Aadhaar Card Latest News: नवी दिल्ली : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे दस्तावेज आहे. आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) डाउनलोड करू शकता. वास्तविक, पूर्वी वापरकर्त्यांना आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक होता. आधार जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ही घोषणा केली आहे. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केलेला नाही किंवा त्यांना त्यांच्या क्रमांकावरून कार्ड डाउनलोड करण्यात कोणतीही अडचण येत आहे. अशांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मोबाईल नंबरशिवाय तुम्ही आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता ते जाणून घेऊया. (Now you can download Aadhar Card without registered mobile number)
UIDAI कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवाय आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची परवानगी देत होती परंतु अहवालानुसार ही प्रणाली बंद करण्यात आली आहे. UIDAI ने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकांना आता आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी पत्त्याचा पुरावा किंवा रहिवासाचा पुरावा द्यावा लागेल. UIDAI ने असेही म्हटले आहे की खालीलपैकी कोणतेही कागदपत्र आधार कार्डमध्ये पत्ता पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात.
अधिक वाचा : IT मिनिस्टरने केलं कन्फर्म, ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होईल 5G सेवा
तुम्ही नवीन ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल आणि तुमचा पत्ता तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करू इच्छित असाल तर तुम्ही तो ऑनलाइन अपडेट करू शकता. आधार कार्ड धारकांनी लक्षात ठेवावे की मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लिंग, छायाचित्र किंवा इतर बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.