Old Currency Note | जुनी २ रुपयांची नोट विकून जबरदस्त कमाई, आयएएस अधिकारीही थक्क

Old Currency Note | अलीकडेच सोशल मीडियावर आयएएस अधिकारी असलेल्या जितिन यादव (IAS Officer Jitin Yadav)यांनी एक पोस्ट टाकली. त्यांनी एक ट्विट केले. त्यांनी एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

Earn Money From Old Notes
जुन्या नोटा विकून पैसे कमवा  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • जुन्या नोटा किंवा नाण्यांना (Old Notes & Old coins)जबरदस्त मागणी
  • या नोटा किंवा नाणी काही लोक संग्रह म्हणून ठेवतात
  • दोन रुपयांची ही नोट ९०० रुपयांना विकली जाते आहे

Old Currency Note | नवी दिल्ली: अलीकडे जुन्या नोटा किंवा नाण्यांना (Old Notes & Old coins)जबरदस्त मागणी असल्याच्या आणि त्या विकून लाखोंची कमाई होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पूर्वी चलनात असलेली नाणी किंवा नोटा ज्या आता वापरात नाहीत अशांना खूप मागणी आहे. या नोटा किंवा नाणी काही लोक संग्रह म्हणून ठेवतात. अलीकडे अशा जुन्या नोटा कमाईचे (Earn Money From Old Notes)जबरदस्त साधन झाल्या आहेत. अनेक वेबसाईटवर जुन्या नोटा किंवा नाणी यांची खरेदी किंवा विक्री केली जाते. ज्यांच्याकडे अशा नाण्यांचे किंव नोटांचे चांगले कलेक्शन आहे ते यातून जबरदस्त कमाई करत आहेत. ज्यांना अशा नोटा गोळा करण्याचा छंद आहे ते वारेमाप किंमत देऊन त्या खरेदी करत आहेत. (Old Currency Note: Two rupee note is getting sold for high price, IAS officer shared a post)

आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट

अलीकडेच सोशल मीडियावर आयएएस अधिकारी असलेल्या जितिन यादव (IAS Officer Jitin Yadav)यांनी एक पोस्ट टाकली. त्यांनी एक ट्विट केले. त्यांनी एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये दोन रुपयांच्या एका नोटेची किंमत अनेक पटीने दाखवली आहे. दोन रुपयांची ही नोट ९०० रुपयांना विकली जाते आहे. २८ टक्के सूट दिल्यानंतरची ही किंमत आहे. सूट न देता याची किंमत १२५० रुपये आहे. या आयएएस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

हिरव्या रंगाची नोट

ज्या नोटेच्या विक्रीचा उल्लेख आयएएस अधिकाऱ्याने केला आहे, ती नोट साधीसुधी नोट नाही. ही २ रुपयांची नोट दुर्मिळ आहे. प्रत्येक २ रुपयांच्या नोटांची इथे विक्री होत नाही. जी नोट विकली जाते आहे तिचा रंग हिरवा आहे. शिवाय या नोटेवर पी सी भट्टाचार्य यांची सही आहे. आरबीआयकडून ही नोट जारी करण्यात आली होती. आयएएस अधिकाऱ्याच्या ज्या पोस्टची चर्चा होते आहे त्याने यामध्ये नोटेच्या डिलिव्हरी चार्जबद्दल देखील लिहिले आहे. ही नोट विकत घेण्यावरून अनेक लोकांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

कॉमेंट्सचा पाऊस

एका व्यक्तीने कॉमेंट करताना लिहिले आहे की  खरोखरच या दोन रुपयांच्या नोटेची किंमत ९०० रुपये आहे का. तर अनेकांनी याला राहुल गांधी यांच्या बटाटा आणि सोन्याच्या विधानाशी जोडले आहे. एका व्यक्तीने कॉमेंट केली आहे की नोटबंदी झालेल्या नोटा पुढील ४० ते ५० वर्षांनी करोडपती बनवतील. अलीकडे अनेक नोटा ऑनलाइन विकण्यात येत आहेत. अलीकडेच या नोटांच्या विक्रीसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वेदेखील जाहीर करण्यात आली आहेत. अशावेळी तुमच्या कडे जर जुन्या नोटा असतील आणि त्या विकायच्या असतील तर त्यासंबंधीचे नियम जाणून घ्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी