Paytm IPO | पेटीएमचा शेअर गडगडला मात्र चीनी अॅंट फायनान्शियल, अलिबाबा यांची १ अब्ज डॉलरची कमाई

Paytm IPO | अॅंट फायनान्शियल (Ant Financial)आणि अलिबाबा (Alibaba)या चीनी कंपन्यांची पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक होती. पेटीएमची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर या चीनी कंपन्यांनी पेटीएममधील (Paytm)आपला काही हिस्सा विकला आहे. त्यातून या चीनी कंपन्यांनी जवळपास १ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. दोन्ही चीनी कंपन्यांनी पेटीएममधील आपला सरासरी ६ टक्के हिस्सा विकला आहे.

Paytm IPO
पेटीएममधील चीनी कंपन्यांची गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • बाजारात नोंदणी होताच पेटीएमचा शेअर गडगडला, गुंतवणुकदारांनी गमावले हजारो कोटी
  • पेटीएममध्ये चीनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक, अॅंट फायनान्शियल, अलिबाबा यांनी काही हिस्सा विकून कमावले १ अब्ज डॉलर
  • शेअर घसरणीनंतर पेटीएमचे बाजारमूल्य त्यामुळे घसरून १५ अब्ज डॉलर म्हणजेच १.१ लाख कोटी रुपयांवर

Paytm Listing | मुंबई :  भारतीय शेअर बाजारात (Share Market) पेटीएमच्या शेअरची (Paytm listing)नोंदणी झाल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत (Crash in Paytm Share price) मोठी घसरण झाली. याचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांनी आणि संस्थात्मक गुंतवणुकदारांनी हजारो कोटी रुपये गमावले. मात्र अशा परिस्थितीतदेखील पेटीएममध्ये सर्वाधिक गुंतवणूक असणाऱ्या चीनी कंपन्यांनी (Chinese companies invested in Paytm)मात्र १ अब्ज डॉलरपेक्षा जास्तची कमाई केली आहे. अॅंट फायनान्शियल (Ant Financial)आणि अलिबाबा (Alibaba)या चीनी कंपन्यांची पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक होती. पेटीएमची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर या चीनी कंपन्यांनी पेटीएममधील (Paytm)आपला काही हिस्सा विकला आहे. त्यातून या चीनी कंपन्यांनी जवळपास १ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. दोन्ही चीनी कंपन्यांनी पेटीएममधील आपला सरासरी ६ टक्के हिस्सा विकला आहे. (Paytm IPO : Despite of crash in Paytm Share, Chinese firms made $1 Billion)

चीनी कंपन्यांनी पेटीएममधून केली कमाई

अॅंट फायनान्शियलने पेटीएममधील आपला हिस्सा २८ टक्क्यांवरून कमी करत २३ टक्क्यांवर आणला आहे तर अलिबाबाने आपला हिस्सा ७ टक्क्यांवरून कमी करत ६ टक्क्यांवर आणला आहे. याशिवाय चीनी कंपन्यांबरोबरच पेटीएममध्ये इतरही अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. यामध्ये जपानच्या सॉफ्टबॅंकेने आपला हिस्सा कमी करत १६ टक्क्यांवर आणला आहे. सॉफ्टबॅंकेने यातून ४० कोटी डॉलरची कमाई केली आहे. तर एलेव्हेशन पार्टनर्स या पेटीएममध्ये अगदी सुरूवातीपासून गुंतवणूक करणाऱ्या कंपनीने ४० कोटी डॉलर मूल्याचे शेअर्स विकले आहेत. एलेव्हेशनचा हिस्सा आता १५ टक्के इतका आहे. शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर पेटीएमचे बाजारमूल्य २० अब्ज डॉलर इतके असल्याचे विजय शेखर शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले होते. 

देशातील सर्वात मोठा पेटीएमचा आयपीओ 

पेटीएमचे आयपीओद्वारे १८,३०० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट होते. हा आयपीओ ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या काळात बाजारात खुला होता. त्यावेळेस पेटीएमच्या शेअरची किंमत २,०८० ते २,१५० रुपये प्रति शेअर ठरविण्यात आली होती. पेटीएमच्या आयपीओला १.८९ पट सब्सक्रिप्शन मिळाले होते. मात्र गुरूवारी शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २६ टक्क्यांपर्यतची घसरण झाली होती. पेटीएमचे बाजारमूल्य त्यामुळे घसरून १५ अब्ज डॉलर म्हणजेच १.१ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

पेटीएमधील हिस्सेदारी

पेटीएम आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय युपीआय अॅप आहे. डिजिटल व्यवहार (Digital Transaction), पैशांची देवाणघेवाण, बुकिंग, इतर डिजिटल सेवा यासाठी पेटीएम ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र ही लोकप्रिय कंपनी सुरू करून यशाच्या शिखरावर पोचणाऱ्या विजय शेखर शर्मा यांनी कहाणी खास आहे. विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहेत. तिथून सुरूवात करून त्यांनी आज पेटीएमसारखी यशस्वी कंपनी उभारून दाखवली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएममधील आपला ४०२.६५ कोटी रुपयांचा हिस्सा विकला आहे. तर पेटीएममध्ये सध्या अॅंटफिन होल्डिंग्सची ४,७०४.४३ कोटी रुपये, अलिबाबाची ७८४.८२ कोटी रुपये, एलेव्हेशन कॅपिटल होल्डिंग्सची ७५.०२ कोटी रुपये सिअॅफ मॉरिशिअसची १,३२७.६५ कोटी रुपये आणि एसव्हीएफ पार्टनर्सची १,६८९.०३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त इतरही काही मोठ्या गुंतवणुकदारांची यात गुंतवणूक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी