ITR Filing last date | नवी दिल्ली : देशभरातून तीन कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax returns) (ITRs) दाखल केले आहे. प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) नव्या पोर्टलचा (new portal) वापर करून हे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Finance Ministry)दिली आहे. ज्या लोकांनी (taxpayers) २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलेले नसेल त्यांनी ले लवकरात लवकर भरावे असे आवाहन अर्थमंत्रालयाने केले आहे. दररोज जवळपास ४ लाख आयटीआर फाइल केले जात आहेत. यात रोज वाढ होते आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ ही आहे. (Over 3 crore income tax returns filed on new portal, 31st December is last date)
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीच्या आयटीआर फायलिंगमध्ये वाढ होत ती संख्या ३.०३ कोटींवर पोचली आहे. यात ५८.९८ टक्के आयटीआर १, ८ टक्के आयटीआर २, ८.७ टक्के आयटीआर ३, २३.१२ टक्के आयटीआर ४, आयटीआर ५, आयटीआर ६ आणि आयटीआर ७ यांचा समावेश आहे. ५२ टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांनी ऑनलाइन पोर्टलचा वापर करून आयटीआर फाइल केले आहे. तर उर्वरित करदात्यांनी ऑफलाइन स्वरुपात दाखल केले आहे.
२.६९ कोटी रिटर्न्सचे ई-व्हेरिफिकेशन झाले अशून २.२८ कोटी ई-व्हेरिफिकेशन हे आधारवर आधारित ओटीपीवर करण्यात आले आहेत. आयटीआर फायलिंग, आयटीआर व्हेरिफिकेशन आणि रिफंड यांची प्रक्रिया जोरात असून मोठ्या प्रमाणात करदात्यांनी आयटीआर दाखल केले आहेत. प्राप्तिकर विभाग करदात्यांना ईमेल्स, एसएमएस आणि मीडिया कॅम्पेनद्वारे त्यांचे आयटीआर फायल करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. ३१ डिसेंबर २०२१ ही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. शेवटच्या क्षणी धावपळ करण्याऐवजी करदात्यांनी वेळेत आपले आयटीआर रिटर्न दाखल करावे असे अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये वारंवार येत असलेल्या अडचणींमुळे सरकारने आयटीआर फायलिंगची मुदत वाढवली होती. नव्या पोर्टलमधील बऱ्याचशा अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. मात्र जरी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकत असलात तरी जर उत्पन्न करपात्र असेल तर भराव्या लागणाऱ्या करावर (Income Tax) तुम्हाला दंड द्यावा लागेल. हा दंड एक टक्का दर महिना या पद्धतीने आकारला जाणार आहे. अर्थात हा दंड तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही भरायचा प्राप्तिकर १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
इन्कम टॅक्स किती जमा करायचा हे दोन पद्धतीने ठरणार आहे. यातील पहिली पद्धत किंवा पर्याय इंडिव्हिज्युअल बिझनेस कॅटेगरीमध्ये येणाऱ्यांसाठी आहे. तर दुसरी श्रेणी जे लोक नोकरदार आहेत, एखाद्या कंपनीत नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी आहे. पहिल्या प्रकारात प्राप्तिकर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. तर दुसऱ्या श्रेणीसाठी प्राप्तिकर भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. अर्थात दोन्ही प्रकारात पेंडिंग टॅक्स म्हणजे न भरलेल्या प्राप्तिकराची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त असली पाहिजे.