अर्थसंकल्पानंतर आधार आणि पॅन कार्डच्या नियमात नवे बदल

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Jul 09, 2019 | 16:26 IST

Aadhaar Card And Pan Card: अर्थसंकल्पात पॅन कार्ड आणि आधार कार्डशी संबंधित काही नियम बदलले आहेत. तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बरीच काम आधाराच्या नंबरनुसार करू शकणार आहात. 

Aadhar card
अर्थसंकल्पानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या नियमात झाले हे नवे बदल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • अर्थसंकल्पात आधार आणि पॅनच्या नियमात बदल
 • संपत्ती घेताना पॅनच्या ऐवजी आधार कार्ड नंबर चालणार
 • बऱ्याच ठिकाणी आता पॅनकार्ड ऐवजी आधारचा नंबरचा देता येणार 

Aadhaar Card And Pan Card New Rules: अर्थसंकल्पात आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित बऱ्याच नियमात बदल करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पात पॅन कार्ड आणि आधार कार्डसाठी करण्यात आलेल्या सर्वप्रकारच्या बदलांबाबत माहिती देणार आहोत. 

 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात घोषित केलं की, जिथेही पॅन नंबर द्यायचा आहे. तिथे आता आधार नंबर दिला जाऊ शकतो. म्हणजेच ज्या ठिकाणी पॅन नंबर देणं गरजेचं होतं तिथे आता आधार नंबर देणं हा एक पर्याय उपलब्ध असेल. कोणीही आधार नंबरच्या माध्यमातून इनकम टॅक्स रिटर्न भरेल आणि नवीन सिस्टमच्या अंतर्गत इनकम टॅक्स विभाग स्वतःहूनच पॅन कार्ड जारी करेल, अशा लोकांना याचा चांगला फायदा होणार आहे. आता आधार आणि पॅनचा डेटा एकत्रित होणार आहे.

आतापर्यंत 41 कोटी पॅन कार्ड प्रसिद्ध आहेत. यातले 22 कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहेत. 120 कोटींहून जास्त आधार कार्ड जारी झाले. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की कुठे-कुठे पॅन कार्ड देणं गरजेचं असते जिथे तुम्ही आता त्या जागी आधार नंबर देऊ शकणार आहात. 

इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्डसोबतच आधार कार्ड देखील गरजेचं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, ज्या लोकांकडे पॅन कार्ड नाही आहे. ते लोकं आधार कार्ड नंबर देऊन आपला टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. 

 1. जर का तुम्ही 50 हजार रूपयांपेक्षा जास्त Cash Transaction करत असाल तर तुम्ही पॅन नंबरच्या ऐवजी आधार नंबर देऊ शकता. बँकमध्ये जर का तुम्ही 50 हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे जमा करत असाल तर आधार नंबर देऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 
 2. याव्यतिरिक्त म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शेअर खरेदी किंवा विक्रीमध्ये जिथेही पॅन कार्ड गरजेचं आहे. तिथे आता आधार नंबर दिला जाऊ शकता. 
 3. 2 लाख रूपयांपेक्षा जास्त सोनं खरेदी करत असाल तर ज्वेलर तुमच्याकडून पॅन कार्ड मागतात. मात्र आता ज्वेलरला तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर देऊ शकता. 
 4. चारचाकी वाहन खरेदी करताना सुद्धा तुम्हाला पॅन कार्डच्या ऐवजी आधार कार्डचा नंबर देता येईल.
 5. आता क्रेडिट कार्डच्या अर्जासाठीही पॅन कार्ड गरजेचं नसेल. येथे सुद्धा आधार कार्डचा नंबर देऊन काम होईल. 
 6. कोणत्याही हॉटेलमध्ये एका बिलावर 50 हजार रूपये कॅश पेमेंट करत असाल किंवा परदेश दौऱ्यावर इतका खर्च करत असाल तर येथे सुद्धा तुम्ही आधारद्वारे आपलं काम पूर्ण करू शकाल. 
 7. कोणत्याही इंश्योरन्स कंपनीला प्रीमियम म्हणून एक वर्षांत 50 हजार रूपयांचं पेमेंट करत असाल तर पॅन नंबरच्या ऐवजी आधार नंबर देऊ शकाल. 
 8. जर का तुम्ही कोणत्याही कंपनीत जी लिस्टेड नाही आहे त्या कंपनीतून 1 लाख रूपयांपेक्षा जास्तीचे शेअर खरेदी करत असाल तर आता आधार नंबरनी तुमचं काम होईल. 
 9. 10 लाखांहून जास्त रूपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास आता पॅन कार्डच्या ऐवजी आधार नंबर देऊ शकता. 

सरकार जेव्हा वित्त विधेयकाला मंजूरी देईल तेव्हापासून हे नियम लागू होतील. यासाठी बँक आि दुसऱ्या संस्थांना आपल्या सिस्टमध्ये बदल करावे लागतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी