TCS update | आठवड्यातून फक्त ३ दिवस कार्यालयात जावे लागणार, पगारही वाढणार, देशातील मोठ्या कंपनीने केली घोषणा

TCS working culture : देशव्यापी लॉकडाऊनच्या वेळी वर्क फ्रॉम होम (Work form home) पद्धत सुरू करण्यात आली होती. मात्र परिस्थिती सुधारत असल्याने बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली आहे. आता याच क्रमाने देशातील आघाडीची IT कंपनी आणि टाटा समूहाचा (Tata Group) मुकुटमणी असलेल्या टीसीएसने देखील (TCS) (Tata Consultancy Services) आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली आहे.

TCS declares new working culture
टीसीएसची कर्मचाऱ्यांसाठी नवी कार्य पद्धती 
थोडं पण कामाचं
  • लॉकडाऊनच्या वेळी वर्क फ्रॉम होम (Work form home) पद्धत सुरू करण्यात आली
  • मात्र परिस्थिती सुधारल्याने बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली
  • टीसीएसने देखील (Tata Consultancy Services) आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली आहे.

TCS new work culture : नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनच्या वेळी वर्क फ्रॉम होम (Work form home) पद्धत सुरू करण्यात आली होती. मात्र परिस्थिती सुधारत असल्याने बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली आहे. आता याच क्रमाने देशातील आघाडीची IT कंपनी आणि टाटा समूहाचा (Tata Group) मुकुटमणी असलेल्या टीसीएसने देखील (TCS) (Tata Consultancy Services) आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कंपनीने आदेश जारी केला आहे. (Only 3 days in office, slary hike also, TCS declares new working culture)

अधिक वाचा : Retail Inflation update | महागाईचा जबरदस्त दणका! पोचली 6.95 टक्क्यांवर, तिसऱ्यांदा आरबीआयच्या टार्गेटबाहेर

फक्त वरिष्ठच कार्यालयात जाणार 

प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार, टीसीएसमध्ये सध्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र कार्यालयात बोलावले जाणार नाही. सध्या कंपनीच्या उच्च स्तरावरील केवळ 50 हजार कर्मचारीच कार्यालयात जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ ३ दिवस कार्यालयात जावे लागणार आहे. उर्वरित दोन दिवस या कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागणार आहे.

टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले की, “या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कंपनीचे वरिष्ठ सहकारी कार्यालयात यायला सुरुवात करतील. कार्यालयात बोलावल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल. या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच जून-जुलैपर्यंत बहुतांश कर्मचारी (80 टक्के) कार्यालयातून काम करू लागतील.

अधिक वाचा : Gautam Adani Update | अदानींचा झंझावात...अंबानी सोडाच, गुगलच्या संस्थापकांनादेखील टाकले मागे, लवकरच जेफ बेझॉसलाही टाकणार मागे...एका दिवसात कमावले 65 हजार कोटी

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ 

टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन पुढे म्हणाले की, 2022-23 या चालू आर्थिक वर्षात टीसीएस आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात 6-8 टक्के वाढ करेल. कंपनीने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

नवीन कर्मचाऱ्यांची भरती

हे लक्षात घेण्यासारखे आहे की टीसीएसने गेल्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 35,209 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तुम्हाला माहित आहे का की कोणत्याही कंपनीने एका तिमाहीत केलेली ही सर्वाधिक नोकरभरती आहे. सध्या टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ५,९२,१९५ वर पोचली आहे.

करियरसाठीच्या भारतातील सर्वोत्तम कंपन्या

लिंक्डइनने (LinkedIn) नुकतीच भारतातील टॉप कंपन्यांची यादी जाहीर केली. या यादीत भारतातील 25 सर्वोत्कृष्ट कंपन्यांची (Top Companies in India) माहिती दिली आहे ज्या काम करण्यासाठी किंवा करियरसाठी सर्वोत्तम आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जसजसे वेगाने वाढते आहे, तसतसे आयटी कंपन्या यात आघाडी घेत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एक्सेंचर (Accenture)आणि कॉग्निझंट (Cognizant)या यादीत अनुक्रमे पहिल्या तीन कंपन्या आहेत. भारतातील टॉप कंपन्यांची यादी बनवण्यासाठी LinkedIn ने सात श्रेणींमध्ये माहिती तपासली. यात प्रगती करण्याची क्षमता, कौशल्य वाढ, कंपनी स्थिरता, बाह्य संधी, कंपनीची आत्मीयता, लैंगिक विविधता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी या घटकांचा समावेश आहे. यात बहुतांश कंपन्या या आयटी कंपन्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी