Investment in NPS | रोज ४०० रुपयांची बचत करून रिटायरमेंटला मिळवा ३ कोटी रुपये आणि १ लाखांचे पेन्शन, पाहा काय आहे योजना

Investment in NPS | नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)हा एक उत्तम पर्याय आहे. या दरमहिन्याला छोटीशी रक्कम गुंतवून सेवानिवृत्तीच्या वेळेस एक मोठा निधी जमा करता येतो आणि पेन्शनदेखील मिळवता येते.

Investment in NPS
एनपीएसमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)हा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी एक उत्तम पर्याय
  • एनपीएसमधील गुंतवणुकीत इक्विटीचा हिस्सा ७५ टक्के आणि डेटमधील हिस्सा २५ टक्के ठेवता येतो
  • दीर्घकालावधीत १० ते ११ टक्के वार्षिक परताव्याची शक्यता

Retirement Planning | नवी दिल्ली : अनेक नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शनचा (Pension) लाभ मिळत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी रिटारयमेंट प्लॅनिंग (Retirement Planning) किंवा निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन आधीच करून ठेवणे योग्य ठरते. बहुतांश लोक निवृत्तीनंतर हाती आलेल्या रकमेला मुदतठेवींमध्ये गुंतवतात. महागाई लक्षात मुदतठेवींमधून (Fixed Deposit) मिळणाऱ्या व्याजदराने दैनंदिन गरजा भागवणे अवघड होऊन बसते. (Investment in NPS: Daily save Rs 400 & get Rs 3 crore & Rs 1 Lakh Pension, See the Details)

भारतात व्याजदरात कपातीचा ट्रेंड दिसून येतो आहे. त्यामुळे निवृत्त झालेल्या लोकांनी गुंतवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज आणि त्यातून मिळणारे उत्पन्न सातत्याने घटते आहे. निवृत्त झालेल्या व्यक्तींना त्यामुळे आपल्या आर्थिक गरजांसाठी आपले मूळ भांडवल वापरण्याची वेळ येते आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)हा एक उत्तम पर्याय आहे. या दरमहिन्याला छोटीशी रक्कम गुंतवून सेवानिवृत्तीच्या वेळेस एक मोठा निधी जमा करता येतो आणि पेन्शनदेखील मिळवता येते. 

इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक

तुम्ही एनपीएसमधून आपल्या एनपीएसमधील गुंतवणुकीमधून कमाल ६० टक्के रक्कम एकरकमी टॅक्स फ्री स्वरुपात काढू शकतात. तर उर्वरित रक्कम अॅन्युइटीच्या स्वरुपात मिळेल. जर तुम्ही रिटर्न ऑफ प्रीमियमचा पर्याय निवडला तर सरासरी ५ ते ६ टक्क्यांच्या वार्षिक दराने अॅन्युइटी मिळेल. एनपीएस तुम्हाला अनेक फंडांचा पर्याय देते. जिथे तुम्ही डेट आणि इक्विटीमध्ये निवड करू शकता. इक्विटीमध्ये कमाल गुंतवणूक ७५ टक्क्यापेक्षा अधिक करता येत नाही. जर तुम्ही एनपीएसमधील गुंतवणुकीत इक्विटीचा हिस्सा ७५ टक्के आणि डेटमधील हिस्सा २५ टक्के ठेवला तर दीर्घकालावधीत १० ते ११ टक्के वार्षिक परताव्याची अपेक्षा ठेवता येते.

एकरकमी मिळतील ३ कोटी रुपये

जर तुम्ही नोकरीला लागताच एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली तर निवृत्तीपर्यत तुम्ही सहजरित्या ५ कोटी रुपयांपर्यतचा रिटायरमेंट फंड जमा करू शकता. निवृत्तीच्या वयापर्यत म्हणजे वयाच्या ६० वर्षांपर्यत फक्त ४०० रुपये प्रतिदिन किंवा १२,००० रुपये प्रति महिना गुंतवणूक करा. निवृत्तीपर्यत तुम्हाला यातून मोठा निधी उभारता येईल. रिटायरमेंट फंडातून तुम्ही एकरकमी ६० टक्के म्हणजेच जवळपास ३.०५ रुपये काढू शकाल आणि उर्वरित ४० टक्के म्हणजे २.०४ कोटी रुपयांचा उपयोगी अॅन्युइटी विकत घेण्यासाठी करता येईल. ६ टक्के अॅन्युइटी रिटर्नच्या हिशोबाने रिटायरमेंटनंतर तुम्हाला १ लाख रुपयांचे मासिक पेन्शन मिळेल.

८० क अंतर्गत प्राप्तिकरात सूट

एनपीएस खातेधारकाला प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम ८० क अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यत आणि कलम ८०सीसीडी (१बी) अंतर्गत अतिरिक्त ५०,००० रुपयांपर्यत प्राप्तिकरात सूट मिळते. सुरक्षितता आणि चांगला परतावा हे घटक लक्षात घेतल्यावर दीर्घकालीन गुंतवणुकीचा नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक चांगला पर्याय आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी