एटीएम काम कसे करते

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 'तनिष्क गोल्ड कॉइन एटीएम' (Tanishq Gold Coin ATM) बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते, असे सांगण्यात आले. ग्राहकाच्या वतीने सोन्याचे नाणे निवडताना मशीनच्या बाजूने पैशांची माहिती दिली जाते आणि पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पेमेंट केल्यावर, हे मशीन पॅक केलेले सोन्याचे नाणे काढते.

अधिक वाचा :  Social Securities Scheme | अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनांना 7 वर्षे पूर्ण... वैशिष्ट्ये, पात्रता, फायदे तपासा

सोन्यातील गुंतवणूक

सोन्यातील गुंतवणूक ही तुमच्या पोर्टफोलिओचा एक भाग असली पाहिजे. एरवी भारतीय लोक सोन्याचे दागिने घेण्यासाठी वेडे असतात. प्रत्येक घरात सोन्याचे दागदागिने असतातच. मात्र तुम्हाला जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा सोन्याचा वापर गुंतवणूक म्हणून करायचा असेल तर तुम्ही दागिने नाही तर शुद्ध सोने विकत घेतले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला दागिन्यांना लागत असलेली घट द्यावी लागणार नाही. शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही सोन्याची बिस्किटे, वेटोळे किंवा नाणी विकत घेतली पाहिजेत.

सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशात सोन्याच्या मागणीत वाढ होते. दुसरीकडे जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होते आहे. आंतरराष्ट्रीय घटकांमुळे सध्यातरी सोन्याचे भाव अस्थिर दिसून येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी