Paytm Listing | पेटीएमची लिस्टिंग होताच शेअर गडगडला, गुंतवणुकदार खड्ड्यात, पाहा किती झाले नुकसान

Paytm share crash : पेटीएमचा शेअर सध्या १६८७ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. सकाळी १० वाजता पेटीएमचा शेअर १,७७७ रुपयांपर्यत खाली आला. त्यानंतर एका क्षणी तर पेटीएमचा शेअर १,५८६ रुपये प्रति शेअरपर्यत घसरला होता. यामुळे पेटीएमच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठाच फटका बसला आहे. पेटीएमचा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ होता. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएममधील आपला ४०२.६५ कोटी रुपयांचा हिस्सा विकला आहे.

Paytm share crash
पेटीएमचा शेअर गडगडला 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात नोंदणी होताच पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी घसरण
  • पेटीएमचा शेअर सध्या १६८७ रुपयांच्या पातळीवर
  • पेटीएमचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ

Paytm Listing | मुंबई : पेटीएमच्या (Paytm)बहुचर्चित शेअरची अखेर शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. मात्र नोंदणी होताच पेटीएमचा शेअर (Share price of Paytm)गडगडला आहे. यामुळे पेटीएमच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना (Investors) जबरदस्त फटका बसला आहे. पेटीएमचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ (Paytm IPO) होता. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या पेटीएमच्या प्रवर्तक कंपनीचा म्हणजे  One97 Communications Ltd चा शेअरची आज मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी झाली. मात्र लिस्टिंग होताच पेटीएमचा शेअर तब्बल २६ टक्क्यांनी  गडगडला आहे. मुंबई शेअर बाजारात पेटीएमच्या शेअरची नोंदणी १९५५ रुपये प्रति शेअरने तर राष्ट्रीय शेअर बाजारात १९५० रुपये प्रति शेअरने झाली. मात्र त्यानंतर अर्ध्या तासातच पेटीएमच्या शेअरला घरघर लागली आहे. (Paytm share tanks 26 % on listing After India's Biggest-Ever IPO)

पेटीएमचा शेअर गडगडला

पेटीएमचा शेअर सध्या १६८७ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. सकाळी १० वाजता पेटीएमचा शेअर १,७७७ रुपयांपर्यत खाली आला. त्यानंतर एका क्षणी तर पेटीएमचा शेअर १,५८६ रुपये प्रति शेअरपर्यत घसरला होता. यामुळे पेटीएमच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठाच फटका बसला आहे. पेटीएमचा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ होता. या आयपीओद्वारे कंपनी १८,३०० कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करणार होती. मागील आठवड्यात हा आयपीओ १.८९ पट सब्स्क्राइब झाला होता. बीएसईवर या शेअरचा व्यवहार १,९५५ रुपये प्रति शेअरवर खुला झाला होता. याआधी कोल इंडियाचा १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणि रिलायन्स पॉवरचा ११,००० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारातील सर्वात मोठे आयपीओ होते. मात्र पेटीएमचा १८,००० कोटी रुपयांचा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ होता.

पेटीएममधील गुंतवणूक

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएममधील आपला ४०२.६५ कोटी रुपयांचा हिस्सा विकला आहे. तर पेटीएममध्ये सध्या अॅंटफिन होल्डिंग्सची ४,७०४.४३ कोटी रुपये, अलिबाबाची ७८४.८२ कोटी रुपये, एलेव्हेशन कॅपिटल होल्डिंग्सची ७५.०२ कोटी रुपये सिअॅफ मॉरिशिअसची १,३२७.६५ कोटी रुपये आणि एसव्हीएफ पार्टनर्सची १,६८९.०३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त इतरही काही मोठ्या गुंतवणुकदारांची यात गुंतवणूक आहे. पेटीएमचा आयपीओ एवढा मोठा होता की पेटीएमचा शेअर गडगडल्यानंतरदेखील कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांचे आहे. नोंदणी होताना पेटीएमच्या शेअरची किंमत वास्तविक मूल्यापेक्षा कितीतरी अधिक स्वरुपात पोचली होती. त्यामुळे बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. पेटीएमने नवीन गुंतवणुकदारांसाठी ८,३०० कोटी रुपयांचा इश्यू बाजारात आणला होता तर आधीच गुंतवणुकदार असलेल्यांसाठी कंपनीने १०,००० कोटी रुपयांचे शेअर बाजारात आणले होते.

विजय शेखर शर्मांनी केली पेटीएमची सुरूवात

विजय शेखर शर्मा यांनी आपल्या मित्रांबरोबर आधी एक व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यांनी दिवाळखोरीच्या स्थितीत विजय शर्मा यांची साथ सोडली. मात्र शर्मा यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. शर्मा यांनी २००० मध्ये पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या One97 ची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी इंटरनेटच्या दुनियेतील तीन मूलभूत गोष्टींवर म्हणजे कंटेंट, जाहिरात आणि व्यापार या तीन बाबींवर मेहनत घेतली. २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी पेमेंट इकोसिस्टमची कल्पना आणली. कंपनीची मॅनेजमेंट त्यासाठी तयार नव्हती. यावर शर्मा यांनी आपल्या हिश्यातील एक टक्का रक्कम म्हणजे १५ कोटी रुपये यासाठी खर्च करण्याचा प्रस्ताव दिला. हे २०११चे साल होते. या नव्या संकल्पनेची जबाबदारी आणि खर्चाचा भार शर्मा यांच्यावर होता. मात्र त्यांनी आत्मविश्वासाने Paytm म्हणजेच Pay Through Mobile या अॅपची सुरूवात केली. येथूनच त्यांच्या आयुष्याला आणि देशाच्या डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या क्षेत्राना नवे वळण मिळाले आणि पुढे इतिहास घडला. आज हे क्षेत्र भरभराटीला आले असून पेटीएमचे मॉडेल या क्षेत्रातील प्रत्येक कंपनीसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी