Interest Free Banking System: अबब! लोकांना मिळणार 0% दराने कर्ज! आपल्या या शेजारी देशात व्याजच भरावे लागणार नाही, सरकारची मोठी घोषणा

Banking System : जर तुम्हाला कर्जावर व्याजच द्यावे लागले नाही तर धमाल येईल ना. बॅंकेकडून वार्षिक 0 टक्के (0%) दराने कर्ज (Zero interest loan) मिळाल्यास ग्राहकांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी याहून अधिक आनंदाची बातमी असणार नाही. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) ही प्रणाली लवकरच लागू होऊ शकते. पाकिस्तान सरकारने शून्य व्याजाच्या कर्ज देणाऱ्या बॅंकिंग व्यवस्थेची घोषणा केली आहे.

Pakistan banking system
पाकिस्तानातील बॅंकिंग व्यवस्था 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानात इस्लामिक पद्धतीने बॅंकिंग व्यवस्था येणार
  • कर्जावर व्याज आकारले जाणार नाही
  • फेडरल शरीयत न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारची घोषणा

Pakistan Interest Free Banking System : नवी दिल्ली : कर्ज म्हटले की आपल्यासमोर सर्वात आधी प्रश्न येतो व्याजदराचा. कारण किती व्याज द्यावे लागणार यावरच ठरते की ते कर्ज घ्यायचे की नाही. मात्र जर तुम्हाला कर्जावर व्याजच द्यावे लागले नाही तर धमाल येईल ना. बॅंकेकडून वार्षिक 0 टक्के (0%) दराने कर्ज (Zero interest loan) मिळाल्यास ग्राहकांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी याहून अधिक आनंदाची बातमी असणार नाही. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) ही प्रणाली लवकरच लागू होऊ शकते. याबाबत चर्चा करताना पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार यांनी सांगितले आहे की, इस्लामिक कायद्यानुसार पाकस्तान 2027 पर्यंत व्याजमुक्त बँकिंग प्रणालीकडे (Riba Free Banking System)वाटचाल करू शकतो. यामुळे पाकिस्तानातील बॅंकिंगचे स्वरुपच बदलून जाणार आहे. (Pakistan to implement zero interest banking system by 2027)

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

पाकिस्तान सरकारची घोषणा 

पाकिस्तान सरकारने शून्य व्याजाच्या कर्ज देणाऱ्या बॅंकिंग व्यवस्थेची घोषणा केली आहे. पाकिस्तानातील 'डॉन' या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थमंत्री दार यांनी देशातून व्याज व्यवस्था पाच वर्षांत संपवण्याच्या फेडरल शरीयत न्यायालयाच्या (FSC)एप्रिलच्या निर्णयाविरुद्धचे अपील मागे घेण्याचा सरकारचा इरादा सांगितला. त्यानंतर पाकिस्तान सरकारकडून ही घोषणा करण्यात आली. फेडरल शरीयत न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील सध्याची व्याज देणारी बँकिंग व्यवस्था शरिया कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे देशात व्याजविरहीत बॅंकिंग व्यवस्था लागू करण्याची मागणी आहे.

अधिक वाचा - India vs England Live Score, T20 World Cup Semi Final: भारत वि. इंग्लंड सेमीफायनल थोड्याच वेळात

इस्लामी व्यवस्थेनुसार बॅंकिंग 

डॉन या वृत्तपत्राने अर्थमंत्र्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'पंतप्रधानांच्या मान्यतेने आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या (एसबीपी) गव्हर्नरशी सल्लामसलत करून, मी सरकारच्या वतीने घोषणा करतो आहे की स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील अपील मागे घेणार आहे. आमचे सरकार शक्य तितक्या लवकर देशात इस्लामिक व्यवस्था लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. पाकिस्तान सरकारनेच आता घोषणा केल्यामुळे देशात इस्लामिक व्यवस्थेनुसार बॅंकिंग व्यवस्था लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा - Diabetes Control : वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर 100-125mg/dl असेल तर आहे मधुमेहाचा धोका...पाहा कसे कराल नियंत्रण

पाकिस्तान सरकारसमोर आव्हान

अर्थात फेडरल शरीयत न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना पाकिस्तान सरकार समोर मोठी आव्हाने असणार आहे. संपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि तिचे कामकाज पूर्णपणे नवीन प्रणालीमध्ये बदलता येणार नाही, असेही पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र हे सर्व असूनही सरकारने येत्या काही दिवसांत अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आता पाकिस्तान न्यायालयाने निश्चित केलेल्या मुदतीत व्याजमुक्त व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी पावले उचलली जातील. हा खटला आणि वाद मागील 20 वर्षांपासून प्रलंबित होता. त्यावर निर्णय आल्यानंतर आता पाकिस्तानमधील बॅंकिंग व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. 

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय संकटात असून देश कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे यातून मार्ग काढत नवीन बॅंकिंग व्यवस्था लागू करण्याचे प्रचंड मोठे आव्हान पाकिस्तान सरकारसमोर असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी