Paytm IPO | देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये पैसा लावून कमाई करण्याची संधी, ८ नोव्हेंबरपासून...

पेटीएमची मुख्य प्रवर्तक कंपनी One97 Communications Ltd चा हा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ ८ नोव्हेंबर खुला होणार आहे. तर १० नोव्हेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे.

Paytm IPO
पेटीएमचा आयपीओ 
थोडं पण कामाचं
  • आयपीओंमधून गुंतवणुकदारांना कमाई करण्याची संधी मिळते
  • पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा असणार
  • पेटीएमवर जगातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक

Paytm IPO | मुंबई: शेअर बाजारात येणारा कोणत्याही कंपनीचा आयपीओ गुंतवणुकदारांसाठी कमाईची संधी असतो. मात्र काही कंपन्यांची लोकप्रियता, त्यांचे उत्पादन, सुविधा अशा असतात की त्याकडे गुंतवणुकदार खास आकर्षित होतात. या आयपीओंमधून गुंतवणुकदारांना कमाई करण्याची संधी मिळते. पेटीएम या लोकप्रिय कंपनीच्या आयपीओची गुंतवणुकदार अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. पुढील महिन्यात ८ नोव्हेंबरला पेटीएमचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा असणार आहे. पेटीएमचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. याआधी कोल इंडिया या सरकारी कंपनीचा १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ २०१० मध्ये बाजारात आला होता. (Paytm IPO | India's biggest IPO to start on 8th November)

पेटीएमचा व्यवसाय आणि विस्तार

विजय शेखर शर्मा यांनी २००० मध्ये पेटीएमची स्थापना केली आणि २०१० मध्ये कंपनीने मोबाइल रिचार्जिंग सेवा सुरू केली. त्यानंतर कंपनीने सातत्याने आपल्या सेवांचा विस्तार डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या क्षेत्रात केला आहे. आता तर पैशांची देवाणघेवाण, बुकिंग, गुंतवणूक अशा अनेक सेवा कंपनी पुरवते आहे. पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा असणार आहे. पेटीएमच्या सेवा लोकप्रिय असल्यामुळे आणि कंपनीचा विस्तार झपाट्याने होत असल्यामुळे कंपनीच्या महसूलात आणि नफ्यात आगामी काळात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

पेटीएम आयपीओचा कालावधी

समोर आलेल्या माहितीनुसार पेटीएमची मुख्य प्रवर्तक कंपनी One97 Communications Ltd चा हा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ ८ नोव्हेंबर खुला होणार आहे. तर १० नोव्हेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणुकदारांना यामध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. शेअर बाजारात पेटीएमची लिस्टिंग १८ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. 

पेटीएममध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक

पेटीएमवर जगातील अनेक दिग्गज गुंतवणुकदारांनी विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे चीनचे अब्जाधीश जॅक मा यांच्या अॅंट फायनान्शियलनेदेखील पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय अलीबाबा सिंगापूर, एलिव्हेशन कॅपिटल, सॉफ्टबॅंक व्हिजन फंड आणि बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

ग्रे मार्केटमध्ये पेटीएमला डिमांड

जाणकारांच्या मेत अनलिस्टेड मार्केटमध्ये पेटीएमच्या शेअरची किंमत सध्या ३,३०० ते ३,४०० रुपयांच्या दरम्यान ट्रेड होते आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की पेटीएम सध्या विविध समस्या हाताळून व्यवसाय करते आहे. त्यामुळे आयपीओमधील पेटीएमच्या शेअरची किंमत किंवा प्राइस बॅंड हा अनलिस्टेड मार्केट सुरू असलेल्या किंमतींपेक्षा कमी असेल. जर असे झाले तर पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत अनलिस्टेड बाजारात घसरण दिसू शकते. याशिवाय किंमत जास्त झाल्यामुळे या शेअरचे एकूण व्यवहार कमी झाले आहेत. अनलिस्टेड बाजारात मागील ३ वर्षांपासून पेटीएमच्या शेअरचे व्यवहार होत आहेत. आयपीओमधून मिळालेल्या मोठ्या रकमेचा वापर कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, नवे व्यापारी आणि ग्राहक जोडण्यासाठी करेल असे जाणकारांना वाटते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी