Twitter Deal: ट्विटरमधील हकालपट्टीनंतरही 'गोल्डन पॅराशूट'मुळे पराग अग्रवालचा अब्जावधींचा फायदा

Parag Agrawal : हा व्यवहार पूर्ण झाल्याबरोबर मस्कने पराग अग्रवालसह (Parag Agrawal)अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यामुळे मस्कने ट्विटर विकत घेतल्याने कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला फटका बसला आहे. मात्र या संपूर्ण उलटसुलट कारभारात सीईओ पराग अग्रवाल यांचा सर्वाधिक फायदा कसा झाला, याची आकडेवारी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मस्कला तिन्ही अधिकारी काढून टाकण्यासाठी त्यांना तिघांना प्रचंड मोठी रक्कम द्यावी लागेल.

Parag Agrawal
पराग अग्रवाल 
थोडं पण कामाचं
  • मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यावर अधिकाऱ्यांना काढले
  • पराग अग्रवालसह काढलेल्या अधिकाऱ्यांना अब्जावधी रुपये मिळणार
  • अमेरिकेतील गोल्डन पॅराशूट नियमाचा फायदा

Parag Agrawal Latest : नवी दिल्ली : इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twiteer take over)अखेर ताब्यात घेतली आहे. अलीकडच्या काळातील हा सर्वाधिक वादग्रस्त व्यवहार पूर्ण झाला आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्याबरोबर मस्कने पराग अग्रवालसह (Parag Agrawal)अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यामुळे मस्कने ट्विटर विकत घेतल्याने कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला फटका बसला आहे. मात्र या संपूर्ण उलटसुलट कारभारात सीईओ पराग अग्रवाल यांचा सर्वाधिक फायदा कसा झाला, याची आकडेवारी समोर आली आहे. या बदलाच्या या युगात परागला गोल्डन पॅराशूटचा (Golden Parachute)लाभ मिळाला आहे. हा फायदा काहीशे कोटी रुपयांइतका आहे. प्रचंड फायदा करून देणारे हे गोल्डन पॅराशूट काय आहे आणि या अधिकाऱ्यांचा किती फायदा झाला ते पाहूया. (Parag Agrawal to get handsome money from Elon Musk by Golden Parachute rule)

अधिक वाचा : एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज

पराग अग्रवाल आणि अधिकाऱ्यांचा किती नफा

वृत्तसंस्थेकडून समोर आलेल्या माहितीनुसार मस्कला तिन्ही अधिकारी काढून टाकण्यासाठी त्यांना तिघांना एकूण 12.2 कोटी डॉलर्स इतकी रक्कम द्यावी लागेल. ही रक्कम जवळपास सुमारे एक हजार कोटी रुपये इतकी आहे. एका रिसर्च फर्मच्या म्हणण्यानुसार, गोल्डन पॅराशूटमुळे मस्कना पराग अग्रवाल यांना 57.4 कोटी डॉलर म्हणजेच 465 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. चीफ फायनान्शियल नेड सिगलला 4.45 कोटी डॉलर्स (365 कोटी रुपये) आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजय गड्डे यांना 2 कोटी डॉलर्स (164 कोटी रुपये) मिळतील.

या तिघांना फक्त इतकाच फायदा होणार नसून शेअर्सपोटीदेखील दणकून पैसे मिळणार आहेत.
या तिघांनाही ट्विटरच्या शेअर्ससाठी एकूण 6.5 कोटी डॉलर म्हणजेच 526 कोटी रुपये मिळतील जे त्यांनी कंपनीत असताना विकत घेतले होते. यासाठी मस्कने मोठी ऑफरही दिली आहे. यामध्ये गड्डे यांना सर्वाधिक म्हणजे 3.48 कोटी डॉलर मिळणार आहेत. तर सेगलला 2.2 कोटी डॉलर आणि अग्रवालला 84 लाख डॉलर्सचा फायदा होईल. अग्रवाल यांना 2021 मध्ये वेतनापोटी एकूण 3 कोटी डॉलरची रक्कम मिळाली.

अधिक वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

गोल्डन पॅराशूट काय आहे

हे एका नियमाचे नाव आहे. गोल्डन पॅराशूट हा कर्मचाऱ्यांच्या हिताशी निगडीत कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार केलेला नियम आहे. या नियमाच्या मदतीने, कंपन्या अनेक प्रतिभावान लोकांना येथे काम करण्यासाठी आकर्षित करतात. कर्मचाऱ्यांना मिळणारी ही एक प्रकारची नुकसान भरपाई आहे. कोणतीही कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकते तेव्हा त्याच्या बाबतीत हा नियम लागू होतो. गोल्डन पॅराशूटचा नियम नसल्यास कर्मचारी आणि कंपनीमधील वाद न्यायालयात जाऊ शकतो आणि अधिग्रहण किंवा विलीनीकरणाचा करार अडकू शकतो. म्हणूनच हा नियम करण्यात आला आहे. गोल्डन पॅराशूटमुळे मिळणार फायदा हा 100% पगार आणि हेल्थकेअर प्रीमियमसह इक्विटीचे फायदे एकत्र करून दिला जातो.

अधिक वाचा : PAKला आपल्याच माणसांनी दिली ही जखम, हा खेळाडू कसा बनला 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन?

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना 10 कोटी डॉलरची भरपाई

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्विटरच्या नुकसानभरपाई धोरणानुसार मस्कला काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना 10 कोटी डॉलर्स किंवा 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त द्यावे लागतील. इलॉन मस्क यांनी ट्विटरमधून 7500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे संकेत दिले होते. प्रसार माध्यमांमधून आलेल्या आकडेवारीनुसार हा अंदाज जारी करण्यात आला आहे. जर मस्कने खरोखरच या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले तर एवढी रोकड उपलब्ध करून देणे हे त्यांच्यासाठी आव्हान असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी