LIC Plan | फक्त एक प्रीमियम भरा आणि दरमहा १२,००० रुपये मिळवा, पाहा जबरदस्त स्कीम

Insurance: सध्याच्या काळात आयुर्विमा खरोखरच महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे, एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC Policy)गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. नोकरदारांनी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एलआयसीद्वारे ऑफर केलेल्या अशाच एका योजनेमध्ये, कंपनी गुंतवणूकदारांना फक्त एक प्रीमियम भरून दरमहा रु. १२,००० मिळवून देते.

LIC Saral Pension Yojana
एलआयसी सरल पेन्शन योजना 
थोडं पण कामाचं
  • एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत एलआयसी दोन पर्याय ऑफर करते.
  • पहिला पर्याय खरेदी किमतीवर 100 टक्के रिटर्नसह लाइफ अॅन्युइटी प्रदान करतो.
  • एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवन पेन्शन योजना.

LIC Policy : नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ  म्हणजे एलआयसीकडून (LIC) विविध प्रकारच्या पॉलिसी चालवल्या जातात. या पॉलिसी गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी चांगला परतावा देतात आणि एखाद्या अनपेक्षित दुर्घटनेच्या स्थितीत गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी योग्य विम्याची रक्कम देतात. सध्याच्या काळात आयुर्विमा खरोखरच महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे, एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC Policy) गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. नोकरदारांनी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एलआयसीद्वारे ऑफर केलेल्या अशाच एका योजनेमध्ये, कंपनी गुंतवणूकदारांना फक्त एक प्रीमियम भरून दरमहा रु. १२,००० मिळवून देते. ही एलआयसीची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. (Pay a single premium and get Rs 12,000 every month in this LIC policy)

सरल पेन्शन योजनेअंतर्गत दोन पर्याय

एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी दोन पर्याय ऑफर करते. पहिला पर्याय खरेदी किमतीवर १०० टक्के रिटर्नसह लाइफ अॅन्युइटी प्रदान करतो. पॉलिसीचे फायदे पर्यायातील गुंतवणूकदारांपुरते मर्यादित आहेत, याद्वारे पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत मासिक पेआउटचे खात्री दिली जाते. १०० टक्के रिटर्न पर्यायासह लाइफ अॅन्युइटीमध्ये दुर्दैवी घटना घडल्यास नॉमिनीला प्रीमियम प्राप्त होतो. एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवन पेन्शन योजना ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही मासिक पेन्शन मिळू शकते. नॉमिनीला जोडप्याच्या मृत्यूच्या वेळी आधारभूत किंमत मिळते.

एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) -

  1. पॉलिसीधारक पॉलिसीमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे गुंतवणूक सुरू करू शकतात.
  2. एलआयसी सरल पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन पॉलिसीमध्ये एकवेळ गुंतवणूक केल्यानंतर लगेच सुरू होते.
  3. पॉलिसीधारक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन प्राप्त करणे निवडू शकतात.
  4. पॉलिसीधारक एलआयसी सरल पेन्शन योजनेत ४० वर्षे ते ८० वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
  5. पॉलिसीधारक त्यांच्या गुंतवणुकीवर पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेऊ शकतात.

एलआयसी (LIC)या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा आयपीओ (LIC IPO)लवकरच शेअर बाजारात येणार आहे. गुंतवणुकदार (Investors) एलआयसीच्या आयपीओची उत्कंठतेने वाट पाहत आहेत. विशेषत: ज्या गुंतवणुकादारांकडे एलआयसीची पॉलिसी (LIC Policyholders) आहे असे गुंतवणुकदार या आयपीओकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारने याआधीच जाहीर केले आहे की एलआयसीचा आयपीओ जेव्हा शेअर बाजारात (Share Market) येईल तेव्हा एलआयसी पॉलिसीधारकांसाठी १० टक्के शेअर राखीव ठेवले जाणार आहेत. तर बुधवारीच एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना आपले पॅन अपडेट करण्याचीदेखील सूचना केली आहे. याचा फायदा त्यांना आयपीओच्या वेळेस मिळणार आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना कर्मचाऱ्यांच्याच पातळीवर आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे एलआयसी पॉलिसीधारकांना १० टक्क्यांच्या सूटवर आयपीओच्या १० टक्क्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी