मुंबईत आता दिसणार फक्त इलेक्ट्रिक बसेस

बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण २१०० नव्या इलेक्ट्रीक बसेस दाखल होत आहेत.  ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे.

 मुंबईत आता दिसणार फक्त इलेक्ट्रिक बसेस
Only electric buses will be seen in Mumbai now 
थोडं पण कामाचं
  • 2100 ई-बससाठी BEST कडून लेटर ऑफ अवार्ड प्राप्त, पुढच्या वर्षभरात  एकूण २१०० बसेस धावणार  मुंबईच्या रस्त्यावर 
  • 2100 ई-बससाठी BEST कडून लेटर ऑफ अवार्ड प्राप्त 
  • या कराराचे एकूण मूल्य रु.3675 कोटी, पुढील 12 महिन्यांत या बसेसचा पुरवठा बेस्टला केला जाणार

मुंबई : बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण २१०० नव्या इलेक्ट्रीक बसेस दाखल होत आहेत.  ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे. ह्या मागणीचे  मूल्य रु.3675 कोटी आहे. Evey Trans Private Limited (EVEY) ला BEST कडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झाले आहे. 

या आदेशानुसार  12 वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/Opex मॉडेलवर 2100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येईल. 12 महिन्यांच्या कालावधीत बसेस वितरित केल्या जातील. ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल देखील कराराच्या कालावधीत करेल. 

इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये अग्रगण्य  कंपनी असलेली  ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या करारानुसार 12 मीटर एसी बसेस पुरवणार आहे. मुंबईत बेस्टसाठी आधीच कंपनीच्या ४० इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. सध्या, EVEY आणि Olectra Greentech Limited देशातील विविध राज्य परिवहन उपक्रम (STU) मध्ये इलेक्ट्रिक बस चालवत आहेत.   पुणे (PMPML), हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, आणि अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस अतिशय उत्तम सेवा बजावत आहेत .

या प्रसंगी बोलताना  श्री के.व्ही. प्रदीप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड म्हणाले की "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून ही सर्वात मोठी ऑर्डर मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस फ्लीट चालवणे ही बाब आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही वेळापत्रकानुसार बसेस देऊ आणि मुंबईतील नागरिकांना उत्तम प्रवासाचा अनुभव देऊ."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी