Passport Clearance Update: पासपोर्ट मिळणे झाले पूर्वीपेक्षा सोपे... सरकारने केले बदल, उद्यापासून नवा नियम

Passport Police Clearance :पासपोर्ट ही काही आता चैनीची बाब राहिली नाही. मध्यमवर्गीय माणूस आंतरराष्ट्रीय प्रवास करू लागला आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी (Passport) होणाऱ्या अर्जांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशनच्या संख्येतही वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीला लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयाने मोठा निर्णय घेत नियमात बदल केला आहे. त्यामुळे पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे.

Passport police clearance
पासपोर्ट पोलिस क्लिअरन्स 
थोडं पण कामाचं
  • मागील काही वर्षात पासपोर्ट बनवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
  • अनपेक्षित वाढीवर मात करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय
  • पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट सेवांसाठीचे अर्ज आता ऑनलाइन स्वरुपात होणार

Online Passport PCC : नवी दिल्ली : पासपोर्ट ही काही आता फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. मागील काही वर्षात मोठ्या संख्येने सर्वसामान्य माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस आंतरराष्ट्रीय प्रवास करू लागला आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी (Passport) होणाऱ्या अर्जांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस व्हेरिफिकेशनच्या संख्येतही वाढ झाली आहे. पासपोर्ट अर्जांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) ची मागणीही वाढली आहे. या अनपेक्षित वाढीवर मात करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) मोठा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट  सेवांसाठीचे अर्ज भारतभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (POPSKs) उपलब्ध होतील. त्यामुळे पासपोर्ट बनवणे आता खूपच सोपे होणार आहे. (Now you can easily get the passport, government changes the rule)

अधिक वाचा : Diabetes Cause : जीवनशैलीशी निगडीत या 4 कारणांमुळे असतो मधुमेहाचा सर्वाधिक धोका, तुमचे काय?

परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय

परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मंत्रालय पासपोर्ट संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी काम करत आहे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची मागणी वाढली आहे. यासाठी, आता भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये पीसीसी सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा असेल.

अधिक वाचा :  Mumbai Mahalaxmi Temple : नवरात्रौत्सव काळात मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात आहात? मग वाचा ही बातमी

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काय असते

भारतीय पासपोर्ट धारकाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) जारी केले जाते. ज्या लोकांना निवासी स्थिती, नोकरी किंवा दीर्घ कालावधीसाठी व्हिसा मिळवायचा असेल तर तो आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी टुरिस्ट व्हिसावर परदेशात जाण्यासाठी पीसीसीची आवश्यकता नाही.

कोणाला फायदा होणार

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या निर्णयानंतर केवळ परदेशात नोकरी शोधणाऱ्या भारतीय नागरिकांचीच नाही तर पीसीसीच्या इतर गरजांचीही पूर्तता केली जाईल. यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत, दीर्घकाळासाठी व्हिसा इत्यादींचा समावेश असणार आहे.

अधिक वाचा : Vaishno Devi: फ्रेमच्या तुकड्यापासून तरुणाने साकारली वैष्णौ देवीची प्रतिमा, व्हिडीओ व्हायरल

आवश्यक कागदपत्रे-

  1. - सध्याच्या पत्त्याचा पुरावा
  2. - परदेशी कंपनीबरोबर रोजगार कराराची स्वयं-साक्षांकित प्रत
  3. - अधिकृत इंग्रजी भाषांतराच्या सात वैध व्हिसाची प्रत (व्हिसा इंग्रजीत नसल्यास)
  4. - ईसीआर/नॉन-ईसीआरची स्वयं-साक्षांकित छायाप्रत

सरकारने अलीकडच्या काळात पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ आणि अद्ययावत केली आहे. त्याचबरोबर जिल्हापातळीवर पासपोर्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतर सेवांप्रमाणेच या सेवेतदेखील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी लोकांनी आवश्यक कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे पासपोर्ट वेळेवर बनवता येतील, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. अनेक लोक आधार कार्डचा फोटो अपडेट करून अर्ज करत नाहीत. 

तंत्रज्ञानाचा नागरिकांना अजून जास्त फायदा व्हावा याासाठी सरकार नियमित पासपोर्टच्या जागी ई-पासपोर्ट (E-passport) जारी करणार आहे. नागरिकांना  २०२२-२३ च्या सुरुवातीला ई-पासपोर्ट जारी करण्यात येणार असल्याची योजना आहे. रराष्ट्र मंत्रालयाने नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरला (NIC) ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी तांत्रिक जबाबदारी सोपवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी