Tap To Pay via Paytm : पेटीएमची ‘टॅप टू पे’ सुविधा

Paytm enables users to make payments by tapping phone on a PoS machine : पेटीएमने ‘टॅप टू पे’ सुविधा सुरू केली आहे. पीओएस मशिनवर फोन टॅप करुन पेटीएम नोंदणीकृत कार्डच्या माध्यमातून त्वरित पेमेण्ट्स करणे या सुविधेमुळे सोपे होईल.

Paytm enables users to make payments by tapping phone on a PoS
Tap To Pay via Paytm : पेटीएमची ‘टॅप टू पे’ सुविधा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Tap To Pay via Paytm : पेटीएमची ‘टॅप टू पे’ सुविधा
  • त्वरित पेमेण्ट्स करणे सोपे होईल
  • फोन लॉक असताना किंवा मोबाइल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसताना देखील टॅप टू पे करता येईल

Paytm enables users to make payments by tapping phone on a PoS machine : मुंबई : पेटीएमने ‘टॅप टू पे’ सुविधा सुरू केली आहे. पीओएस मशिनवर फोन टॅप करुन पेटीएम नोंदणीकृत कार्डच्या माध्यमातून त्वरित पेमेण्ट्स करणे या सुविधेमुळे सोपे होईल. फोन लॉक असताना किंवा मोबाइल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसताना देखील ही सेवा कार्यरत राहणार आहे. पेटीएमची 'टॅप टू पे' सेवा पेटीएम ऑन-इन-वन पीओएस डिवाईसेस आणि इतर बँकांच्या पीओएस मशिन्सच्या माध्यमातून पेमेण्ट्स करणाऱ्या अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे.

नवीन टॅप टू पे सेवेत पेटीएम तंत्रज्ञानाचा वापर करत निवडलेल्या कार्डच्या १६-अंकी प्रायमरी अकाऊंट नंबरला (पीएएन) सुरक्षित व्यवहार कोड किंवा 'डिजिटल आयडेण्टिफायर'मध्ये बदलते. हे डिजिटल आयडेण्टिफायर खात्री देते की, युजर्सच्या कार्डची माहिती युजरपुरतीच मर्यादित राहील आणि कोणत्याही थर्ड पार्टी पेमेण्ट प्रोसेसरसोबत शेअर केली जाणार नाही. युजर्स रिटेल आऊटलेटमध्ये गेल्यानंतर पीओएस डिवाईसवर टॅप करत देय भरू शकतात, ज्यासाठी व्यवहारादरम्यान कार्डची माहिती शेअर करण्याची गरज भासत नाही.

एनएफसी (निअर फिल्ड कम्युनिकेशन) सपोर्ट असलेले कार्ड मशिन्स असलेल्या सर्व रिटेल आऊटलेट्समध्ये पेटीएमची टॅप टू पे सुविधा उपलब्ध आहे. पेटीएम अॅपच्या डॅशबोर्डवर व्यवहारांच्या सर्व नोंदी सुरक्षित आणि संबंधित युजरला बघण्यासाठी सहज उपलब्ध होतात. 

कोणत्याही क्षणी सुलभ प्रक्रियेने प्रायमरी टोकनाइज्ड कार्ड बदलता येऊ शकते. तसेच पेटीएमचा डॅशबोर्ड युजरना आवश्यक असल्यास कार्ड बदलण्याची किंवा डि-टोकनाइज करण्याची सुविधा देते.

टॅप टू पे अॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया 

  1. कार्ड लिस्‍टमधून पात्र सेव्ह केलेले कार्ड निवडा किंवा टॅप टू पे होम स्क्रीनवरील ‘अॅड न्‍यू कार्ड’वर क्लिक करा.
  2. पुढील स्क्रीनवर आवश्यक कार्ड माहिती भरा.
  3. टॅप टू पेसाठी जारीकर्त्यांच्या सेवा अटी स्‍वीकारा.
  4. कार्डसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (किंवा ईमेल आयडीवर) आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
  5. आता टॅप टू पे होम स्क्रीनच्या वरील बाजूस कार्यान्वित झालेले कार्ड दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी