Traffic Rule : आता सर्व कागदपत्रे असतानाही कापले जाणार 2000 चे चलान, कार, मोटारसायकल चालकांनी सावधान!

Traffic Challan : नवीन वाहतूक नियमांनुसार (Traffic rule), तुमच्याकडे वाहनाची सर्व कागदपत्रे असली तरी तुमचे 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. हे कसे होऊ शकते, याबद्दलची माहिती जाणून घ्या. खरेतर, मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), जर तुम्ही वाहनाची कागदपत्रे तपासताना किंवा कोणत्याही प्रकारे वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन केले, तर नियम 179 MVA नुसार, त्याला तुमचे 2000 रु.चे चलान कापण्याचा अधिकार आहे.

New traffic rule
वाहतुकीचे नवे नियम 
थोडं पण कामाचं
  • मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), जर तुमच्या वाहनाची कागदपत्रे तपासली जातात
  • ट्रॅफिक नियमांनुसार पोलिस कर्मचाऱ्यांशी केले जाणारे वर्तनदेखील महत्त्वाचे
  • पोलिसाशी गैरवर्तन केले, तर नियमानुसार तुमचे 2000 रु.चे चलान कापले जाऊ शकते

New Traffic Rule : नवी दिल्ली : नवीन वाहतूक नियमांनुसार (Traffic rule), तुमच्याकडे वाहनाची सर्व कागदपत्रे असली तरी तुमचे 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. हे कसे होऊ शकते, याबद्दलची माहिती जाणून घ्या. खरेतर, मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), जर तुम्ही वाहनाची कागदपत्रे तपासताना किंवा कोणत्याही प्रकारे वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन केले, तर नियम 179 MVA नुसार, त्याला तुमचे 2000 रु.चे चलान कापण्याचा अधिकार आहे. ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याशी (Traffic Police) एखाद्या गोष्टीवरून आपण वाद घालतो आणि तो वाद इतका वाढतो की त्याचे रुपांतर गैरवर्तनात होते, असे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा स्थितीत ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन न करण्याचे भान तुम्ही ठेवले पाहिजे. त्याचबरोबर जर पोलिसाने तुमच्याशी गैरवर्तन केले तर तुमच्याकडे तक्रार करून प्रकरण कोर्टात नेण्याचा पर्याय आहे. (Now you have to pay fine of Rs 2,000 as per new traffic rule even if you have all the documents, check details)

अधिक वाचा : Bank FD : एचडीएफसी, आयसीआयसीआयसह देशातील आघाडीच्या बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतंय ते जाणून घ्या

आता हेल्मेट घातल्यानंतरही 2000 रु.चे चलान कापले जाणार 

नवीन वाहतूक नियमांनुसार, तुम्ही हेल्मेट घातलं असलं तरी 2000 रुपयांचं चलान कापलं जाऊ शकतं. वास्तविक मोटार वाहन कायद्यानुसार, जर तुम्ही मोटारसायकल, स्कूटर चालवताना हेल्मेट पट्टी घातली नसेल, तर नियम 194D MVA नुसार तुमचे 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. शिवाय तुम्ही सदोष हेल्मेट (BIS शिवाय) घातल्यास तुमचे 1000 रुपयांचे चलान 194D MVA नुसार कापले जाऊ शकते. अशा परिस्थितीत हेल्मेट घातल्यानंतरही नवीन नियम न पाळल्याबद्दल तुम्हाला 2000 रुपयांच्या चलनाला सामोरे जावे लागू शकते.

अधिक वाचा : Free Ration Update: मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू, सरकारचे आदेश

चलान कापले गेले आहे की नाही हे कसे समजावे

https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. आता चलानची स्थिती दिसेल.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 20 June 2022: सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदीची वधारली, पाहा ताजा भाव

ट्रॅफिक चलान ऑनलाइन कसे भरायचे

https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चलानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा आणि तपशील मिळवा वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल, ज्यावर चलानचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चलान शोधा. चलनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा आणि पेमेंटची खातरजमा करा. आता तुमचे ऑनलाइन चलान भरले आहे.

भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत, केवळ एएसआय स्तरावरील अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी तुमचे चलान कापू शकतो. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना जागा निश्चित करण्याचे अधिकार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या किंवा वाहनाच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत किंवा वाईट वागू शकत नाहीत. ट्रॅफिक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यावरही कारवाई करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी