Paytm Offer | विमान प्रवास करणार आहात का? मग पेटीएम देते आहे चक्क ५० टक्क्यांची सूट, असा घ्या फायदा

Paytm Offer | पेटीएमने एक भन्नाट ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. सशस्त्र सेनादेलांच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच जवानांसाठी (Armed Forces Personnel), विद्यार्थी (Students)आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizen) विमान तिकिटात पेटीएमकडून मोठ्या सवलतीची घोषणा केली आहे. या श्रेणीतील प्रवाशांना मोठा डिस्काउंट दिला जाणार आहे. ही सूट इंडिगो (IndiGo), गो एअर (Go Air),स्पाइसजेट (Spicejet)आणि एअरएशिया (AirAsia)या एअरलाइन्सने प्रवास (Air travel)करणाऱ्यांना मिळणार आहे.

Paytm Offer for Air travel
पेटीएमची विमान प्रवासावर जबरदस्त सूट 
थोडं पण कामाचं
  • पेटीएमची विमान प्रवासावर भन्नाट ऑफर
  • तिकिटावर मिळणार ५० टक्क्यांपर्यत मिळणार सूट
  • पेटीएमच्या विविध सुविधा आणि ऑफर्स

Paytm Offer | नवी दिल्ली : देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स कंपनी असलेली पेटीएम (Paytm)नवनवीन ऑफर्स आपल्या ग्राहकांसाठी आणत असते. पेटीएमने अशीच एक भन्नाट ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. सशस्त्र सेनादेलांच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच जवानांसाठी (Armed Forces Personnel), विद्यार्थी (Students)आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizen) विमान तिकिटात पेटीएमकडून मोठ्या सवलतीची घोषणा केली आहे. या श्रेणीतील प्रवाशांना मोठा डिस्काउंट दिला जाणार आहे. ही सूट इंडिगो (IndiGo), गो एअर (Go Air),स्पाइसजेट (Spicejet)आणि एअरएशिया (AirAsia)या एअरलाइन्सने प्रवास (Air travel)करणाऱ्यांना मिळणार आहे. पेटीएमच्या ऑफरनुसार विमान तिकिटात १५ ते ५० टक्क्यांपर्यतची सूट दिली जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना १० किलोपर्यतच्या वजनाचे अतिरिक्त सामान देखील नेता येणार आहे. (Paytm is gving upto 50% discount on Air travel, check the details)

पेटीएमची खास सूट

जवानांना, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत विमान प्रवासात मोठी सूट मिळणार आहे. ही सूट पेटीएम आणि बॅंकिग सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून दिली जाणार असून आधीच्या ऑफर्सव्यतिरिक्त ही जादा सूट असणार आहे. पेटीएम युजर्स आपली माहिती देऊन विविध विमान प्रवासाच्या पर्यायांची माहिती घेऊ शकतात आणि मिळणारी सूट, ऑफर तपासू शकतात. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल टिकिटिंग हा व्यवसाय पेटीएमसाठी महत्त्वाचा आहे. ग्राहकांना सुलभरित्या बुकिंग उपलब्ध करून देऊन आणि त्यांना कमी किंमतीत विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा पेटीएमचा प्रयत्न आहे. 

पेटीएम अॅपद्वारे करा बुकिंग

पेटीएम अॅपच्या ग्राहकांना विमानसेवा, इंटरसिटी बस आणि ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग करता येते. पेटीएमची भारतात सेवा पुरवणाऱ्या भारतीय कंपन्यांशी भागीदारी आहे आणि पेटीएम हे इंटरनॅशनल एअर ट्रान्सफोर्ट असोसिएशनची मान्यता असलेले ट्रॅव्हल एजन्ट आहे. पेटीएमची २००० पेक्षा जास्त बस सेवांशी भागीदारी आहे. विविध प्रकारच्या प्रवासासाठी पेटीएमकडून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात विमानप्रवास, रेल्वे आणि बसच्या प्रवासाचा समावेश आहे.

एकाच कार्डद्वारे सर्व कामे

अलीकडेच पेटीएम पेमेंट्स बॅंक लि.ने पेटीएम ट्रान्झिट कार्ड लॉंच केले आहे. या कार्डद्वारे ग्राहकांच्या गरजांची काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये मेट्रो, रेल्वे, राज्य सरकारांच्या बससेवा, टोल आणि पार्किंग चार्जसारख्या सेवांबरोबर ऑफलाइन मर्चंट स्टोअर्सची बिले, ऑनलाइन शॉपिंग इत्यादींचा समावेश आहे. या कार्डचा वापर करून ग्राहक एटीएममधूनदेखील पैसे काढू शकतात.

लवकरच नाताळ आणि नवीन वर्ष यामुळे सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम (Tourism)सुरू होणार आहे. अनेक लोकांनी पर्यटनाचे प्लॅनिंगदेखील (Travel planning) सुरू केले आहे. पर्यटनाला जायचे म्हणजे हॉटेलचे बुकिंग (Hotel Booking), रेल्वे किंवा विमान तिकिटाचे बुकिंग, शॉपिंग (Shopping)या सर्व गोष्टी आल्याच. अशावेळी काही क्रेडिट कार्ड्स (Credit Cards)तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवासांसाठी आणि पर्यटनासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुरुप योग्य त्या क्रेडिट कार्डची (Travel Credit Cards)निवड करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी