Post Office FD Account : आता घरबसल्या उघडा पोस्ट ऑफिस एफडी खाते, पाहा प्रक्रिया

Investment : पोस्ट ऑफिसचे व्याजदरदेखील चांगले असतात. आता तुम्हाला बँकेऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Post Office FD)करायची असेल, तर ते काम तुम्ही घरी बसल्या करू शकता. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी मुदत ठेव योजनेची सुविधा उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या या खास मुदत ठेवींना टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.

Post Office Investment
पोस्ट ऑफिसची गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • पोस्टातील गुंतवणूक आजही लोकप्रिय
  • पोस्ट ऑफिसमधील एफडी योजना
  • पोस्ट ऑफिसचे एफडी खाते कसे सुरू करावे

How to open Post Office FD Account : नवी दिल्ली :  पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आजही सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. सुरक्षित आणि चांगला परतावा देणारे गुंतवणूक पर्याय पोस्ट ऑफिसकडून (Post Office) उपलब्ध करून दिले जातात. पोस्ट ऑफिसचे व्याजदरदेखील चांगले असतात. आता तुम्हाला बँकेऐवजी पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Post Office FD)करायची असेल, तर ते काम तुम्ही घरी बसल्या करू शकता. आता पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन एफडी खाते उघडता येणार आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी मुदत ठेव योजनेची सुविधा उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या या खास मुदत ठेवींना टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये, वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर निश्चित केले असतात. त्यानुसार या मुदतठेवींमध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढीचा लाभही मिळतो. (Now you can open post office FD account online)

अधिक वाचा - Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर व्याज वार्षिक आधारावर दिले जाते. मात्र ते तिमाही आधारावरदेखील दिले जाते.  तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये एका वर्षासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला 5.50% दराने व्याज मिळते. दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.70% व्याजदर आहे. तर 3 वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.80% आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.70% दराने व्याजदर दिला जातो आहे. तुम्हालादेखील पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही हे काम घरबसल्या अगदी सहजपणे करू शकता. 

अधिक वाचा - Home remedies for pimples: फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज, करा हे उपाय

पोस्ट ऑफिसमध्ये FD खाते कसे उघडावे

  1. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते उघडण्याची सुविधा इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाते.
  2. यासाठी तुम्ही नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड वापरून पोस्ट ऑफिस ई-बँकिंग https://ebanking.indiapost.gov.in वर लॉग इन करा.
  3. त्यानंतर 'जनरल सर्व्हिसेस' पर्यायावर जा आणि 'सेवा विनंती' वर क्लिक करा आणि ते उघडा.
  4. मग 'नवीन विनंती' पर्यायावर जा आणि टाइम डिपॉझिट खाते उघडण्यासाठी अर्ज करा.
  5. तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. म्हणजेच तुमचे सक्रिय बचत खाते, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे, सक्रिय डीओपी एटीएम किंवा डेबिट कार्ड आणि मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 
  6. अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पडताळणी केली जाईल.
  7. यानंतर, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे एफडी खाते उघडले जाईल.

अधिक वाचा  : शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भररस्त्यात चाकूने वार

पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन असे उघडा खाते

तुम्हाला जर ऑनलाइन स्वरुपात हे खाते उघडण्यास अडचणी येत असतील तर हे एफडी खाते ऑफलाइन देखील उघडता येते. ऑफलाइन खाते उघडण्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जावे लागेल. तेथे तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडी उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून सर्व आवश्यक माहिती घ्यावी लागेल. आवश्यक ती कागदपत्रे सादर करून तुम्ही तुमचे टाइम डिपॉझिट खाते सुरू करू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी