एकाचे पन्नास हजार! 'हे' १ रुपयांच्या नोटेचे बंडल विकले जाते आहे ५०,००० रुपयांना, तुमच्याकडे आहे का?

काम-धंदा
Updated May 13, 2021 | 23:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

1 Rupee Note : जर तुम्हाला हे बंडल विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला Coinbazzar या वेबसाईटवर ( website) जावे लागेल.

Old 1 Rupee currency note
१ रुपयांची एक चलनी जुनी नोट  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • जुन्या १ रुपयांच्या नोटेचे बंडल
  • Coinbazzar वर ५०,००० रुपयांनी विक्री
  • जुन्या वस्तूंचे कलेक्सन

नवी दिल्ली :  जर तुम्हाला कल्पना नसेल आणि तुमच्या खिशातून अचानक खूप मोठी रक्कम निघाली तर तुम्हाला साहजिकच आनंद होईल. असेच जर तुमच्याकडे एखादे जुने नाणे असेल किंवा जुनी चलनी नोट असेल आणि त्या नोटेने किंवा नाण्याने तुम्हाला हजारो रुपये मिळवून दिले तर त्याचा आनंद काही निराळाच असेल, हे सांगण्याची आवश्यकता नाही.

अशाच एका नोटेबद्दल जाणून घेऊया जी सध्या चलनात नाही मात्र ती नोट तुमचा जबरदस्त फायदा करून देऊ शकते. अशा जुन्या नोटांची किंवा जुन्या नाण्यांची किंमत किती मोठी आहे, ती किती मूल्यवान आहेत हे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या antiques आणि collectables वर माहित होईल.

१ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाईटवर असे अनेक ग्राहक आहेत किंवा अशी अनेक माणसं आहेत जी जुन्या नोटा किंवा जुनी नाणी विकत घेऊ इच्छितात. फक्त विकत घेऊ इच्छितात इतकेच नव्हे तर त्यासाठी चांगली घवघवीत किंमतदेखील मोजायची त्यांची तयारी असते. असेच एक १ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना विकली जाते आहे.

१ रुपयांच्या नोटेची किंमत


जुन्या चलनी नोटा किंवा नाण्यांच्या ट्रेडिंग किंवा खरेदी-विक्रीची वेबसाईट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या Coinbazzar वर १ रुपयांची जुनी चलनी नोट विकली जाते आहे. या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेवर १९५७चे माजी केंद्रीय अर्थमंत्री हीरूभाई एम पटेल (Former Union Finance Minister Hirubhai M. Patel)यांची सही किंवा हस्ताक्षर आहे. यासोबतच या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेची सीरियल संख्या १२३४५६ अशी आहे. इथे जुन्या १ रुपयांच्या चलनी नोटांच्या बंडलची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे. कॉईनबझारने (Coinbazzar)या १ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंडलवर ५,००० रुपयांचा डिस्काउंट किंवा सूट दिली आहे. यामुळे या जुन्या १ रुपयांच्या नोटांच्या बंडलची किंमत कमी करून ४४,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

जुन्या वस्तूंचे दर्दी रसिक


सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईट उपलब्ध आहेत ज्यावर जुन्या वस्तू, नोटा, नाणी, जुनी शिल्पं, जुनी चित्रे आणि असंख्य प्रकारच्या जुन्या वस्तू विकल्या जातात. अशा जुन्या वस्तूंना दर्दी रसिकांमध्ये मोठी मागणी असते. ते या वस्तूंसाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. त्यामुळे या जुन्या वस्तूंना चांगली घवघवीत किंमतदेखील मिळत असते. तुम्हालादेखील अशा जुन्या वस्तूंची आवड असेल आणि  त्या तुम्हाला मिळवायच्या असतील आणि तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायच्या असतील तर तुम्हीदेखील अशा वेबसाईटना भेट देऊ शकता किंवा तुमच्याकडील जुन्या वस्तू विकून चांगली कमाईदेखील करू शकता.

परदेशात तर या प्रकारच्या जुन्या वस्तू खरेदी करण्याचे आणि आपल्या घरात ठेवायचे मोठे वेडच आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपात अशा दर्दी रसिकांची संख्याही मोठी आहे. शिवाय आर्थिक समृद्धीमुळे ते वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. अशा जुन्या वस्तू, चित्रे, मुर्ती, शिल्पे, नाणी यांचे तिथे लिलावदेखील होत असतात आणि त्या लिलावात मोठमोठ्या बोलीदेखील लावल्या जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी