अक्षय तृतीयेला पेटीएमने आणली जबरदस्त ऑफर, 1000 रुपयांचे सोने विकत घ्या आणि मिळवा २१०० रुपयांचे एक्स्ट्रा सोने

काम-धंदा
Updated May 14, 2021 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshaya Tritiya 2021: पेटीएमवर विकण्यात येणारे सोने हे २४ कॅरेट, ९९९.९ शुद्धतेचे असते. तुम्ही विकत घेतलेले सोने एका सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते. जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा या सोन्याची होम डिलिव्हरी मिळेल

Paytm offer of extra gold
अक्षय तृतीयेनिमित्त पेटीएमची जबरदस्त ऑफर 

थोडं पण कामाचं

  • पेटीएमची(Paytm) जबरदस्त ऑफर
  • ऑफर १४ मे २०२१ रात्री ११:५९ वाजेपर्यत
  • मिळवा २१०० रुपयांचे एक्स्ट्रा सोने

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya)सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोने (Gold) विकत घेणे शुभ समजले जाते. जर तुम्हालाही या शुभ दिवशी सोने विकत घ्यायचे असेल तर पेटीएमने (Paytm)तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत पेटीएमवर सोने विकत घेणाऱ्यांना एक्स्ट्रा सोने मिळते आहे. याशिवाय पेटीएम सोने विकत घेतल्यावर कॅशबॅकदेखील देते आहे. ही ऑफर १४ मे २०२१ रात्री ११:५९ वाजेपर्यत मर्यादित आहे.

पेटीएमवर विकण्यात येणारे सोने हे २४ कॅरेट, ९९९.९ शुद्धतेचे असते. तुम्ही विकत घेतलेले सोने एका सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जाते. जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा या सोन्याची होम डिलिव्हरी मिळू शकते.

मिळवा २१०० रुपयांचे एक्स्ट्रा सोने


पेटीएमच्या ऑफरनुसार जर तुम्ही आज सोने विकत घेतले तर तुम्हाला सोन्याच्या प्रत्येक खरेदीवर एक्स्ट्रा सोने मिळेल. यासाठी तुम्हाला कमीत कमी १००० रुपयांचे सोने विकत घ्यावे लागेल. किमान १००० रुपयांच्या सोन्याची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला २१०० रुपयांपर्यतचे एक्स्ट्रा सोने मिळेल.

पेमेंट करण्याआधी प्रोमोकोड नक्की टाका, नाहीतर तुम्हाला एक्स्ट्रा सोने मिळणार नाही. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्याच्या २४ तासांच्या आत सोने तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल.

मिळवा ३ टक्के कॅशबॅक


याशिवाय पेटीएम सोने विकत घेतल्यावर कॅशबॅकचीही ऑफर देते आहे. यासाठी तुम्हाला किमान २,००० रुपयांचे सोने विकत घ्यावे लागेल. ३ टक्के कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला २००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे सोने विकत घेण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बॅंक डेबिट कार्ड (Paytm Payments Bank Debit Card)किंवा पेटीएम पेमेंट्स बॅंक नेट बॅंकिंगचा (Paytm Payments Bank Net Banking)वापर करावा लागेल.

एका डिव्हाईससाठी एकदाच ऑफर


या ऑफरअंतर्गत ग्राहकांना कमाल २०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरच्या कालावधीत ग्राहक एक वेळा याचा लाभ घेऊ शकतात. तर एका डिव्हाईसमधून एक वेळाच या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो.

ही ऑफर १४ मे, २०२१ रात्री ११:५९ वाजेपर्यतच उपलब्ध आहे. ऑफर फक्त पेटीएम पेमेंट्स बॅंक युजर्ससाठी आहे. या ऑफरअंतर्गत कोणत्याही प्रोमोकोडची आवश्यकता नाही. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ग्राहकांना रिवार्ड मिळणार आहे.

अक्षय तृतीयेनिमित्त सोन्यात गुंतवणूक करणे शुभ समजले जाते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे मागील वर्षापासून सोन्याच्या भावात तेजी आली आहे. मागील वर्षी सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली होती मात्र मागील दोन महिन्यांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या भावात पुन्हा तेजी दिसून येते आहे. अस्थिर वातावरणात सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणुकदारांचा कल असतो. कारण सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. शिवाय वेळप्रसंगी सोने तारण ठेवून कर्जही घेता येते. आगामी काळात अर्थव्यवस्था आणि जागतिक पातळीवर अस्थिरता अशीच राहिल्यास दिवाळीपर्यत सोन्याचा भाव ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी