Manohari Gold tea | एक किलो चहा फक्त ९९,९९९ रुपये प्रति किलो, आसामच्या या चहाने तोडले सर्व विक्रम

Manohari Gold tea Auction | आसामच्या चहाने लिलावाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मनोहारी गोल्ड टी (Manohari Gold tea)हा चहा ९९,९९९ रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी किंमतीवर विकला गेला आहे. गुवाहाटी चहा लिलाव केंद्राचे (GTAC) सचिव प्रियनुज दत्ता यांनी म्हटले आहे की मनोहारी चहा मळ्याने आपला मनोहारी गोल्ड हा चहा प्रकारातील एक किलोग्रॅम चहा सौरभ टी ट्रेडर्सला विकला आहे.

Manohari Gold tea of Assam
आसामचा महागडा मनोहारी गोल्ड टी 
थोडं पण कामाचं
  • आसामचा मनोहारी गोल्ड टी आहे जगभरात प्रसिद्ध
  • हा खास चहा चोखंदळ ग्राहकांसाठी खास उत्पादित केला जातो
  • दरवर्षी हा चहा लिलाव प्रक्रियेत मोडतो आहे विक्रम

Costliest Assam Tea | गुवाहाटी : आसामचा चहा (Assam Tea)एरवी जगभर प्रसिद्ध आहे. आता या आसामच्या चहाने लिलावाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मनोहारी गोल्ड टी (Manohari Gold tea)हा चहा ९९,९९९ रुपये प्रति किलोग्रॅमच्या विक्रमी किंमतीवर विकला गेला आहे. गुवाहाटी चहा लिलाव केंद्राचे (GTAC) सचिव प्रियनुज दत्ता यांनी म्हटले आहे की मनोहारी चहा मळ्याने आपला मनोहारी गोल्ड हा चहा प्रकारातील एक किलोग्रॅम चहा सौरभ टी ट्रेडर्सला विकला आहे. ही किंमत देशातील चहाच्या (Tea)विक्री आणि खरेदीतील, तसेच लिलावातील सर्वात मोठी किंमत आहे. मनोहारी टी एस्टेटचे मालक राजन लोहियाने म्हटले आहे या प्रकारच्या खास प्रीमियम दर्जाच्या स्पेशल चहाची (Special Tea) जागरुक ग्राहकांकडून आलेल्या मागणीच्या आधारावर उत्पादन करतो. (One Kg of Assam Manohari Gold Tea sold at record level of Rs 99,999 per Kg in auction)

असे काय खास आहे मनोहारी गोल्ड चहामध्ये (Speciality of Manohari Gold tea)

मनोहारी गोल्ड टी चे वैशिष्ट्ये असे की हा चहा पानांपासून नाहीतर छोट्या कळ्यांपासून तयार केला जातो. त्यामुळेच या चहाची किंमत इतकी जास्त असते. या चहाची चवदेखील खूपच जबरदस्त असते. चमकणाऱ्या पिवळ्या रंगाच्या या चहाची चव जिभेवर रेंगाळणारी असते आणि शिवाय या चहामध्ये आरोग्याला लाभदायी अनेक गुण असतात. या वैशिष्ट्यांमुळे मनोहारी गोल्ड चहाची वेगळी ओळख आहे. खास दर्दी चहाच्या शौकिनांसाठी याचे उत्पादन केले जाते. आसामचा चहा आपल्या स्वादिष्ट चवीसाठी, सुगंधासाठी आणि रंगासाठी ओळखला जातो. मनोहारी गोल्ड चहा हा आपल्या नावाप्रमाणेच मनाला सुखावणारा, चमकणाऱ्या पिवळ्या रंगाचा आहे. या चहाच्या पानांची पावडर बनवल्यावर एक सोनेरी रंग तयार होतो. ऑक्सिडेशनमुळे या प्रक्रियेदरम्यान हिरवा रंग पिवळसर रंगात रुपांतरित होतो. तर सुकल्यावर या चहाच्या कळ्या सोनेरी होतात आणि मग त्यांना काळ्या पानांपासून वेगळे केले जाते.

काही महिन्यातच तोडला स्वत:चा विक्रम

जुलै २०१९ मनोहारी गोल्ड टी जीटीएसीच्या लिलाव प्रक्रियेत ५०,००० रुपये प्रति किलोच्या भावावर विकला गेला होता. ही त्यावेळपर्यत उच्चांकी किंमत होती. मात्र त्यानंतर महिनाभरातच हा विक्रम मोडला. अरुणाचल प्रदेशातील डोनी पोलो टी इस्टेटद्वारे निर्मिती गोल्डन नेडल्स टी आणि आसामच्या डिकॉन टी इस्टेटच्या गोल्डन बटरफ्लाय टीचा लिलाव होत त्यांना ७५,००० रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. इतकेच नाही तर २०१८ मध्ये या स्पेशल व्हरायटीचे उत्पादन सुरू झाल्यापासून मनोहारी गोल्ड चहाचा जबरदस्त मागणी आहे. जगभरात हा चहा लोकप्रिय झाला आहे. प्रत्येक वर्षी लिलाव प्रक्रियेत हा चहा विक्रम मोडतो आहे. आरोग्यासंदर्भात जागरुक असणारे ग्राहक या चहाची मागणी करतात.

आसाम हे चहाचे आगार म्हणून ओळखले जाते. आसामचा भूगोल आणि येथील हवामान यामुळे इथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. आसामचा चहा जगप्रसिद्ध असून त्याची मोठ्या  प्रमाणात निर्यात होते. इथे अनेक कंपन्यांचे चहाचे मळे असून चहाच्या असंख्य प्रकारांचे उत्पादन केले जाते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी