वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, १ डिसेंबरपासून लागू होणार 'हा' नियम

काम-धंदा
Updated Nov 04, 2019 | 18:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

येत्या १ डिसेंबरपासून देशभरात नवा नियम लागू होणार आहे. या नियमामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. जाणून घेऊयात काय आहे हा नियम आणि काय होईल त्याचा फायदा.

one nation one fastag scheme december 1 national highway nitin gadakari news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • १ डिसेंबरपासून देशभरात लागू होणार नवा नियम
  • वाहनचालकांची टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका
  • जाणून घ्या काय आहे फास्टॅग पद्धत आणि काय होणार त्याचा फायदा

One Nation One Fastag: केंद्र सरकारने येत्या १ डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग सारखी इलेक्ट्रॉनिक टोल वसुली लागू करत आहे. वन नेशन वन फास्टॅग (one nation one fastag) या अंतर्गत वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत. ही स्कीम लागू झाल्यावर संपूर्ण देशभरात कोठेही वाहनांना कॅश दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन प्रवास करता येणार आहे.

फास्टॅग म्हणजे काय?

फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. फास्टॅग वाहनांच्या पुढील बाजुला लावले जाणार आहे. गाडीवर फास्टॅग असल्यास देशभरातील टोल नाक्यांवर कुठल्याही प्रकारचे पैसे न देता वाहन तुम्ही घेऊन जाऊन शकता. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावलेले असतं. ज्यावेळी वाहन टोल नाक्याच्याजवळ पोहोचतं तेव्हा तेथील सेंसर कारच्या स्क्रीनवर लावलेलं फास्टॅग सेंस करतं आणि तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतात. त्यामुळे एकदा हे पैसे संपल्यावर तुम्हाला फास्टॅग पुन्हा रिचार्ज करावं लागणार.

कसं मिळणार फास्टॅग?

केव्हायसी (KYC) साठी आवश्यक आयडी प्रूफ म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यावर तुम्हाला फास्टॅग अकाऊंट तयार करता येणार आहे. यासोबतच एक पास्टपोर्ट साइज फोटो सुद्धा आवश्यक आहे. फास्टॅग सर्व टोल नाक्यांवर किंवा बँकांकडून ऑनलाइन खरेदी करता येणार आहे.  वन-टाइम टॅग डिपॉझिटची रक्कम जमा केल्यावर तुम्ही फास्टॅग मिळवू शकता. कार, जीप आणि व्हॅनसाठी ही रक्कम २०० रुपये इतकी आहे तर ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी ५०० रुपये इतकी आहे. 

काय होणार फायदा?

फास्टॅग वाहनांवर लावले असल्यास टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत आणि याचा परिणाम म्हणजे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...