Onion Rate : कांदा अजून स्वस्त होणार, केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टन कांदा बाजारात आणणार

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 04, 2021 | 17:32 IST

Onion Rate : पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचा भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे.

Onion will become cheaper,
Onion Rate : कांदा अजून स्वस्त होणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes

Onion Rate : मुंबई :  पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचा भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्याने कांदा अजून स्वस्त होणार होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून 1.11 लाख टन कांदा बाहेर काढला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 5 ते 12 रुपये किलोने भाव उतरले आहेत. हा बफर स्टॉकमधील कांदा महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या स्थानिक बाजारांमध्ये कांदा पाठवण्यात आला होता. याशिवाय दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्येही पाठवण्यात आला होता,असं बुधवारी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

प्रशासनानं जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटलंय की, "बफर स्टॉकमार्फत कांद्याच्या किमती स्थिर करण्यात येत आहेत. कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम समोर आले आहेत." कांद्याच्या किमती आता गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वस्त आहेत. कारण या प्रमुख भाजीची सरासरी अखिल भारतीय किरकोळ किंमत 40.13 रुपये प्रति किलो आहे, तर घाऊक बाजारात 31.15 रुपये प्रतिकिलो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी