Paytm IPO: पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी आनंदाच्या भरात केला तुफान डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

सेबीकडून आयपीओला मंजूरी मिळाल्याचा आनंद झाल्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी कंपनीतच नाचून या गोष्टीचा आनंद साजरा केला.

Paytm IPO
पेटीएमचा आयपीओ 
थोडं पण कामाचं
  • विजय शर्मा आपल्या सहकाऱ्यांबरोबर आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ
  • पेटीएमला सेबीकडून १६,००० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी मंजूरी
  • दिवाळीपूर्वी पेटीएमची भारतीय शेअर बाजारात नोंदणी होण्याची अपेक्षा

नवी दिल्ली: पेटीएम या देशातील आघाडीच्या फिनटेक कंपनीला सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीकडून (SEBI)कंपनीच्या आगामी आयपीओसाठी मंजूरी मिळाली आहे. पेटीएमचा १६,६०० कोटी रुपयांचा आयपीओ (Paytm IPO)शेअर बाजारात येतो आहे. सेबीकडून आयपीओला मंजूरी मिळाल्याचा आनंद झाल्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा (Paytm CEO vijay Shekhar Sharma)यांनी कंपनीतच नाचून या गोष्टीचा आनंद साजरा केला. सध्या विजय शेखर शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतो आहे. मात्र ही नेमकी काय गोष्ट आहे हे जाणून घेऊया. (Paytm IPO: Video in which Paytm CEO Vijay Shekhar Sharma is dancing goes viral)

बॉलीवूडच्या गाण्यावर शर्मा यांचा नाच

आरपीजी समूहाचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार पेटीएमचे विजय शेखर शर्मा बॉलीवूडच्या 'अपनी तो जैसे तैसे' या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसले. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे एक लोकप्रिय गाणे आहे. गोएंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 'भारतातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असलेल्या आयपीओला सेबीकडून मंजूरी मिळाल्यानंतर पेटीएम कार्यालयातील दृश्ये.' मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे. 

पेटीएमच्या आयपीओची मंजूरी

अर्थात गोएंका यांना वाटते की सेबीकडून आयपीओला मंजूरी मिळाल्यानंतर विजय शेखर शर्मा याच पद्धतीने नाचत असतील. सेबीकडून आयपीओची मंजूरी मिळणे ही पेटीएमसाठी महत्त्वाची बाब आहे. शर्मा यांचे सहकारीदेखील हा महत्त्वाचा क्षण साजरा करताना दिसले. पेटीएमला सेबाकडून २२ ऑक्टोबरला १६,६०० रुपयांच्या बंपर आयपीओसाठी मंजूरी मिळाल्यानंतर कंपनीसाठी ही मोठीच आनंदाची बाब होती. पेटीएमच्या आयपीओची दिवाळीआधी भारतीय शेअर बाजारात नोंदणी होण्याची शक्यता आहे. 

पेटीएमच्या आगामी आयपीओद्वारे कंपनी बाजारात १.४७ ते १.७८ लाख कोटी रुपयांचे समभागभांडवल किंवा बाजारमूल्ये उभारण्याच्या तयारीत आहे. जाणकारांच्या मते पेटीएमच्या शेअरची किंमत २,९५० रुपये असणार आहे. 

सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यांची जोरदार घोडदौड सुरू आहे. या तेजीचा लाभ घेण्यासाठी बाजारात अनेक आयपीओ येताना दिसत आहेत. कंपन्या या तेजीचा फायदा उठवत जास्तीत जास्त भांडवल उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.

ऑक्टोबरमध्ये बाजारातील ट्रेंड

समोर आलेल्या आकडेवारीनुसार चालू महिन्यात परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत भारतीय शेअर बाजारातून १,४७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. डेट मार्केट किंवा बॉंड मार्केट संदर्भात परकी गुंतवणुकदारांचे धोरण बदलले आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी बॉंड मार्केटमध्ये १३,३६३ कोटी रुपयांची आणि ऑगस्ट महिन्यात १४,३७६.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ऑक्टोबर महिन्यात परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत १,६९८ कोटी रुपयांची गुंतवणूक बॉंड मार्केटमधून काढली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी