Railway Ticket : आता ना स्टेशनला जावं लागणार ना एजंटला जास्त पैसे मोजावे लागणार, पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार कन्फर्म ट्रेन तिकीट!

Railway Ticket in Post Office : रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Railway Ticket) मिळणे ही एक अवघड गोष्ट असते. कारण अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात तर सीट मात्र मर्यादित असतात. अशावेळी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी मग रेल्वे एजन्टचा आधार प्रवाशांना घ्यावा लागतो. मात्र आता भारतीय रेल्वेने (Indian Railways)प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी एक नवीन तिकीट व्यवस्था केली आहे.

Railway Ticket in Post Office
पोस्ट ऑफिसमध्ये करता येणार रेल्वे तिकिटाचे बुकिंग 
थोडं पण कामाचं
  • रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते
  • भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली खास सुविधा
  • आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट

Railway Ticket in Post Office : नवी दिल्ली : रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Railway Ticket) मिळणे ही एक अवघड गोष्ट असते. कारण अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात तर सीट मात्र मर्यादित असतात. अशावेळी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी मग रेल्वे एजन्टचा आधार प्रवाशांना घ्यावा लागतो. मात्र आता भारतीय रेल्वेने  (Indian Railways)प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी एक नवीन तिकीट व्यवस्था केली आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्टेशन किंवा एजंटकडे जाण्याची गरज नाही. विशेषत: ग्रामीण भाग लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेने देशभरातील 45,000 पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) तिकीट बुक करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे स्टेशनवर न जातादेखील तिकीट काढता येणार आहे. (Now you can get railway tickets in Post Office also)

अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच खजुराहो येथे ही घोषणा केली. आता रेल्वे तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते. यासाठी रेल्वेने देशभरातील 45,000 पोस्ट ऑफिसमध्ये तिकिटाची व्यवस्था केली आहे, प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय येथून तिकीट काढता येईल. यासोबतच खजुराहो ते दिल्लीदरम्यान वंदे भारत ट्रेनचे अपडेट देताना रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. तोपर्यंत वंदे भारत ट्रेनही सुरू होईल. म्हणजेच ऑगस्टनंतर केव्हाही मध्य प्रदेशला वंदे भारत ट्रेनची भेट मिळू शकते, त्यासाठी पोस्ट ऑफिसमधूनच तिकीट बुक करता येईल, असे गृहीत धरले पाहिजे.

अधिक वाचा : IRCTC Destination Alert Service : आता प्रवाशांना स्टेशन सुटण्याची चिंता न करता झोपता येणार, रेल्वेने सुरू केली वेकअप अलर्ट सुविधा...

ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून सुरू केली सेवा

विशेष म्हणजे स्थानकापासून दूर राहणाऱ्या लोकांची सोय लक्षात घेऊन लोकांना रेल्वे आरक्षणासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षण बुक करण्याचे काम प्रशिक्षित पोस्ट ऑफिस कर्मचारी करतात. नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह हार्डवेअर रेल्वेने प्रदान केले आहेत. या योजनेमुळे केवळ शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील लोकांना जवळपासच्या पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या गाड्यांचे आरक्षण करण्याची सुविधा मिळणार आहे. रेल्वेकडून सध्या पोस्ट ऑफिसमध्ये देण्यात येत असलेल्या रेल्वे आरक्षण बुकिंगच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

अधिक वाचा : Ration Card Update: रेशन घेण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या रेशन कार्डशी संबंधित नवीन तरतुदी

ई-तिकीटिंगची नवीन सुविधा

मात्र, याआधी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनेही ई-तिकीटिंगची नवी सुविधा सुरू केली असून, त्यांना प्रतीक्षा आणि लांबच लांब रांगांपासून मुक्ती दिली आहे. या अंतर्गत रेल्वे प्रवासी आता पेटीएम, फोनपे, फ्रीचार्ज यांसारख्या UPI आधारित मोबाइल अॅप्सवरून QR कोड स्कॅन करून स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीनवर प्रवास तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पासचे नूतनीकरण करण्यासाठी डिजिटल पेमेंट करू शकतील. या सुविधेत प्रवाशांना ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिनमधून उपलब्ध असलेल्या सुविधांसाठी डिजिटल व्यवहारांद्वारे पैसेही भरता येणार आहेत. याद्वारे प्रवासी एटीव्हीएम स्मार्ट कार्ड रिचार्ज देखील करू शकतात. क्यूआर कोड स्कॅन करून, प्रवाशी फोनद्वारे डिजिटल पेमेंट करून तिकीट मिळवू शकतात.

avtm स्मार्ट कार्ड रिचार्ज करू शकता

याशिवाय प्रवासी AVTM स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात. ते स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या प्रवास करायच्या स्टेशनचे तिकीट त्वरित मिळेल. रेल्वेच्या वतीने ही सुविधा सुरू करताना प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने जास्तीत जास्त पैसे भरून लांबलचक रांगांपासून सुटका करण्याचे आवाहन केले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी