SIM Card | सरकारचा मोठा निर्णय! तुमच्याकडे या पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास होणार बंद, पाहा का?

SIM Card | दूरसंचार विभागाने (Telecom department) ९ पेक्षा जास्त सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पुन्हा ऑथेटिंकेट करण्यासाठी आणि ऑथेंटिकेट न झाल्यास सिम बंद करण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीर आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांसाठी ही संख्या ६ सिम कार्ड इतकी आहे. दूरसंचार विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार ग्राहकांकडे परवानगीपेक्षा अधिक सिम कार्ड आढल्यास त्यांना आपल्या मर्जीनुसार सिम सुरू ठेवण्याचा आणि उर्वरित सिम कार्ड बंद करण्याचा पर्याय दिला जाईल.

SIM Card resctriction
सिम कार्डच्या संख्येवर मर्यादा 
थोडं पण कामाचं
  • दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय
  • यापुढे ९ पेक्षा जास्त सिम कार्ड ठेवता येणार नाहीत
  • गुन्हेगारी प्रकरणांना आळा घालण्यासाठी उचलले पाऊल

SIM Card | नवी दिल्ली : जर तुम्ही एकापेक्षा जास्त सिम कार्डचा (SIM card) वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दूरसंचार विभागाने (Telecom department) ९ पेक्षा जास्त सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पुन्हा ऑथेटिंकेट करण्यासाठी आणि ऑथेंटिकेट न झाल्यास सिम बंद करण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीर आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांसाठी ही संख्या ६ सिम कार्ड इतकी आहे. दूरसंचार विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार ग्राहकांकडे परवानगीपेक्षा अधिक सिम कार्ड आढल्यास त्यांना आपल्या मर्जीनुसार सिम सुरू ठेवण्याचा आणि उर्वरित सिम कार्ड बंद करण्याचा पर्याय दिला जाईल. (Now you have to close the additional SIM cards with more than 9 SIM cards, Government orders)

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की विभागाकडून करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार जर कोणत्याही ग्राहकाकडे सर्व दूरसंचार कंपन्यांच्या मिळून एकत्रित सिमची संख्या निश्चित करण्यात आलेल्या सिम कार्डपेक्षा जास्त असले तर त्या सर्व सिम कार्डचे पुन्हा ऑथेंटिकेशन केले जाईल. 

यामुळे घेतला निर्णय

विविध गुन्हेगारी प्रकार, आपत्तीजनक कॉल, फसवणुकीचे प्रकार यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांनना त्या सर्व मोबाइल नंबरला डेटाबेसमधून काढण्यास सांगितले आहे ज्यांचा वापर नियमानुसार नाही. 

आता होणार डिजिटल केवायसी, तीदेखील एकदाच

जर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर किंवा टेलीफोन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमचे केवायसी पूर्णपणे डिजिटल असेल. म्हणजेच केवायसीसाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जमा करावे लागणार नाही. पोस्टपेड सिमला प्रीपडे करण्यासारख्या कामांसाठीदेखील आता कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. सर्व डिजिटल केवायसीद्वारे पूर्ण केले जाईल. नव्या नियमांनुसार तुम्हाला सिम देणारी कंपनीच्या अॅपद्वारे सेल्फ केवायसी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त १ रुपया द्यावा लागेल. सध्याच्या नियमानुसार जर एखाद्या ग्राहकाने आपला पीप्रेड नंबर पोस्टपेडमध्ये बदलला तर त्याला प्रत्येक वेळेस केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागते. मात्र आता फक्त एकदाच केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

सेल्फ केवायसी कशी करायची

केवायसीसाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागितली जातात. एरवी जेथून सिम कार्ड घेतले तिथेच हे काम पूर्ण करावे लागते. मात्र जर तुम्ही स्वत:च ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कागदपत्र अपलोड करून आपले केवायसी पूर्ण केले तर याला सेल्फ केवायसी म्हणतात. ही प्रक्रिया वेबसाइट आणि अॅप्लिकेशनद्वारे केली जाऊ शकते. त्यासाठी सर्वात आधी सिम प्रोव्हायडरच्या अॅपला फोनमध्ये डाउनलोड करावे लागते. यानंतर आपला फोन नंबर रजिस्टर करावा लागतो आणि एक पर्यायी नंबरदेखील द्यावा लागतो. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो. यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागते. यामध्ये सेल्फ केवायसीचा पर्याय निवडून मागितलेली माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी