Falguni Nayar | Nykaa च्या संस्थापक बनल्या स्वककर्तत्वावर बनलेल्या महिला अब्जाधीश

Nykaa Founder Falguni Nayar: नायका या कंपनीची होल्डिंग किंवा प्रवर्तक कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्स (FSN Ecommerce Ventures) या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात (Share Market)आला होता. त्याची जबरदस्त नोंदणी झाल्यानंतर फाल्गुनी नायर यांच्या नावाची जोरदार चर्चा होते आहे. नायका या प्रसिद्ध कंपनीची होल्डिंग कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्स ही कंपनी शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिली महिला नेतृत्व असणारी कंपनी बनली आहे. एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्सचे समभाग भांडवल १ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोचले

Nykaa Founder Falguni Nayar
नायका संस्थापक फाल्गुनी नायर 
थोडं पण कामाचं
  • Nykaa ही कंपनी लाइफस्टाइल उत्पादनांचा व्यवसाय करते
  • फाल्गुनी नायर, त्यांचे पती संजय नायर आणि दोन मुले यांचा एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्समध्ये ५३ टक्के मालकी हिस्सा
  • नायका या कंपनीचा आयपीओ २८ ऑक्टोबरला शेअर बाजारात सुरू आणि १ नोव्हेंबरला बंद

Nykaa Founder Falguni Nayar: मुंबई : नायका या लाइफस्टाइलशी निगडीत उत्पादने विकणाऱ्या कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Nykaa Founder Falguni Nayar) भारतातील सातव्या महिला अब्जाधीश (Woman Billionaire) बनल्या आहेत. तर भारतातील स्वकर्तुत्वावर बनलेल्या पहिल्या महिला अब्जाधीश (first selfmade woman Billionaire))बनल्या आहेत. नायका या कंपनीची होल्डिंग किंवा प्रवर्तक कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्स (FSN Ecommerce Ventures) या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात (Share Market)आला होता. त्याची जबरदस्त नोंदणी झाल्यानंतर फाल्गुनी नायर यांच्या नावाची जोरदार चर्चा होते आहे. कंपनीची बुधवारी शेअर बाजारात नोंदणी झाली आणि कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्सचे समभाग भांडवल १ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोचले आहे. (Nykaa Listing : Nykaa Founder Falguni Nayar becomes India's first selfmade woman Billionaire)

नायकाची शेअर बाजारात नोंदणी

नायका या प्रसिद्ध कंपनीची होल्डिंग कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स वेंचर्स ही कंपनी शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिली महिला नेतृत्व असणारी कंपनी बनली आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर दीड तासाच्या आत नायकाचे बाजारमूल्य ब्रिटानिया, गोदरेज आणि इंडिगोसारख्या कंपन्यांच्या बाजारमूल्याएवढे झाले. नायकाच्या शेअरची किंमत मुंबई शेअर बाजारात ८९ टक्क्यांनी वाढून २,१२९ रुपये झाली. बाजारात नोंदणी होताना नायकाच्या शेअरची किंमत १,१२५ रुपये होती. सध्या कंपनीचा शेअर २,००० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. 

९ वर्षांआधी झाली स्थापना

आधी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असलेल्या फाल्गुनी नायर यांनी ९ वर्षांपूर्वी नायकाची स्थापना केली होती. आज नायकाच्या शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे त्या अब्जाधीश झाल्या आहेत. फाल्गुनी नायर आणि त्यांच्या कुटुंबियांची या कंपनीत ६.५ अब्ज डॉलरची हिस्सेदारी आहे. नायकाची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर फाल्गुनी नायर या भारतातील श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत, त्याचबरोबर त्या स्वकर्तत्वावर बनलेल्या पहिल्या महिला अब्जाधीशदेखील झाल्या आहेत. फाल्गुनी नायय म्हणतात हा व्यवसाय आम्ही विकण्यासाठी निर्माण केलेला नाही. जरी खासगी गुंतवणुकदारांकडून पसंती मिळाली तरी त्या सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीचीच निवड करणार आहेत. फाल्गुनी नायर यांची कंपनीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी आहे. त्यांची दोन मुले अंचित नायर आणि अद्वैता नायरदेखील नायकाच्या व्यवसायात सहभागी आहेत. कुटुंबातील सदस्य जेव्हा एखाद्या व्यवसायात सहभागी होतात तेव्हा त्याचा दीर्घकालीन फायदा होतो.

मागील काही वर्षात नायकाने जबरदस्त मुसंडी मारली आहे. कंपनीची उत्पादने चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. त्यातच डिजिटल इकॉनॉमी आणि डिजिटल स्वरुपातील व्यापार वाढीस लागल्याने नायकाला या बाबींचाही मोठा फायदा झाला आहे. नायकाची शेअर बाजारात जबरदस्त नोंदणी झाल्यामुळे नायका आणि फाल्गुनी नायर यांची जबरदस्त चर्चा उद्योगविश्वात आणि शेअर बाजारात होते आहे. देशातील यशस्वी महिला उद्योजकांमध्ये फाल्गुनी नायर यांचा समावेश झाला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी