Paytm Share Crash : पेटीएमचे शेअर्स आपटले! ब्लॉक डीलच्या बातम्यांमुळे शेअर्सची जोरदार विक्री

Paytm Share fall : पेटीएममध्ये जपानच्या सॉफ्टबॅंकेची (Soft Bank) मोठी गुंतवणूक आहे. मात्र सॉफ्ट बॅंक एका मोठ्या डीलद्वारे पेटीएममधील आपले शेअर विकण्याच्या तयारीत असल्याची बातमी बाजारात पसरली आणि पेटीएमच्या शेअर्सने दणादण आपटी खाल्ली. पेटीएमची मूळ प्रवर्तक कंपनी असलेल्या One 97 Communication मधील 4.5 टक्के हिस्सेदारी एवढे हे शेअर्स आहेत. या डीलची किंमत तब्बल 20 कोटी डॉलर इतकी आहे.

Paytm share crash
पेटीएमचा शेअर कोसळला 
थोडं पण कामाचं
  • पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण
  • सॉफ्ट बॅंकेच्या ब्लॉक डीलच्या बातमीमुळे शेअर कोसळला
  • वर्षभरात शेअर 77 टक्के घसरला

Paytm Share Price Today: नवी दिल्ली : आज पेटीएमच्या (Paytm)शेअर्सना शेअर बाजारात जोरदार दणका बसला आहे. गुंतवणुकदारांनी पेटीएमचे शेअर्स विकण्याचा धडाका लावल्याने शेअर्सच्या किंमतीत (Share price of Paytm) मोठी घसरण झाली. त्यामागे कारणही तसेच आहे. पेटीएममध्ये जपानच्या सॉफ्टबॅंकेची (Soft Bank) मोठी गुंतवणूक आहे. मात्र सॉफ्ट बॅंक एका मोठ्या डीलद्वारे पेटीएममधील आपले शेअर विकण्याच्या तयारीत असल्याची बातमी बाजारात पसरली आणि पेटीएमच्या शेअर्सने दणादण आपटी खाल्ली. आज सकाळच्या सत्रातच पेटीएमचा शेअर 600 रुपयांच्या खाली घसरला होता. शेअर्सची किंमतीत तब्बल 6.43 टक्क्यांची घसरण होत शेअर 562.75 रुपयांच्या पातळीवर आले. (Paytm share falls due to news of soft bank block deal) 

अधिक वाचा : अरे बापरे! नोकरकपातीचे वारे आता पोचले चीनमधील टेक कंपनीपर्यत

सध्या सूत्रांकडून अशी माहिती समोर येते आहे की जपानचा सॉफ्ट बँक समूह आज ब्लॉक डीलद्वारे पेटीएमचे 2 कोटी 90 लाख शेअर्स विकू शकतो. पेटीएमची मूळ प्रवर्तक कंपनी असलेल्या  One 97 Communication मधील 4.5 टक्के हिस्सेदारी एवढे हे शेअर्स आहेत. या डीलची किंमत तब्बल 20 कोटी डॉलर इतकी आहे. सॉफ्ट बॅंक पेटीएममधील आपले शेअर्स विकणार असल्याचा दावा बोफा सिक्युरिटीजने केला आहे.

लॉक-इन कालावधी 15 नोव्हेंबरला संपला 

पेटीएमच्या विकल्या गेलेल्या शेअरचा किंमत पट्टा 555-601 रुपये आहे. बुधवारी बाजार बंद होताना शेअर्सची किंमत 601.45 रुपये होते. त्यापेक्षा किंमत 7.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. किंमत पट्ट्याच्या खालच्या मर्यादेनुसार डीलचे मूल्य 1,629 रुपये आहे. पेटीएमच्या प्री इनिशियल पब्लिक ऑफरिंग गुंतवणुकदारांसाठी लॉक इन कालावधी 15 नोव्हेंबरला संपला आहे. 

अधिक वाचा : उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या आंदोलनाला कार्यकर्ते मिळेनात? 

बाजारात नोंदवलेल्या किंमतीपेक्षा शेअर 72 टक्क्यांनी घसरला

पेटीएमच्या शेअरमध्ये ज्यांनी आयपीओच्या वेळेस गुंतवणूक केली होती त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच पेटीएमच्या शेअरची नोंदणी झाली होती. त्यावेळेस शेअर 1,950 रुपयांवर वर सूचीबद्ध झाले होते. इश्यू किंमतीच्या 2,150 रुपयांच्या किंमतीवर 9 टक्के सूट देत शेअर्स नोंदवले गेले होते.  18,300 कोटी रुपयांचा हा IPO नोव्हेंबरच्या सुरुवातीला 2,080-2,150 रुपये प्रति शेअरच्या प्राइस बँडसह लॉन्च करण्यात आला. मात्र आजची घसरण लक्षात घेता पेटीएमचा शेअर आयपीओच्या किंमतीवरून 72 टक्क्यांनी घसरला आहे.

अधिक वाचा : टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वापरून पाहा

सॉफ्टबँकेची पेटीएममध्ये 1.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक 

सॉफ्टबँकने पेटीएममध्ये 1.6 अब्ज डॉलरची मोठीगुंतवणूक केली होती. त्यानंतर सॉफ्ट बॅंकेने आयपीओच्या वेळेस पेटीएमचे 25 कोटी डॉलर किंमतीचे शेअर विकले होते.  30 सप्टेंबरपर्यंत, SVF इंडिया होल्डिंग्ज (केमन) मार्फत सॉफ्टबँकने पेटीएममध्ये 17.45% हिस्सा होता. गुरुवारच्या ब्लॉक डीलनंतर, सॉफ्ट बॅंकेची पेटीएममधील हिस्सेदारी 12.9 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.

शेअर बाजारात एखाद्या शेअरला कधी आणि किती तेजी येईल हे सांगता येत नाही. तसेच एखादा शेअर कधी घसरणीला लागेल याचाही काही नेम नसतो. एखादी बातमी किंवा माहिती किंवा अफवा त्या शेअरच्या किंमतीत मोठा फरबदल घडवून आणते. पेटीएमच्या शेअरला सॉफ्ट बॅंक मोठी डील करणार असण्यचा वृत्ताचा मोठा फटका बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी