UPI Lite: आजकाल UPI पेमेंटद्वारे पैसांचा व्यवहार करणे खूप सोईस्कर झाले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे व्यवहार करण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. आजच्या काळात बहुतांश लोक रोख रक्कमेऐवजी UPI पेमेंटचा पर्याय निवडतात. तुम्ही काही सेकंदात QR कोड स्कॅन करून किंवा UPI नंबरद्वारे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे रोख पैसे सोबत ठेवण्याची गरज देखील भासत नाही. (Now You Can do UPI transaction Without Internet, Know What's The Method?)
UPI पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश प्रकरणांमध्ये रोख वापरण्याची गरज नाहीशी झाली आहे. UPI पेमेंटद्वारे तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टी अगदी कॅशलेस विकत घेऊ शकता, त्यामुळे सोबत रोख पैसे जरी नसले तरी कुठेही UPI द्वारे कॅशलेस व्यवहार करू शकतात.
अधिक वाचा : एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतो, पोस्ट ऑफिस की एसबीआय?
तुमच्यासोबत असे अनेकदा झाले आहे का? की तुम्हाला UPI मार्फत व्यवहार करायचा आहे पण इंटरनेट नसल्यामुळे ऑनलाइन पैसे पाठवू शकत नाही. तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. करण, आता तुम्ही ऑफलाइन देखील UPI पेमेंट करू शकता. तुम्ही UPI Lite द्वारे ऑफलाइन UPI पेमेंट करू शकतात. UPI Lite तुम्हाला तात्काळ ऑफलाइन पेमेंट सेवा पुरवेल. चला तर मग जाणून घेऊया
BHIM UPI एपवर UPI Lite सेवा कार्य करते. २०१६ मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ही डिजिटल पेमेंट सेवा लॉन्च करण्यात आली. या डिजिटल पेमेंट प्रणालीचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून एपच्या वॉलेटमध्ये पैसे घेणे गरजेचे आहे. नंतर UPI Lite वापरून, तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये प्री-लोड केलेले पैसे वापरून पेमेंट करू शकता. UPI Lite मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही या पायऱ्या फॉलो करू शकता.
अधिक वाचा : मे महिन्याच्या सुट्टीसाठी स्वस्त आणि मस्त टूरिस्ट डेस्टीनेशन
तुम्ही तुमच्या UPI Lite Wallet मध्ये सर्वाधिक रक्कम 2,000 रु. अॅड करू शकता. त्याचवेळी, तुम्ही UPI पिनशिवाय 200 रुपयांपर्यंतचे रिअल-टाइम पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा UPI पिन टाकण्याची गरज लागत नाही.
सध्या अशा आठ बँका आहेत, ज्या UPI लाइटची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. या बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि इंडियन बँक यांचा समावेश आहे.